प्रायश्चिताचे जगणे..

Submitted by suryakiran on 8 April, 2010 - 06:16

भेटशील का गं मला,
पुन्हा त्या वळणावरती,
सावली असेल प्रेमाची,
अन सुखे असतील भोवती..

माझ्या नजरेतून ओघळतील,
हळवे ओले मोती,
अबोल्यातूनच विचारतील ओठ,
इतके दिवस तू कुठे होती..

तुझ्या पापण्याचे काठही ,
होतील ओले मला असे पाहूनी,
नको असतील तेव्हाच मला उत्तरे,
तुला असे मुसमुसताना पाहूनी..

नसेल कुठलाच राग ,
नसेल कुठलाच आक्षेप मनी,
फक्त पुन्हा नको जाऊस,
असे मला एकले सोडूनी..

माझी चूक कळलीये मला,
रोजची शिक्षा टाकते मला जाळूनी,
मज काहीच वाटत नाही त्याचे,
तुला स्मरणात रोज असे गिरवूनी..

आयुष्यभर मान्य आहे मला
हे प्रायश्चिताचे जिवघेणे जगणे,
पण त्यासाठी का बरे असावे तुझे,
माझ्यापासूनी कायमचे दुरावणे..

--सुर्यकिरण

गुलमोहर: