आमच्या अंगणातला वसंत

Submitted by सॅम on 1 May, 2010 - 14:25

यावेळी हिवाळ्यानी वैताग आणला. आख्खा एक महिना बर्फ होतं. चार महिने तपमान १० च्या खालीच. त्यामुळे कधी एकदा उन्हाळा सुरु होतोय असं झालं होतं.
... आणि एक दिवस तो दिवस आला. चार महिने सगळ्या झाडांवर पानांशिवाय नुसत्याच काट्या-कुट्या दिसत होत्या. तिथे एका आठवड्यात ठरवल्याप्रमाणे अचानक पानं सोडाच थेट फुलंच यायला सुरुवात झाली.

आम्ही या घरी मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये आलो होतो. तेंव्हा झाडांना पानं होती. पण तो फुलांचा काळ नसल्याने कुठल्या झाडांना कुठली फुलं येतात हे आम्हाला माहित नव्हतं. एप्रिल सुरु झाल्यापासून दर दोन-तीन दिवसांनी नवीन फुलं दिसू लागली. एक मोठ्ठं झाड होतं त्याच्या प्रत्येक फांदीवर भरपूर पिवळी फुलं आली.

दुसऱ्या झाडावर नाजूक पांढरी फुलं आली होती.

शिवाय अंगणात बऱ्याच ठिकाणी शोभेची तर काही रानटी फुलं आली.

एका कोपऱ्यात तर अचानक ट्युलिप आले! बहुतेक ट्युलिपचे कंद चुकून तिथं पडले होते.

बागेत गवताबरोबर एक रानटी वनस्पती पण दिसायची (अगदी डोकेदुखी, कितीही काढली तरी परत यायची.) तिला छोटी छोटी पिवळी फुलं आली.

या फुलांनी अख्खी बाग भरून गेल्यावर मस्त वाटलं. (दुरुस्ती: ही वनस्पती डोकेदुखी नाही!)

वसंत जसा जसा संपत आला तसं एक एक फुलं गायब झाली. त्याजागी झाड पानांनी बहरले. वरच्या पिवळ्या फुलांच्या जागी म्हातार्‍यांचे गुच्छ आले.

वाऱ्यावर या म्हाताऱ्या सगळीकडे पसरायला लागल्या... (आता कळलं की ही वनस्पती एवढी चिवट का आहे!)

... तर हा आमच्या अंगणातला वसंत!!

गुलमोहर: 

कसली नाजुक फुलं आहेत!! म्हातार्‍या सहिच.. पण गंमत म्हणजे मला सगळी पिवळी फुलं अत्यंत आवडली! Happy

मस्त आहेत रे फोटु.
म्हातार्‍यांचे फोटू तर जबरी Happy

मस्तच रे सॅम Happy
सगळेच फोटो आवडले तरी म्हातार्‍यांचे विशेष आवडले.

बादवे
यावेळी हिवाळ्यानी वैताग आणला. आख्खा एक महिना बर्फ होतं. चार महिने तपमान १० च्या खालीच. त्यामुळे कधी एकदा उन्हाळा सुरु होतोय असं झालं होतं.>>>>>>आणि इथे आम्ही या कडक उन्हाळ्याला वैतागलोय. कधी एकदा पावसाळा सुरु होतोय असं झालंय Happy

मस्त रे सॅम. पांढर्‍या फुलांचा दुसरा(अगेन्स्ट लाईट) आणि म्हातार्‍यांचा( हाताच्या खालचा. हा जरा कमी एक्स्पोज झाला असता तर अजुन सही वाटला असता.IMO) आवडले !

मस्त फोटो. विशेषतः शेवटचे खासच.
पिवळे फुल आणि त्यानंतर म्हातारीचे फोटो अस सगळेजण जे म्हणतायत ते actually "डॅन्डेलिऑन" या weed चे फोटो आहेत. फुल मरत आणि मग बीया असलेले धागे बाहेर पडतात.आणि ते अस म्हातारी सारख दिसत.
नंतर हळु हळु वार्‍याबरोबर पसरुन याच्या बीया पसरतात.
याच्या मुळ लॉनच खुप नुकसान होत.
अ‍ॅलर्जी असणार्‍या लोकांना याचा अत्यंत त्रास होतो. Sad आमच्या टेकसास मध्ये भयंकर प्रमाण आहे याच.

म्हातार्‍यांचा आणि ट्युलिपच्यावरील पिवळ्या फुलाचा फोटो सगळ्यात जास्त आवडले... बाकी सगळे पण मस्तच!! Happy

Pages