खिंडसी-रामटेक-नागपूर...और कुछ पुरानी यादें !!!

Submitted by Girish Kulkarni on 29 April, 2010 - 02:55

*****************************************************
*****************************************************

नुकताच गेल्या नोव्हेंबरमध्ये नागपुरला जाऊन आलो... जवळ-जवळ सात-आठ वर्षांनंतर योग येत होता तेही जुन्या कॉलेजचा ग्रूप मागे लागल्याने. सगळे जण खुप वर्षांत एकमेकांना भेटले नव्हते...जो तो आपपल्या करीअर-कुटुंबात मग्न होता....म्हणुन ही सगळ्यांनी मिळुन दोन दिवस एकत्र जमायची आयडीया अन तेही नागपुरला वा त्याच्या आसपासच हे सर्वानुमते पक्क ठरल.. तारखा ठरल्या अन खिंडसी - रामटेक ही जागा मक्रुरही करण्यात आली. यात मुद्दाम जरा पार्श्वभुमी म्हणुन नमुद करायच म्हणजे रामटेक अन त्यातल्या त्यात खिंडसीला आम्ही सगळे वीसेक वर्षांपुर्वी आमच्या ग्रॅज्युएशनचे रिझल्ट सेलेब्रेट करायला गेलो होतो त्यामुळे आता वीस वर्षांनी पुन्हा सगळ्यांनी तिथेच जाऊ/भेटु म्हणुन आग्रह धरला होता.त्याप्रमाणे सगळे नागपुरला जमलो अन तेथुन मग रामटेक गाठले. तिथे एका मित्राच घरही होत त्यामुळे खुप धमाल आली.

या ट्रीपमध्ये काढलेली खिंडसीची काही चित्रं टाकायच कधीच मनात होत पण होत नव्हतं ... आता जमलय...हे फोटो खास सगळ्या वैदर्भीय मित्रांसाठी ज्यांना माझ्यासारखच नागपुर-विदर्भात सारख जाण होत नाही त्यांच्यासाठी देतोय... प्रेरणा अर्थातच मायबोलीवरचे असंख्य प्रकाश चित्र/लेख !!! Happy

खिंडसी - सार्वजनिक बांधकाम खात्याचा जुना डाकबंगला :

Ramtek-RestHSE.JPG

याच गेस्टहाऊसला आम्ही वीस वर्षांपुर्वी आमचे युनिव्हर्सिटीचे रिझल्टस लागल्यावर जमलो होतो. एक रात्र थांबलेलो. आयुष्य पुढे काय वळण घेणार याबद्दल प्रत्येकाचे आडाखे बनायला सुरुवात झालेली होती अन त्यानंतर आता वीस वर्षांनी जेंव्हा प्रत्येकाची करीअर-कुटुंब अन आयुष्यंही स्थिरावलीयत अशा वेळी आम्ही पुन्हा जमलो-भेटलो अन पुन्हा जुन्या दिवसात गेलो... त्यावेळेस बहुधा बीअर होती उत्सवाच माध्यम म्हणुन आता त्याची जागा सिंगल माल्ट अन स्कॉचन घेतली होती ... उत्साह सगळ्यांचा तसाच होता.. कोणीच इतक आयुष्य चालुन आल्यासारख वाटत नव्हत अन ती कौतुकाची बाब वाटली !!!

खिंडसी जलाशय...बोटींग वैगरेची सुविधा अन इतर

Ramtek-Reservr.JPG

इथे महाराष्ट्र पर्यटन महामंडळान काही बर्‍यापैकी सुविधा उपलब्ध केल्यायत. अजुन बरच काही केल जाऊ शकत पण तो वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो.

Ramtek-BTG.JPG जलाशयाच्या टेकडीवरचे नविन खासगी रिसॉर्ट : MTDC Gusthse-Ramtek.JPG

हे रिसॉर्ट अतिशय उपयुक्त आहे. जेवण अप्रतिम!!! मी खुप खाण्याचा शौकीन नाही पण चांगल जेवण कळत... इथली चिकन फ्राय म्हणजे ऑसम..!!! रेस्टॉरंट तीन वेगवेगळ्या ठीकाणी आहेत.. आम्ही रात्रीच्या जेवणासाठी रुफटॉप निवडला.. त्रिपुरी पौर्णिमेची रात्र...समोर अथांग जलाशय...साथीला जुने मैत्र...खायला अनिमिष भोजन अन वर स्कॉच... स्वर्ग अजुन दुसरा काय असणारय !!!!
सकाळचा ब्रेकफास्ट आम्ही बाहेरच्या मोकळ्या बाग कम व्हरांड्यात केला अन दुपारच जेवण मेन हॉलमध्ये.
हे रिसॉर्ट खिंड्सीला जायला एक मोठ सबळ कारण देतं हे नक्की !!!

रिसॉर्टवरुन दिसणारा तलाव :

Rsthse-resvr View-Ramtek.JPG

या दोन दिवसांच्या भेटीत खुप जुन्या आठवणींना उजाळा देऊन झाला...हुद्दा-टायटल-आढ्यता सोडुन जगायला मिळाल...दोन दिवस असीम आनंदात गेले..पुन्हा केंव्हा अस एकत्र यायला मिळणार याचाच विचार करत आम्ही खिंडसीवरुन नागपूरला यायला निघालो....मागच्या सीटवर डोळे मिटुन मी सगळ साठवून घेत होतो अन गाडीत मेहदी हसन रंगात आला होता..
... भुली बिसरी चंद उम्मीदें चंद फसाने याद आये..
तुम जो आये साथ तुम्हारे सारे जमाने याद आये .... !!!!

Ramtek-Jalashay-1.JPG

*****************************************************
*****************************************************

गुलमोहर: 

झकास आहेत फोटो. लेख छोटासा पण छान. खरंच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गडाचे, कालीदास स्मारकाचे फोटो असतील तर नक्की टाका.

प्रकाश-चिन्नु-छायाजी-मुग्धा-वत्सला-मृण्मयी-सॅम्-स्नेहा१-एक फूल्-भाऊ :
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार Happy !!!
चिन्नु : अगदी अगदी .. काही 'क्षण' जगुन आलो Happy
मृण्मयी / स्नेहा : काही फटू देशात आहेत्...शोधुन जरुर टाकीन Happy
एक फूल : खुप मोठ्ठा थँक्स !! मी जरा सांशक होतोच.. पहीले खिंसी केल.. मग खिणसी अन आता तुम्ही करेक्ट सांगितलय.. Happy बदल केलाय !

सुनिल-विशाल-एक फुल ( पुन्हा एकदा Happy ) व रुनी पॉटर :

सगळ्या मित्रांचे मनःपुर्वक आभार !!!

विशाल : याच क्रेडीट तुम्ही-प्रकाश अन अमितच ते कोकणावरच प्रवास वर्णन या सगळ्यास जायलाच हव..