मन

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

सुख टाळी द्यायला सरसावते
आणि त्याच वेळी जपायचे असतात मला हातांवरचे फोड
चाके लावून किल्ली देऊन तयार असते माझे मन
एका लाँग ड्राइव्ह करता
आणि काही केल्या बंद होत नाहीत ह्या खिडक्या
ही दारे, घरातले दिवे आणि पत्रासाठीच्या फटीतून
ओतत राहतात थकलेली बिले...
उपसत राहतो मी घर थोडे पाय टेकवण्यासाठी
मन शोधत राहते फट माझ्या कर्दळ-कातडी मध्ये
एक उंची वाइन सरकवतो घशात लाच म्हणून कदाचित लाचार म्हणून देखील
पण लय संपलेल्या क्षणाशी मन उभे असते
सुन्न विकल...
निसर्गाने दिलेली नखे घासत, रंगवत.
सुखाचे मुखवटे जागोजाग सजवतात भिंती कोपरे
आणि वेश्येसारखे माझे मन सरावाने
चाके लावून किल्ली देऊन तयार असते एका लाँग ड्राइव्ह करता

प्रकार: 

छान आहे रे (पुन्हा लिहीतोयस हे उत्तमच) पण
>सुख टाळी द्यायला सरसावते
आणि त्याच वेळी जपायचे असतात मला हातांवरचे फोड
चाके लावून किल्ली देऊन तयार असते माझे मन
एका लाँग ड्राइव्ह करता

शेवटच्या दोन ओळी पहिल्या दोन ओळींचा फ्लो खंडीत करतात असे वाटले..
पुढील सर्व व्यवस्थित त्या अनुशंगाने आलय...
प्रतिके छान आहेत पण तरीही प्रत्त्येक दोन ओळी स्वताचा अर्थ अधिक अधोरेखित करत आहेत, त्यामूळे एक ओव्हरॉल ईफेक्ट आलाय पण थोडा थोडा प्रत्त्येक दोन ओळीतून तो ओघळतो ईतकच. Happy

जया हे कसं पाह्यलं नाही...
मस्तच की नेहमीप्रमाणे....
पण पूर्वीचा जया कुठेय रे... भिंगोर्‍यावाला!!