अप्सरा आली (च नाही) !!

Submitted by हेरंब ओक on 22 April, 2010 - 15:26

http://www.harkatnay.com/2010/01/blog-post_19.html

"गणा आणि त्याचे साथीदार तमाशासाठी बाईचा शोध घेत असतात. शेवटी किशोर कदमला (त्याचं चित्रपटातलं नाव विसरलो) एका जत्रेत/लग्नात ती नाचताना दिसते. संगीतावर नाचणारी लयदार पावलं, मोकळे केस अशी बेधुंद नाचणारी सोनाली कुलकर्णी काही क्षणातच पडद्यावर अवतरणार असते. तिच्या घामेजल्या चेहऱ्यावर कॅमेरा स्थिरावतो."

आणि मी एकदम वैतागून म्हटलं "हात्तीच्या, अजूनही सोनाली कुलकर्णीची एन्ट्री नाही? मला वाटलेलं हीच असणार सोनाली कुलकर्णी".
हा असा काय वेंधळ्यासारखं बडबडतोय अशा नजरेने बायकोने माझ्याकडे बघितलं.
"काय झालं?" मी
"बरा आहेस ना?" बायको
"????" मी
"अरे बाबा हीच तर आहे सोनाली कुलकर्णी" बायको
"क क क क्काय" असं मी एकदम शाहरुख थाटात कोरडलो.. आपलं ओरडलो
"अग असं काय" माझा पुन्हा एकदा निष्फळ प्रयत्न
"का?"
"अगं ही कोण सोनाली कुलकर्णी? मला वाटलं ती आपली सोनाली कुलकर्णी आहे या सिनेमात"
माझ्या अज्ञानमुलक प्रश्नाला वैतागून किंवा सोनाली कुलकर्णीला आपली म्हटल्याने बायकोने शांत राहणं पसंत केलं.

त्याचं झालं काय की मी नटरंग बघण्याआधी कुठेही त्याचे प्रीव्युज, प्रोमोज, पुरस्कार सोहळे वगैरे बघितले नव्हते. (गाणी बऱ्याच दिवसां पासून ऐकतोय पण विडीओज नाही बघितले. अर्थात युट्युबच्या युगात हे एवढं अडाणी राहणं म्हणजे जरा अतीच झालं.) जिथे जिथे ऐकलं तिथे तिथे अतुल कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी असंच ऐकलं होतं. आणि जेवढे फोटो बघितले ते पण सगळे अतुल कुलकर्णीचे रांगड्या रूपातले. नंतर नटरंगचे बरेच रीव्युज वाचले.पण मला ज्या २ गोष्टी अपेक्षित होत्या त्याबद्दल एकाही ओळीचा कुठेच उल्लेख नव्हता.

१. सोनाली कुलकर्णीने कारकीर्दीत प्रथमच केलेल्या तमासगीर बाईच्या भूमिकेबद्दल
२. वय झालं असूनही (अर्थात इतकंही नाही बट स्टील) सोनालीने अप्सरा अप्रतिम रंगवलीये

वगैरे वगैरे... अशा काही ओळींची मला अपेक्षा होती. पण कुठेच काहीच न आल्याने मला वाटलं की सोनालीला अगदीच छोटी भूमिका असावी.

पण हाय रे.. ही अप्सरा वेगळीच निघाली. मी "मुक्ता" पासून कारकीर्द सुरु करून अप्रतिम अभिनय, निखळ,गोड हास्य आणि सुस्पष्टट (कित्ती स्पष्ट ते कळावं म्हणून ट ला ट मुद्दाम जोडलाय) शब्दोच्चार या प्रमुख गुणांवर पुढे असंख्य अविस्मरणीय भूमिका साकार करणाऱ्या त्या सोनाली कुलकर्णी नावाच्या अप्सरेची वाट बघत होतो. अर्थात या सोनालीला नावं ठेवत नाहीये मी. पण आपल्या (ज्यामुळे बायकोने शांत राहणं पसंत केलं त्या) सोनालीची जादू काही औरच. तिच्या मुक्ता मधल्या अभिनयाने आणि दिसण्याने वेड लावलं होतं. त्यानंतर दोघी, कैरी, देवराई, सखाराम बाईंडर (सयाजी शिंदे बरोबरचं) करत करत दिल चाहता है पर्यंतचा थक्क करून सोडणारा प्रवास. इथे खरंच टिळक जयंतीच्या दिवशी आढळणारा आगरकरांबद्दलचा (किंवा तत्सम.. तपशील चुकले असतील) जाज्वल्य पुणेरी अभिमान दाखवण्याचा हेतू नाही. पण खरंच नामसाधर्म्याने झालेल्या गोंधळामुळे (किंवा आमच्या अडाणीपणामुळे) का होईना आमची अप्सरा आलीच नाही Sad

जनहितार्थ : जुनियर सोकूचे सगळे फोटोज लावणं शक्य नाही. म्हणून "जनहितार्थ" म्हणून एक लावतोय. आणि ज्यू सोकू चा लावल्यावर "आपल्या" सोकू चा पण लावलाच पाहिजे म्हणून तो ही लावतोय Happy

junior-soku.jpgaapali-soku.jpg

(ज्यु सोकू इ-मेल forward वरून आणि "आपली" सोकू आंतरजालावरून साभार)

गुलमोहर: 

नवी पण चांगली नाचती की रे... आसं का म्हन्तोस Proud

पण मुद्दा पटेश.
मला पण तीच अप्सरा का काय वाटली होती. नशीब रे नशीब... ("आपली" बद्दल बोलतोय. Wink )

Happy चिलमाडी गाईज! 'आपली' (द्वितीयपुरुषी आदरार्थी) सोकु आता पुस्तके प्रकाशित करते आहे.(वाचा 'सोकुल'). पण तु भा पो!!!

ऋयामा, नायबा.. जुनीची सर नवीला नाय !!

सॅम, माझं पण अगदी असंच झालं होतं. पण तेव्हा मला वाटलेलं की युट्यूबवर मूळ व्हिडियो नाहीये आणि ही कोणीतरी अशीच दुसरी बया आहे.. Happy

रुपाली, आभार

वत्सला, खरंच? वा वा.. नक्की वाचायला हवं.