मुकी

Submitted by विजयकुमार on 28 April, 2010 - 06:51

माझी मुकी बहीण
गाते मजसाठी अंगाई
मी चाले नीजवाटे
शब्द तीजमुखी राही |

बांधे माझी करंगळी
मज उष्णतेचा त्रास
भरवे मध्यानरात्री
दूधभाताचा घास |

वाहुनी माझे ओझे
शिरे एकटीच बोळी
घेऊनी मज कुशीत
फुंकर घाली कपाळी |

तिची मूक आठवण
कधी जाते स्पर्शून
न बोलल्या भावानी
थरारे मूक मन |

तिच्या इशार्‍याची भाषा
मज अवगत सहज
सार्‍या गावास ठाउक
बहीण भावाचे हितगुज |

अंतराने अंतर वाढले
शब्द जाहले मौन
वाटे डोळे लावूनी
प्रतीक्षा करते बहीण |

विजयकुमार.................
२२ / 11 / 2008

गुलमोहर: 

फारच छान लिहीलीय...!!!
वाहुनी माझे ओझे
शिरे एकटीच बोळी
घेऊनी मज कुशीत
फुंकर घाली कपाळी |---- काय सहज आल्यायत या ओळी...