छंद आपला आपला

Submitted by नविना on 4 May, 2010 - 19:40

मला खूप लहान पणापासून एक सवय आहे. मी एखाद्याला भेटले की त्या व्यक्तीचं विश्लेषण माझ्या मनात सुरु होतं . काही गरज नसते. पण आपोआप होणारी ती प्रतिक्रिया असते माझी. माझ्याही नकळत. आणि मग लगेच माझं मत वगैरे बनतं. त्याचीही गरज नसते आणि ते काळानुसार बदलतं देखील पण "first impression" खूपच आवश्यक असतं हा माझा आपला एक गैरसमज आहे.
मग ती माझ्याशी बोलतानासुद्धा आपल्या कामात लक्ष ठेवून होती म्हणजे तिला माझ्याशी बोलायचंच नव्हतं, किंवा तो जेव्हा समोर बसला होता तेव्हा त्याचं लक्षं हातातल्या कीचेन कडेच होतं म्हणजे त्याला कॉन्फीडन्सच नाही. अगदी हे सुद्धा. बर्‍याचदा हे असं होतं. ती व्यक्ती निघून जाते. मी आपल्या कामात लागते. पण पुन्हा ते लोक भेटले की मी पुन्हा आपल्या मागल्या पानावरून सुरु होते. म्हणजे मागच्यावेळी त्याचं / तिचं लक्ष नव्हतं. आता बघुया काय करतात ते.
बरं हे फक्तं माझ्या पुरतं नाही. मी माझ्या ताईला पण हे सगळं सांगते. आणि बरेचदा काहीही संबंध नसताना मी तिची मतं बनवते. म्हणजे माझा मोठ्ठा आवाज influential वाटतो म्हणून.बाकी काहीही कारण नाही. ती फार तर फार अर्ध्या तासात सगळं विसरून पण जाते. पण तेव्हढ्या पुरतं मात्रं तिला माझं म्हणणं पटतं. somehow..
पण समजा तिला कधी ती व्यक्ती भेटली तर मात्र मला आढळून आलय की तिला पण तसंच वाटतं. मग आम्ही पुन्हा एकदा ते डिस्कस करतो. उपयोग शून्य. पण करतो. असंच आपलं तेव्हढाच एक गप्पाना विषय म्हणून असेल कदाचित.
अमेरीकेत आल्यापासून मला माणसं प्रत्यक्षात भेटणं कमी झालं आहे. पण आता त्या छंदाचं रुपांतर online profiles शोधण्यात झालं आहे. कधी काही वाचलं की शोध त्या लेखकाची पाळंमुळं. अगदी विकि ते कुठलंही informational portal पण पिंजून काढते मी. आणि मग ते नाव शोधून झालं की मग त्याच्याशी संबंधीत गोष्टी शोधून काढते मी. यात वेळ खूप जातो आणि माझं एखादं महत्वाचं काम विसरायला होतं. पण चालतं मला ते.
आणि आजकाल तर नवीनच सुरू झालं आहे. मायबोलीवरचं काहीही वाचलं की लगेच त्या लेखकाच्या प्रोफाईल मध्ये जावून बघते. मला वाटतंय मी गेल्या ८ दिवसात जवळपास सगळ्या आय डीज चे प्रोफाइल्स बघितलेत बहुतेक. कारण लेख वाचला की मग प्रतिसाद वाचले जातात. मग सगळे प्रतिसाद देणारे आय डीज पण पाहिले जातात. आणि मग अजून वेळ जातो. पण मजा येते सगळ्यांबद्दल वाचताना. लोकांचे विचार कळतात. छान वाटतं. असं वाटतं मी बर्‍याच लोकांना प्रत्यक्षात भेटतेय.
हे सगळं लिहून काढायला कारण म्हणाल तर काहीच नाही. कुठलंही साहित्यिक मुल्य या लेखाला नाही. GRE साठी analytical writing section मध्ये न विचार केलेल्या विषयावर लिहिता यावं याची प्रॅक्टिस करत असताना असं हे लिहून काढावं वाटलं. म्हणून लिहिलं. आपल्या भाषेत विचार करून लिहिणं खरच सोपं जातं का हे बघत होते. आता लिहिलंच आहे तर म्हटलं पोस्ट करावं. Happy इतकी बडवेगीरी वाया का घालवा!!!

गुलमोहर: 

नवीना....सही आहेस तू! खूप बारीक निरीक्षण लागते असले काही करायला...पण याचा उपयोग मात्र खूप आहे. समोरच्या व्यक्तीच्या वागण्याबोलण्यातून एक अंदाज लागतो, त्याच्याशी संबंध वाढवताना, मदत देताघेताना ही निरीक्षणं, हे कयास खूप उपयोगाला येतात.

sun signs/star signs यांचा स्वभावावर परिणाम होतो म्हणे..मला पण कुणाशी जास्त ओळख झाली कि त्यांची जन्म तारीख विचारून त्यावरून विश्लेषण करून ते आपण पाहिलेल्या वर्तनाशी जुळते का हे पाहायचा छंद आहे. कधी कधी हे मी त्या व्यक्तीबरोबर शेअर पण करतो.

धन्यवाद kadamb, तराना आणि भरत. पोलिसात मी गेले असते पण त्यांनी पण तर मला घ्यायला पहिजे ना? Happy

नविना, गम्मत म्हणुन असे सहज लिहु शकतेस, तर लिहीत रहा ...

या विषयाशी साधर्म्य असलेली (पण बिलीफ्सशी जास्त संबंधीत) एक पोस्टींग माझ्या ब्लॉग वर काही वर्षांपुर्वी केले होते:
http://aschig.blogspot.com/2006/08/on-behaviour-belief-connection.html

नविना,तु लिहीत रहा ...
आज जग हे एक खेडं आहे असं म्हणतात,पण याच खेड्यात माणसं प्रत्यक्ष खुप कमी भेटतात,जे भेटतात ते देखिल अनोळखी असतात, विश्वास ठेवायला बरेच जण विनाकारण कचरतात,ताक सुद्धा रोज फुंकुन्च पितात ...!

धन्यवाद प्रीति, बस्के, प्रकाश, aschig, अनिल२०२०.
गम्मत म्हणून केलेल्या लिखाणाला इतक्या पावत्या मिळाल्या याचा आनंद मी शब्दात सांगूच शकत नाही.
aschig, अगदी बरोबर बोललात तुम्ही तुमच्या ब्लॉगवर. Never judge a person's beliefs (or intentions) until you have analyzed his behaviour (and even then you could be wrong). मला आवडला तुमचा ब्लॉग.

तुमची गम्मत म्हणून लिहीलेलं लिखाण त्यामध्ये नमूद केलेला स्वभाव ही माझीपण सवय किंवा छंद म्हणा हवं तर... म्हणून मग मी तुमच्या आ.डी. मध्ये अनाहूतपणे डोकावण्याचा आगाउपणा केला... Proud

अंधेरीपर्यंत 'धीमी लोकल' ने जाताना तर सगळ्यांचे थोबडे(भुवया कित्ती बारीक कोरल्यात तिथपासून पायाच्या नखांना छान शेप देऊन कुठल्या शेडने रंगवल्यात तिथपर्यंत) निरखणं आणि अंदाज बांधणं चालू असतं... अरे बापरे माझ्या मनातले त्यावेळचे विचार कोणी ऐकले, अगंबाई अरेच्चा सारखे तर तो बहीरा होईल किंवा वेडा तरी... विचारांची लोकल एवढे ट्रॅक्स बदलत चाललेली असते अखंड....

"ही भोचक भवानी दिसतेय... बघतेय कशी चौथ्या सिटवर बसून कुठली ऐसपैस जागा मिळतेय का ते पसरायला... हिचा चॉईस छानै... ड्रेस भारीतला दिसतोय... आम्ही मेलं घ्यायला गेलं तर असा कलर मिळायचाच नाही... ही खरंच साधी दिसते हो... गोड आहे फार... कसं होणार हिचं एखादा खडूस बॉस किंवा खाष्ट सासू मिळाली तर??? ही का बया मला अशी बघतेय मघापासून? अगदीच अवतार झालाय वाटते माझा... अरे नाहीतर हीपण आपल्यासारखीच दिसतेय... मापं काढणारी... अहं माणसं वाचणारी... Happy "

बाकी छान लिहीलेय... पु. ले. शु.

@भरत... मलाही ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यात विशेष रस आहे... थोडाफार जुळतोही स्वभाव हे पडताळून बघताना.. पण मानवी स्वभाव एवढा चंचल आणि अगम्य असतो की त्या शास्त्रालाही मर्यादा पडतील... Happy

आणि आजकाल तर नवीनच सुरू झालं आहे. मायबोलीवरचं काहीही वाचलं की लगेच त्या लेखकाच्या प्रोफाईल मध्ये जावून बघते. मला वाटतंय मी गेल्या ८ दिवसात जवळपास सगळ्या आय डीज चे प्रोफाइल्स बघितलेत बहुतेक. कारण लेख वाचला की मग प्रतिसाद वाचले जातात. मग सगळे प्रतिसाद देणारे आय डीज पण पाहिले जातात. आणि मग अजून वेळ जातो. पण मजा येते सगळ्यांबद्दल वाचताना. लोकांचे विचार कळतात. छान वाटतं. असं वाटतं मी बर्‍याच लोकांना प्रत्यक्षात भेटतेय.>>>>
डीट्टो एकदम डीट्टो !!! माबोवर जॉईन झालो तेंव्हा मी ही हाच उद्योग करत असे!
लिहीत रहा!
रच्याकने इथे तु एंजॉय करणार कारण नेमक्यावेळी नेमका टोमणा मारणं ही तुझी आवड आहे Happy

धन्यवाद dreamgirl आणि आगाऊ. मी जोवर एखाद्याला प्रत्यक्षात भेटून थोडी ओळखायला लागत नाही तोवर टोमणे मारत नाही. त्यामुळे इथे अजून तरी शक्यता कमी आहे. एंजॉय मात्र मी करतेच मायबोली वाचणं. सगळेच छान लिहितात.