ध्यास आहे

Submitted by सतीश वाघमारे on 1 May, 2010 - 14:08

जीवनाला ध्यास आहे
टाळणे मरणास आहे

(जीवनाला ध्यास आहे
गाठणे मरणास आहे)

एकदा अपवाद व्हावे
वाटते नियमास आहे

एकदा माणूस झालो-
भोगला वनवास आहे

सैलशी भरगच्च वेणी-
काय सुंदर फास आहे !

पाखरे विसरून गेली
खंत ही घरट्यास आहे..

गुलमोहर: 

छान .