मराठी अभिमान गीत....

Submitted by prashant_the_one on 28 April, 2010 - 18:02

मायबोलीकरांनो

आपल्या मायबोलीच्या अभिमानाचे गीत आपण यु ट्यूब वरती ऐकेल असेलच. परंतु हे गाणे अजून दोन स्वरुपात उपलब्ध आहे/होत आहे -

१) मराठी अस्मिता वेब साईट वरून आपण पुस्तक आणि सीडी घेऊ शकता - अप्रतीम आहे . माझ्याकडे आहे. www.marathiasmita.org
२) १ मे च्या महाराष्ट्र दिनाच्या ५० व्या वाढदिवसाच्या सुमुहूर्तावर आम्ही ते android व iphone वरती आणत आहोत - पुस्तकाप्रमाणेच त्याचे स्वरूप असेल.

आपण हे गाणं नसेल ऐकलं तर जरूर ऐका. जर ऐकलं असेल तर एक विनंती - आपल्या या मराठी माणसाच्या गाण्याची नोंद आपण या जागतिक नकाशावर आपले नाव आणि गाण्यासंबंधी तुम्हाला की वाटते ते लिहून कळवा. कौशलनी केलेल्या या अप्रतीम उपक्रमास हजारो मराठी लोकांनी एकत्र येऊन रेकॉर्डिंग करून साथ दिली आहे. चला तर आपण त्याची योग्य नोंद घेऊन त्याचा प्रतिसाद वाढवूया आणि त्याच्या पुढील मोठ्या स्वप्नांना (उदा. मराठी एफ एम रेडीओ) प्रत्यक्षात आणण्यासाठी हातभार लावूयात. हे गाणे करण्यासाठी सुद्धा हजारो सामान्य माणसांनीच हातभार लावला आहे. हा आपले सर्वांचे गाणे आहे. याला "मिले सूर मेरा तुम्हारा" पेक्षा मोठे करूयात.

माझ्या आणि माझ्या भागीदार (राजेश अभ्यंकर) तर्फे आमचा हा खारीचा वाटा की आम्ही हे गाणे मोबाईल फोन वरती विना-फायदा आणत आहोत आणि ही वेब-साईट आपली जागतिक नकाशासाठी उभी करत आहोत. मराठी असण्याचा आणि व्यवसायात असण्याचा सार्थ अभिमान वाटतो आज !!

चला तर इथे या आणि आपले नाव नोंदवा....

http://marathi.zenagestudios.com/

गुलमोहर: