... तुरुंग सारे!

Submitted by Girish Kulkarni on 15 April, 2010 - 21:41

**********************************
**********************************

कळा मनीच्या जुळवत होते भणंग सारे
बिनाजळाच्या अवखळ डोही तरंग सारे

उगाच आता नवी कहाणी पुन्हा कशाला
जुना पुरावा, जुनेच किस्से, प्रसंग सारे

कसे फुलावे कसे मिटावे कुणास सांगा
फुलांत बसले लपुन अनोखे भुजंग सारे

बुजवुन सारे घाव अता बेफिकीर झालो
चकवुन गेलेच बुडबुडे अन तवंग सारे

सुरा-सुधेचा उगाच बाऊ करुन बसली
भली बुरी ही व्रतस्थ सत्ये,अभंग सारे

कसे जपावे सुगंध आता मला न ठावे
गुलाबगाणी तुझी कहाणी सवंग सारे

तु जो हवेचा निषेध केला नवाच होता
नभास टाळत विहंगणारे पतंग सारे!!!

खुशीत मैत्रेय चालतो-बोलतो सदा,पण
तुझे इशारे तुझे पसारे तुरुंग सारे......!

***********************************
***********************************

गुलमोहर: 

सही रे....

तु जो हवेचा निषेध केला..नवाच होता
इथे जमीनीस बांधलेले....पतंग सारे!!! ------ हे वाचताना थोडा त्रास होतोय पण.... लय थोडी बिघडतीये.... बघ बरं पुन्हा....

क्या बात है!!
<<तु जो हवेचा निषेध केला..नवाच होता
इथे जमीनीस बांधलेले....पतंग सारे!!! >> हा शेर आवडला!!

गिरीशजी, खुप छान गझल..रवींना अनुमोदन..तो शेर एकदम क्लास आहे, पण लयीत नाही.

तु जो हवेचा निषेध केला..नवाच होता
इथे जमीनीस बांधलेले....पतंग सारे!!!
__________________
तु जो हवेचा निषेध केला..नवाच होता
जमीन होती धरून येथे..पतंग सारे!!
......जमतंय का? Happy

तु जो हवेचा निषेध केला नवाच होता
नभास टाळत विहंगणारे पतंग सारे!!!
सानी मिसरा कळला नाही (I mean connection कळलं नाही)

उगाच आता नवी कहाणी पुन्हा कशाला
जुना पुरावा, जुनेच किस्से, प्रसंग सारे
आवडला.. खूप simple आहे, पण तरी गझलेचा शेर वाटतो (अर्थात मला :))

'भुजंग' आवडला.
गुलाबगाणी कळला नाही.

'बुडबुडे' अर्थाच्या बाबतीत जरा अर्धवट वाटला..
एकूण गझल अजून सफाईदार झाली असती असं वाटलं..
चुभुद्याघ्या.
पुलेमशु. Happy

उगाच आता नवी कहाणी पुन्हा कशाला
जुना पुरावा, जुनेच किस्से, प्रसंग सारे

खासच!
तुरुंग वाचताना इब्ने-इन्शां यांच्या
"कूचे को तेरे छोडकर जोगी ही बन जाएं मगर
जंगल तेरे, पर्बत तेरे, बस्ती तेरी, सहरा तेरा" ची आठवण झाली. Happy

गझल छान झाली आहे. शेरही उत्तम आहेत.
पण र्‍हस्व दिर्घाच्या कसरतीमुळे काही ठिकाणी खटकते आहे.
उदा. -
तु जो हवेचा निषेध केला नवाच होता
नभास टाळत विहंगणारे पतंग सारे!!!

कसे फुलावे कसे मिटावे कुणास सांगा
फुलांत बसले लपुन अनोखे भुजंग सारे

सुधारणा केल्यास आणखी मजा येईल.

काही शेर लख्ख कळाले नाहीयेत(मा बु दो Sad )... पण गझल आवडली.
पतंग आणि तुरुंग खासच भाउ.

रवि-छायाजी-गणेश-सुमेधा-मुटेसाहेब-क्रांति-मि.भारद्वाज्-प्रकाश : सगळ्या मित्रांचे मनःपुर्वक आभार!!!
नचिकेत-अभिजीत : सगळ्या सुचनांची नोंद घेतलीय.. असेच सांगत रहावे :-)!!!
पुलस्तीजी : आपल्या प्रतिसादाबद्दल विशेष आभार.... खुप पुर्वी तुम्ही सांगितलेल "तुम्ही वृत्तातही लिहीत जा.." आता कुठे थोड करायला यायला लागलय... त्यामुळे हे तंत्राच्या गावा जायच श्रेय द्यायचच झाल तर मी त्या आपल्यात झालेल्या विपुतल्या चर्चेला देईल. Happy

सस्नेह : गिरीश