असंही एक नातं असू शकतं का?

Submitted by अनन्या_न on 20 April, 2010 - 11:31

मित्र मैत्रिणींनो मला तुमच्याशी आतापर्यंत जास्त चर्चा न केलेल्या विषयावर बोलायचे आहे. किंबहुना मला तुमची मते, अभिप्राय आणि सल्लाही हवा आहे. माझी एक जवळची मैत्रिण आहे. तिच्या दुर्दवान किंवा सुदैवाने म्हणा ती कॉलेजात असताना एका मुलीच्याच प्रेमात पडली. कॉलेजनंतर अजूनही त्या दोघी गाढ प्रेमात आहेत. समाजाच्या भीतीने आणि घरच्यांच्या भीतीने त्यांनी अजून कुठे कोणालाच(मी सोडून) सांगितलेले नाही. तुम्हाला कळलं असेल की मी कोणत्या विषयावर बोलतेय. एकायला खूप वेगळ आणि विचित्र वाटतय ना. जेव्हा मला प्रथम कळल तेव्हा मलाही असच वाटलं. आतापर्यंत स्त्रिपुरुषाची प्रीत खरी असे मानणार्या जगात हे म्हणजे फारच वेगळे. असं कसं एका मुलीचं दुसर्‍या मुलीवर किंवा एखाद्या मुलाचं दुसर्‍या मुलावर प्रेम बसू शकतं?? सवयच नाही कानाला असं एकायची.
तसं थोडं फार असं काही बाहेरच्या जगात काही चाललय हे ऐकल होतं. पण प्रत्यक्ष आपल्या जवळ्च्या व्यक्ति बाबत पण असेल हे पचनी पडलं नाही.
तिने मला प्रथम सांगितले तेव्हा मी तिला समजाववास वाट्लं की असे काही तू करु नकोस. हे योग्य नाही पण जसजशी मी त्या दोघींना एकत्र भेटत गेली तेव्हा मला त्यांच्यामधले बाँडीग्ज बघून ईतक नवल वाटलं. क्षणभर मला त्यांचा हेवाच वाटला. त्या ईतक्या एकमेकांना जपत होत्या. एकमेकांना समजून घेत होत्या. म्हणजे मलाच ईतक गोंधळल्यासारख झालं की जर दोन सुजाण व्यक्ति एकमेकांसाठी जर ईतक्या करत असतील. त्यांना एकमेकांची ईतकी ओढ असेल तर त्यांचे लिंगभेदानुसार असणं आवश्यक आहेच का अस वाटू लागले. आणि मुख्य तिने मला तिच हे गुपित सांगितल्यामुळे तिचं माझं नातं ही बदलत नव्हतं ती माझ्यासाठी तीच पूर्वीची मैत्रिण होती. तिच्या वागण्यात बदल झाला नाही. हे कळल्यापासून जरा बदल झालाच तर माझ्याच वागण्यात. Sad म्हणजे काय की हे सगळं आपल्याच मानण्यावरच आहे का?
समाजात काही बदल ईतके झपाट्यान होतायत मग आपण हाच का नाही स्वीकारु शकत? अर्थात त्या दोधींच्या आईवडिलांना हे झेपण अज्जिबात शक्यच नाही. आणि त्या आई वडिलांना दुखावून काही करु शकत नाहीत. आणि एकमेकींना सोडूही शकत नाहीत. मला याबाबत तिने सल्ला मागितला तर माझाही प्रचंड गोंधळ उडाला.
काही दिवसांपूर्वी कोर्टाने समलैंगिकतेला कायदेशीर केले. पण जरी कायद्याने संमती दिली तरी समाज ईतक्या सहज बदलू शकणार नाही हे तितकच खरय.
तुम्हाला याविषयावर काय वाटत? हे खरच योग्य आहे की नाही? हा प्रत्त्येकाचा वैयक्तिक निर्णय असला तरी अशा द्विधेत सापडलेल्यांसाठी काही मदत ग्रुप आहेत का?

Group content visibility: 
Private - accessible only to group members

आजकाल अशी प्रेम-प्रकरणे काही नविन नाहीत,फक्त काही समोर येतात्,काही येत नसतील,
तुम्ही त्यांच्या जवळचे असल्यामुळे सल्ला देताना ते दुखावले जाणार नाहीत किंवा काही टोकाचा निर्णय घेतला जाणार नाही याचीही काळजी घ्या,कारण माझ्या अनुभवाप्रमाणे जवळच्या लोकांच्या सल्ल्यावरुन बरेच निर्णय घेतले जातात कधी कधी ...मला वाटतं की हे कालांतराने,लग्नानंतर प्रेम (आकर्षण ) कमी सुद्धा होइल ..!

आपल्याला एखाद्याबद्दल प्रेम आहे की फक्त आकर्षण हे ओळखायचा सगळ्यात सोप्पा मार्ग म्हणजे काही दिवस त्या माणसापासुन दुर राहणे आणि दुर असताना त्याच्या आठवणीत बुडुन न जाता मन गुंतुन राहील असा काहीतरी उद्योग करणे. ह्या केसमध्ये दोघांनीही थोडे इतरांमध्ये विषेशतः भिन्नलिंगी व्यक्तींबरोबर मैत्री वाढवावी व पाहावे काय होते ते.

जर आकर्षण कमी झाले तर बरेच. नाहीतर घरच्यांच्या विरोधात जाऊन एकत्र राहतील आणि ६ महिन्यातच तोंड लपवुन परत घरी परतायची वेळ येईल.

जर एकमेकांविषयीची ओढ कमी झाली नाही तर मग काय? देवाचे नाव घ्यायचे आणि जो प्रसंग येईल त्याला जोडीने तोंड द्यायची तयारी करायची. प्रेमात एवढे तर करावे लागतेच. मग ते समलिंगी असोत वा भिन्नलिंगी.

जे अनैसर्गिक आहे त्याच समर्थनं करण्यात काहीच अर्थ नाही. असे संबंध फक्त काही कालमर्यादेपर्यंत व्यवस्थित चालु राहु शकतील , नंतर त्यांना केलेल्या चुकीची जाणिव नक्कीच होईल .

जे अनैसर्गिक आहे त्याच समर्थनं करण्यात काहीच अर्थ नाही >>
आजकाल असे प्रकार बरेच ऐकायला मिळतात, त्यावर कुणीतरी परवा म्हणताना ऐकलं..
उशिरा पर्यंत मुलं न होणं/मुलच न होणं/ समलिंगी व्यक्तींना एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं : हे सगळे कदाचित निसर्गाचे लोकसंख्यावाढ रोखायचे उपाय असू शकतात (का?)

अनीवे, मला तरी काही चूक नाही वाटत त्यात...
जोपर्यंत दुसर्‍यावर आपण कसली जबरदस्ती करत नाही, जोपर्यंत आपल्या सदसदविवेकबुद्धीला धरून आपण वागतोय, तोपर्यंत काहीही करा..
(समलिंगी व्यक्तीनी संबंध ठेवू नयेत असा समाजनियम आहे, म्हणजे तो बरोबरच असेल असं नाही.. आपण आपल्यापुरतं ठरवावं. )

भावनिक गुंतागुंत ही दोन स्त्रियांमध्येही असू शकते व दोन पुरुषांमध्येही. जिगरी यार, लंगोटी यार वगैरे वगैरे म्हणतात त्याला.... जीवाभावाची मैत्रिणही असू शकते. दोघांची वेव्हलेंग्थ अतिशय छान जुळलेली असू शकते. आपापसातले स्नेहबंध अगदी घट्ट, अतूट असू शकतात. त्याला ''प्रेम'' म्हणावे की नाही, की ही देखील प्रेमाच्या अनेक छटांपैकी एक छटा आहे (जसे मातृप्रेम, पितृप्रेम, बंधुप्रेम इ.इ.) हे त्या अगोदर त्या दोन्ही व्यक्तींनी आधी कधी गुलाबी प्रेमाचा अनुभव घेतला आहे का, हे विचारून ठरवावे लागेल.
तसेच अनेकदा एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीच्या इतक्या भावनिक प्रभावाखाली येते की त्या व्यक्तीविषयी वाटणार्‍या भावनेलाच प्रेम समजू लागते. त्यात तशी हरकत काही नाही.....
पण......

निसर्गात प्राणिजगतात आपल्याला नर व मादी अशाच जोड्या दिसतात. मादी-मादी, किंवा नर-नर नव्हे.
प्रजोत्पादनाच्या मूळ संकल्पनेला व प्रक्रियेलाच अशा जोड्या बाधक आहेत.
त्यामुळे भावनिक आकर्षणाला कितपत महत्व द्यायचं? भिन्नलिंगी व्यक्तीशी संबंध जोडल्यावरही ते आधीचे भावनिक आकर्षण अबाधित राहील काय?

यात अनैसर्गीक असे काही नाही. जे निसर्गात दिसते ते नैसर्गीक - वारंवारता कमी असु शकेल, पण अनैसर्गीक नाही. अनेक प्राण्यांमध्ये असे घडत असल्याचे दिसले आहे:
http://en.wikipedia.org/wiki/Homosexual_behavior_in_animals

हार्मोन्सशी संबंध नसुन जीन्समुळे हे होते. समाजाने हे लवकर मान्य केले तर अनेकांचे जिवन सुखावह होईल. नाहीतर काही शतकांपुर्विच्या witchhunts ना नावे ठेवता ठेवता आपणहि तेच करु.

@aschig : विकी धाग्याबद्दल धन्यवाद!
जीन्समुळे असे वर्तन होत असेल तर त्याविषयी अधिक माहिती/ दुवा मिळू शकेल काय?

समलिंगी वर्तन अनैसर्गिक नाही अशा प्रकारची चर्चा IBN लोकमत वर नुकतीच झाली होती. त्यामधे बिन्दुमाधव खिरे आले होते. हे स्वतः समलिंगी असुन समलिंगी लाकांसाठी संस्था चालवतात. तुमच्या मैत्रिणी जर खरोखरच या सर्व बाबतीत गम्भीर असतील तर नेट वर शोधल्यास अशा संस्थांचा पत्ता मिळु शकेल. तिथे कदाचित त्यांना योग्य मार्गदर्शन मिळु शकेल.

हे जरुर वाचा :
-- http://queerindia.blogspot.com/2008/05/bindumadhav-khire.html

ह्यात काही गैर नाही म्हणणे खूप सोपे आहे. मला पण तसं वाटायचं. पण आता मला दोन मुली झाल्यावर त्यांच्याबाबतीत असं काही मी "गैर नाही" attitude नी नक्किच घेऊ शकत नाही. आणि मी तर ह्या पिढीची आहे, त्यांच्या आई-वडिलांना खरच खूप कठीण आहे हे accept करणं.
अंतरजातीय विवाहाला विरोध करणारे आई-वडील आणि समलिंगी लग्नाला विरोध करणारे आई-वडील ह्यात खूप फरक आहे.

फारतर हे एक प्रकारचं शारिरीक व्यंग म्हणता येईल . त्यावर ट्रीट्मेंट होणं नक्कीच गरजेचं वाटतं . प्राण्यांमध्ये जरी असे काही प्रकार आढळत असतील तरी प्राण्यांच्या अन मानवाच्या जीवनशैलीत निश्चितच जमिन-अस्मानाचा फरक आहे .

आपण जरी असे संबंध मनापासुन मान्य करु शकत नसलो आणि अशा relationship कधीच accept करणे आप्ल्याला शक्य नसले ( मलादेखिल वैयक्तिक पातळीवर असे संबंध मान्य करणे अतिशय कठीण वाटते )तरीही शास्त्रीय दृष्ट्या ह्या गोष्टी नैसर्गिक आहे हे सिद्ध झाले आहे असे मत त्या बिन्दुमाधव खिरे यानी व्यक्त केले होते. तसेच जर नैसर्गिक दृष्ट्या समलिंगी व्यक्तीला जर मनाविरुद्ध भिन्नलिंगी संबंध ठेवण्यास भाग पाडले गेले ,किंवा त्यांच्या भावना दाबण्यास भाग पाडले तर अशा व्यक्तिंची मानसिक घुसमट वाढुन 'आत्महत्या' करण्यापर्यंत देखिल त्यांची मजल जाउ शकते. असेही त्याचे मत होते.
त्यामुळे लेखिकेच्या मैत्रिणीचे लैंगिक आकर्षण खरोखरच 'समलिंगी' या गटात मोडत असेल तर तिने लवकरात लवकर या विषयातील तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा अन स्वतःला तपासुन बघावे.

श्री: please dont take it in a negative way परंतु <<फारतर हे एक प्रकारचं शारिरीक व्यंग म्हणता येईल . त्यावर ट्रीट्मेंट होणं नक्कीच गरजेचं वाटतं . >> हा मोठा गैरसमज आहे अजुनही.

आपण हे प्रकार उघडपणे मान्य करुच शकत नाही , हे मला अगदी पटतेय. तरीही हा आजार किंवा व्यंग नाही. आणि समलिंगी व्यक्ती बरी होण्यासाठी ट्रीट्मेंट नाही. ते त्यांचे natural sexual orientation आहे. बिन्दुमाधव खिरे यानी 'पार्टनर' म्हणुन मराठीतुन या विषयावर पुस्तक लिहिले आहे.
मी वर दिलेली लिन्क वाचल्यास देखिल या बाबतीत basic माहिती मिळु शकेल.

मृदुला जर मानवाला क्लोन बनवता येत असेल तर समलिंगी व्यक्तीवर ट्रीटमेंटसाठी प्रयत्न का करता येऊ नये .
Research today is dedicated to find influences and processes which determine a persons sexual preference. Sexual preference is assumed to be determined by physical (genes), psychological and social factors (environment).

Physical causes for the development of a sexual preference could be certain brain structures or hormones and research is now being done on a certain homo gene. Psychological causes and social factors could play a role. However, not enough is known about these causes for sexual preferences and there hasn't been enough research to say anything reliable about this.

श्री, पण त्यांच्या 'रोगाचा' त्रास त्यांना होत नसेल, आणि केवळ इतरांना ते अयोग्य वाटतं म्हणुन ते त्रास देत असतील तर? जीन थेरेपीने कधीतरी असा बदल नक्कीच करता येईल - पण त्याचप्रमाणे तुमच्या-आमच्या सारख्यांना 'त्यां'च्यामध्ये पण बदलवता येईल (आणि मग लोक ओरड्तील की विज्ञान कसे वाईट आहे ई. पण तो भाग वेगळा).

रजनीगंधा, या कडे जरा दुसर्या बजुने पहा. ज्याप्रमाणे तुम्हाला समलैंगीकता अयोग्य वाटते, तितकीच विरुद्ध-लैंगीकता त्यांना जाचत नसेल असे तुम्ही म्हणु शकता का?

जीवसृष्टी हाच एक अपघात आहे. जीवनायोग्य (योग्य म्हणजे अनुकुल, चांगल्या या अर्थने नव्हे) परिस्थिती एखाद्याच ग्रहावर निर्माण होते - आपल्याला तर अजुन दुसरे उदाहरण पण माहीत नाही. पण म्हणुन जीवन हे अनैसर्गीक आहे असे म्हणायचे का? त्यावर 'उपाय' म्हणुन आपण युद्धे करतोच, दुसर्यांच्या धर्मावर (ती पण विकृती असल्यागत) हल्ले चढवतोच.

आश्चिगला अनुमोदन.
आपल्याला चुकीचं वाटतं म्हणून ते चुकीचं आहे. ते बदललं पाहिजे हा अट्टाहास नाही पटत.

माझे अनेक मित्रमैत्रिणी समलिंगी आहेत. माझ्याशी केवळ व्यावसायिक नातेसंबंध किंवा नुसती ओळख असलेलेही अनेक समलिंगी आहेत. भारतीय आणि अभारतीयही.
ते कितीही जवळचे मित्रमैत्रिणी असले तरी त्यांच्या खाजगी आयुष्यात, त्यांच्या बेडरूममधे ते काय करतात याचा आमच्या मैत्रीशी, व्यावसायिक नातेसंबंधांशी काहीही संबंध नसतो. त्यांचा लैंगिक चॉइस is really none of my business. ते लोक समलिंगी असण्याने त्यांच्या इतर कामावर परिणाम होण्याची काही गरज नसते.

लिंग आणि लैंगिकता या गोष्टींच्या पलिकडे जाऊन आपण माणसाला केवळ माणूस म्हणून बघणं कधी शिकणार?

आणि हो कुणी विचारायच्या आधीच... आपली जवळची व्यक्ती(भाउ, बहिण इतर नातेवाईक), पुढची पिढी यांपैकी कुणी समलिंगी असेल तरी माझा दृष्टीकोन हाच असेल. समलिंगी असणे या वस्तुस्थितीचे सेलिब्रेशन असेल नसेल माहीत नाही पण अ‍ॅक्सेप्टन्स नक्कीच असेल.

मलाही वाटतं, ही अतिशय वैयक्तिक बाब आहे. जो पर्यंत समाजाला प्रत्यक्ष बाधा येईल असं कोणी करत नाही तो पर्यंत समाजाला यावर बोलण्याचा काय अधिकार ?
अनन्या, फक्त प्रेम वाटणं आणि लैंगिक आकर्षण असणं यातला फरक त्या दोघींनी नीट विचार करून, समजून घेतला आहे ना इवढेच एक मैत्रिण म्हणून तुम्ही केले तरी पुरेसे आहे असे मला वाटते. काही वेळेस तात्कालीक घडामोडींनी असा विचार - केवळ विचार कोणाच्या मनात येऊ शकतो, पण त्याबद्दलची सर्वांगिण माहिती अन जाणीव नसेल तर वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे काही काळानंतर त्यांनाच मनातून याबद्दल वेगळ वाटायचा संभव आहे. पण अतिशय विचार पुर्वक आणि जाणिवपुर्वक हा त्यांचा निर्णय असेल तर एक मैत्रिण म्हणून त्यांच्या मागे ठाम उभ्या रहा. हे अवघड नक्की आहे, त्यांना, तुम्हाला, त्यांच्या सर्व नातेवाईक अन मित्र-मैत्रिणींना. पण नंतर आणखीन दोन व्यक्तिंना यात गोवून मग सगळ्यांची परवड होण्यापेक्षा, आहे ते स्विकारणेच अधिक चागले ना ?
अन समाजाचे म्हणाल तर समाज कोणाला बोल लावत नाही? मन उधाण वार्‍याचे तल्या गौरीवर बोलणारे लोकं आहेत अन अनुबंधतल्या आशुवर अन किटिवर बोलणारे लोकं ही आहेत. शेवटी आपण आपल्या नजरेत कसे आहोत हे महत्वाचे. अन स्वतःची प्रतिमा , स्वतःच्या मनात जर स्वच्छ , स्पष्ट अन छान असेल तर समाज हळूहळू , ती एक गोष्ट सोडून का होईना , स्वीकारत जातो त्या व्यक्तीला.

निसर्गात प्राणिजगतात आपल्याला नर व मादी अशाच जोड्या दिसतात. मादी-मादी, किंवा नर-नर नव्हे. प्रजोत्पादनाच्या मूळ संकल्पनेला व प्रक्रियेलाच अशा जोड्या बाधक आहेत.
अरुधंती जी , शेवटी तुम्ही म्हणताय मला बरोबर वाटतं ,आणि याप्रमाणे सगळ्यांनी वागलच पाहिजे असही वाटतं !

निसर्गात प्राणिजगतात आपल्याला नर व मादी अशाच जोड्या दिसतात. मादी-मादी, किंवा नर-नर नव्हे. प्रजोत्पादनाच्या मूळ संकल्पनेला व प्रक्रियेलाच अशा जोड्या बाधक आहेत.<<

मानवाशिवाय अनेक प्राणीप्रजातींमधे समलैंगिक प्रवृत्ती व जोड्या आढळून आलेल्या आहेत.
तसंही प्राणिजगतामधे लैंगिकरित्या प्रजनन करणारे ५०% पेक्षा कमीच भरतील. त्यातही एकाच देहात नर व मादी अवयव असलेले(हर्माफ्रोडाइट) आणि प्रजननासाठी अश्याच दुसर्‍या हर्माफ्रोडाइटची गरज असलेलेही भरपूर आहेत.

विषमलिंगी प्रवृत्तीचे प्रमाण लैंगिक प्रजनन करणार्‍या आणि हर्माफ्रोडाइट नसलेल्या प्रजातींमधे जास्त आढळून येते कारण सजीवाकडे असलेली प्रजननाची निसर्गदत्त प्रवृत्ती इतकंच.

"असंही एक नातं असू शकतं का? " का नाही? नक्कीच असू शकतं, खरंतर अशी अनेक नाती आहेत आपल्या अवती भवती.

http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/123722.html?1173890471

वरची लिंक (ज्यांना समलैंगिकता म्हणजे अनैसर्गिक किंवा चूक आहे असे वाटते त्यांनी तर जरूर)वाचा. त्यांचं मत बदलण्याचा माझा हेतू नाही, पण निदान एका स्थिर मतावर म्हणजे 'हे चूक नाही' निदान इतकं जरी अ‍ॅक्सेप्ट केलं तर समलैंगिक लोकांना समाजात मोकळेपणाने श्वास घेता येईल.

वैयक्तिकरित्या मला समलैंगिकता ही चूक वाटत नाही. शेवटी सहजीवन म्हणजे ठराविक (भिन्नलिंगी) व्यक्तिबरोबरंच असावं असं कुठेही लिहिलेलं नाही. कित्येक प्राणिमात्रां (माकड, मासे इ.) मध्येही समलैंगिक जोड्या असतात. प्रेम आणि जिव्हाळ्याला लिंगाचं बंधन कशाला? Uhoh

नीधप,आश्चिग व आरती २१ च्या पोस्टना. १००% अनुमोदन. आरती चे सर्व पोस्ट्च मस्त. व नीधपचा "लिंग आणि लैंगिकता या गोष्टींच्या पलिकडे जाऊन आपण माणसाला केवळ माणूस म्हणून बघणं कधी शिकणार? " हा प्रश्न लाख मोलाचा आहे.( मी तर या पलीकडेही जाउन असे म्हणेन की जात्,धर्म,वंश्,देश यांच्याही पलिकडे जाउन माणसाला केवळ माणुस म्हणुन बघायला शिकले तर या जगातले बरेचसे प्रश्न सुटु शकतील...:))

खर म्हणजे अनन्याने असा प्रश्न विचारला याचेच मला नवल वाटते. असे संबंध असु शकतात हे सर्व जगाला ठाउक आहे. बिली जिन किंग व मार्टिना नवरातिलोव्हा या टेनिस जगातल्या दोन महान महिला टेनिसपटु यात मोडतात हे सर्व जगाला गेली ४० वर्षे ठाउक आहे पण तरीही मी व माझ्यासारखे असंख्य टेनिस चाहते त्या दोघींच्या टेनिस कौशल्यामुळे त्यांच्या खेळावर फिदा आहेत व त्यांचे चाहते आहेत. त्यांच्या लैंगीक प्रेफरंसमुळे मला काहीही फरक पडत नाही. तिच गत कॉमेडिअन एलेन डिजनरस हिच्या बाबतीत... मला जेवढा जे लेनो आवडतो तेवढीच एलेन डिजनरसची विनोदबुध्ही व तिचा हजरजाबाबीपणाही आवडतो. तिच गत एल्टन जॉन या महान गायकाबद्दलही... मला जितकी फिल कॉलिन्सची व पॉल मॅकार्टनीची गाणी आवडतात तितकीच एल्टन जॉनचीही गाणी आवडतात. तसच क्लासिकल म्युझिकमधे मला जेवढ्या बेथोव्हन व मोझार्ट्च्या काँपोझिशन्स आवडतात तेवढ्याच फ्रेड्रिक चॉपिन, लेअनर्ड बर्न्स्टीन व पिटर चायकॉव्व्स्कीच्या स्वर्गिय डिव्हाइन काँपोझिशनही आवडतात. आणी ऑलिंपिक्समधे ९ सुवर्णपदके मिळवणारा.. स्पोर्ट्स्मन ऑफ द सेंचुरी व ऑलिंपिअन ऑफ द सेंचुरी... हे २ किताब मिळवणारा महान अ‍ॅथलिट कार्ल लुइस हा गे असल्यामुळे त्याच्याबद्दल मला असणारा आदर तसुभरही कमी होत नाही... आणखीही काही उदाहरणे द्यायची तर असेही म्हणतात की मायकेल एंजेलो व लिओनार्दो द व्हिंची.. हे रेनेसांस युगातले दोन महान पुरुषही गे होते म्हणुन त्यांच्यातला जिनिअस माझ्या द्रुष्टीत काकणभरही कमी होत नाही व सिस्टिन चॅपलच्या छतावरच्या मायकेल एंजेलोच्या मास्टरपिसकडे बघण्याचा किंवा मोनालिसाच्या चित्राकडे व व्हिंचीच्या एकंदरीच व्हर्सटाइल व अमेझिंग अचिव्हमेंटकडे बघण्याचा.. माझा दृष्टीकोन काडीमात्रही बदलत नाही. तिच बाब टेनेसी विलिअम्स, ऑस्कर वाइल्ड व डांटे या थोर नाटककार/लेखकांबाबतही... डांटेची डिव्हाइन कॉमेडि वाचताना मला तो गे आहे याने काहीही फरक पडत नाही.. किंवा स्ट्रिटकार नेम डिझायर हा प्ले ब्रॉडवेवर बघताना टेनेसी विलिअम्स्च्या सेक्श्युअल प्रेफरन्सने माझ्या नजरेत त्या नाटकाच्या आर्टिस्टिक मुल्यात कसलाही फरक पडत नाही.....

मुकुंद अहो पण ह्या सगळ्या व्यक्ती आपल्या पासून कोसो दूर आहेत. अनन्या ने मांडलेला मुद्दा हा अत्यंत जवळचा आणि भारतातला आहे. तुम्ही दिलेली उदा. पाश्चात्य देशातली आहेत, तिथे समलैंगिकतेला निदान थोडा तरी अ‍ॅक्सेप्टन्स होता/आहे.

अनीवे, मला तरी काही चूक नाही वाटत त्यात...
जोपर्यंत दुसर्‍यावर आपण कसली जबरदस्ती करत नाही, जोपर्यंत आपल्या सदसदविवेकबुद्धीला धरून आपण वागतोय, तोपर्यंत काहीही करा..
(समलिंगी व्यक्तीनी संबंध ठेवू नयेत असा समाजनियम आहे, म्हणजे तो बरोबरच असेल असं नाही.. आपण आपल्यापुरतं ठरवावं. ) >>>> मी नानबाच्या ह्या मताशी १००% सहमत आहे.

जे अनैसर्गिक आहे त्याच समर्थनं करण्यात काहीच अर्थ नाही. >>> साफ चुक. हे नैसर्गिक आहे
फारतर हे एक प्रकारचं शारिरीक व्यंग म्हणता येईल . >>> साफ चुक . हे व्यंग नाही.
निसर्गात प्राणिजगतात आपल्याला नर व मादी अशाच जोड्या दिसतात. मादी-मादी, किंवा नर-नर नव्हे.
>> प्राण्यांमधेसुधदा समलैंगिकता असते. it is adressed very beautifully "Exuberance"
sorry for repeatation of same points
पण लोकांच्या पोष्टस डोक्यात गेल्या .तुम्हाला काही गोष्टी चुक तुमच्या अज्ञानामुळे वाटतात.खरेतर ही अज्ञानी असने ही तुमची चुक आहे.
मला आठवतय लहानपणी ९वी मधे पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु dr. वि.ग.भिडे यानी आम्हाला एका विज्ञान शिबिरात rleativity theory mathematicaly शिकवायचा प्रयत्न केला होता. प्रयत्न कारण आमची कुवतच नव्हती ते समजण्याची..आम्हाला कळले नाही म्हणजे ती theory चुकीची होत नाही.

प्राण्यांमध्ये जरी असे काही प्रकार आढळत असतील तरी प्राण्यांच्या अन मानवाच्या जीवनशैलीत निश्चितच जमिन-अस्मानाचा फरक आहे .
श्री,रजनीगंधा,अरुंधती यांना पुर्ण अनुमोदन !

प्राण्यांमध्ये जरी असे काही प्रकार आढळत असतील तरी प्राण्यांच्या अन मानवाच्या जीवनशैलीत निश्चितच जमिन-अस्मानाचा फरक आहे .
>>.. अगदी बरोबर अहे तुमचे म्हणने. दुसर्‍याच्या sexual preference ना वाईट न ठरवता,त्याचा आदराने स्वीकार करणे प्राण्यांना फार व्यवस्थित जमते.माणसांना मात्र काही दशके जावी लागतील हे सत्य स्वीकारायला.

जुना जोक आहे , पण भरपूर काही घेता येइल यातुन .

१९७० : लग्न देशस्थ मुलिशिच कर
१९८० : लग्न ब्राम्हण मुलिशिच कर
१९९० : लग्न महाराष्ट्रियन मुलिशिच कर
२००० : लग्न भारतिय मुलिशिच कर
२०१० : लग्न मुलिशिच कर रे बाबा !!!

तात्पर्य इतकच की आज जे अशक्य/असन्स्क्रुतिक्/अयोग्य वाटत ते उद्या वाटेल असच नाही .
कोणास ठाऊक उद्या याच लोकान्चा आद्य म्हणून गौरव ही होईल .
तेव्हा ज्याला त्याला आपल्या मर्जीप्रमाणे जगु द्यावे . कदाचित त्यान्च्यासाठी तेच चान्गले असेल .

>>दुसर्‍याच्या sexual preference ना वाईट न ठरवता,त्याचा आदराने स्वीकार करणे प्राण्यांना फार व्यवस्थित जमते.माणसांना मात्र काही दशके जावी लागतील हे सत्य स्वीकारायला. >> arc क्या बात! क्या बात! क्या बात! Happy

आमचे पिलू होण्यापूर्वी आम्ही पहिल्यांदा युरोपात रहात होतो. तेंव्हा पहिल्यांदा असे संबंध जाणवावेत एवढ्या जवलून पाहिले. समलिंगी मुलगी इतर मुलींशी बोलताना काय विचार करत असेल असे विचार माझ्या मनात येत. पण जसा जसा वेळ त्यांच्याबरोबर दिला गेला तसे त्यांची भावनिक आणि मानसिक गरज आणि गुंतवणूक जाणवली.. आणि मग जाणवलं की हे सगळे शेवटी आपल्यासारखेच आहेत, माणूस म्हणून त्यांनाही कोणाचा तरी आश्वस्त करणारा स्पर्श हवा असतो.

आणि स्वतःच्या नातेवाईकांनी, जवळच्यांनी गे असू नये ही माझी इच्छा आहे.. पण त्यांच्यावरचा स्नेह केवळ ह्या इच्छेवर अवलंबून नाही. आपल्या लेकीच/ बहिणीच्/मैत्रिणीच अस ओरिएंटेशन असू नये असे वाटतं. पण असं झालच तर केवळ ह्या कारणासाठी मी तिच्यावर प्रेम करणं थांबवू शकत नाही.
(ह्या गोष्टीचा त्या मुलींच्या पालकांनी विचार करायचा.. आपल्या अपत्याला आपणच समाजात एकट पाडलं तर आपण कसले पालक???)

त्यामुळे >>> समलिंगी असणे या वस्तुस्थितीचे सेलिब्रेशन असेल नसेल माहीत नाही पण अ‍ॅक्सेप्टन्स नक्कीच असेल.<<< !!!!

Pages