पालवी

Submitted by ललिता-प्रीति on 3 April, 2010 - 01:21

आमच्या घराच्या खिडकीतून हे असं दृष्य दिसतं.

DSC01318.JPG

वसंत ऋतू काय आला आणि बघता बघता हे चित्र पालटलं.

DSC01358.JPG

पिंपळाच्या निष्पर्ण फांद्यांच्या टोकावर एक निराळीच लगबग सुरू झाली.

DSC01348.JPGDSC01352.JPGDSC01356.JPGDSC01357.JPG

आणि एक दिवस सकाळी सकाळी या कोवळ्या आश्चर्याच्या निरनिराळ्या आविष्कारांनी स्वतःच्या उपस्थितीची मला दखल घ्यायला लावली.

DSC01316.JPGDSC01350.JPG

... आणि मग मला दर तासा-दोन तासांनी ती दृष्य न्याहाळण्याचा नादच लागला.

DSC01324.JPGDSC01347.JPG

निसर्ग हळू हळू कात टाकू लागला.

DSC01343.JPG

ताजी, लुसलुशीत, कोवळी, मऊशार पानं! जणू गोंडस, गोजीरवाणी बाळं! त्यांच्या लीला बघाव्या तितक्या थोड्या!

DSC01345.JPGDSC01342.JPG

मानवानं सारासार विचार करणं सोडून दिलेलं असलं तरी सृष्टीनं अजूनही आपला आशावाद सोडलेला नाही. नव्या उत्साहानं, उमेदीनं प्रत्येक फांदी या तान्ह्या बाळांच्या बोबड्या बोलांत हरवून गेलीय.

DSC01355.JPGDSC01346.JPG

या सुरूवातीच्या टप्प्यात वसंतातल्या उन्हाच्या रूपातलं मऊमऊ भाताचं मंमं या बाळांना पुरेसं आहे. पण जसजशी ती मोठी होतील, त्यांचं विश्व विस्तारेल तसतशी त्यांची भूक वाढेल. ते पावसाची वाट बघायला लागतील.
ते जेवण त्यांना हवं तितकं, हवं तेवढं... पुनःपुन्हा, वर्षानुवर्षं... आपण पुरवू शकू??
जरा विचार करा.

गुलमोहर: 

मानवानं सारासार विचार करणं सोडून दिलेलं असलं तरी सृष्टीनं अजूनही आपला आशावाद सोडलेला नाही. नव्या उत्साहानं, उमेदीनं प्रत्येक फांदी या तान्ह्या बाळांच्या बोबड्या बोलांत हरवून गेलीय.

खुप बरे वाटले गं हे वाचुन..... खरेच माझेही लक्ष गेले नाही आजुबाजुला... माझ्या ऑफिसातलाच एक पिंपळ पुर्ण सोनेरी लाल होऊन चमकतोय..

विद्यापीठाच्या मागे राह्तेस ना तू.. तिथ्लेच आहेत का हे फोटू? >>> हो. हे पिंपळाचं झाड विद्यापिठाच्या आवारातलंच आहे.

खुप बरे वाटले गं हे वाचुन..... खरेच माझेही लक्ष गेले नाही आजुबाजुला... माझ्या ऑफिसातलाच एक पिंपळ पुर्ण सोनेरी लाल होऊन चमकतोय. >>> Happy चला, या प्रकाशचित्रांमुळे अजून एक संवेदनशील नजर निसर्गाकडे वळली.

ललिता, खूप संदर गं मला तो काही दिवसापुर्वी प्रदर्शित झालेला हरिश्चंद्राची फ्याक्टरी सिनेमा आठवला.. तसा काही नाहीये ना विचार तुझा..

मला तो काही दिवसापुर्वी प्रदर्शित झालेला हरिश्चंद्राची फ्याक्टरी सिनेमा आठवला.. तसा काही नाहीये ना विचार तुझा. >>> नाही रे बाबा! तेवढी आपली कुठली लायकी? आपल्या आवाक्यात जे आहे ते करायचं. Happy

मस्त गं लले.... दृष्टी पण तशीच सौंदर्योपासक पाहिजे. माझी तर नजरही जात नाही झाडाझुडपांकडे. मग पालवी वगैरे नजरेत टिपणं दूरच.. आत मुद्दाम लक्ष देईन. Happy

माझी तर नजरही जात नाही झाडाझुडपांकडे. मग पालवी वगैरे नजरेत टिपणं दूरच.. आत मुद्दाम लक्ष देईन >>> इतकी वर्षं माझीही हीच अवस्था होती.
पण गेल्या एक-दीड वर्षात मी 'वृक्षमैत्र'चे काही कार्यक्रम अटेंड केले तेव्हापासून माझा दृष्टीकोन बदलला. Happy

दूरदर्शन काळा पांढरा दिसायचा तेव्हाच्या डॉक्युमेंट्रीची आठवण झाली.
त्यात एका टिपिकल आवाजात कॉमेण्ट्री असयची.. " हा एक होतकरु तरूण. पण परिस्थितीने गांजलेला...................... याला आपले म्हणा ". कुणाचा होता आठवत नाही. Proud

तुझ्या सगळ्या कॉमेंट्स त्या आवाजात वाचल्या... Proud

पर्‍या Lol मी पण म्हणून बघितल लले तस

एकदम पटेश लले. रोज सानुला शाळेच्या बस मधे बसवल की रेल्वेचा ब्रिज चढताना एक झाड आणि थोड पुढे गेल की सुर्याचा कोवळे किरण पसरलेला ला गोळा एकदम मस्त वाटत ते बघायला. त्यांना गुड मॉर्निंग करायच नी ट्रेन ला पळायच, सकाळच मस्त होऊन जाते Happy

छान ! Happy

पहीला आणि दुसरा फोटो ...
वसंत ऋतू आला आणि बघता बघता ती समोरची इमारतही हळूहळू खाली सरकली... Happy (हे असच हां)

तुमचा निसर्गाबद्दचा दृष्टीकोन/विचार छान आहे .... Happy

लले, मस्तच Happy मी पण हापिसच्या बस मधे बसले की कंपाऊंडमधली झाडे, पालवी निरखत असते. पण फोटो काढायचं सुचलंच नाही कधी.

अश्वे मी एकदा थांबुन आमच्या रेल्वे ब्रिज वरुन सुर्य बाप्पा टिपायला गेले मोबाईल मधुन पण लोकांनी लोटल मला ट्रेन चुकेल म्हणुन, बघवत नाही त्यांना कोणी फोटु ग्राफर झालेल दुसर काय Wink Proud आणि मेला मोबाईलचा कॅमेरा तो काय त्यात मावेचना ते (सुंदर) ध्यान Proud

आणि मेला मोबाईलचा कॅमेरा तो काय त्यात मावेचना ते (सुंदर) ध्यान >>>> अगं मोबाईल सूर्याला चिकटवायचा नाही गं, जरा लांबून काढायचा फोटो Lol

मधुन पण लोकांनी लोटल मला ट्रेन चुकेल म्हणुन, >>>> तेवढ्यात क्लिक नाही ना केलंस? नाहितर भलताच चेहरा सूर्याच्या जागी यायचा फोटोत.

कविता तरी डोंबिवलीचा ब्रीज आता चांगला ऐसपैस झालाय, तरी ढकललं?

ललिता, मला फोटोंपेक्षाही लिहीलेलं आवडलं आणि मनापासून पटलं. ही लुसलुशीत कोवळी पानं बघायला मलाही प्रचंडच आवडतं.

@आडो, हो ना ग ब्रिज मोठा झालाय पण सकाळी सगळे धावतच असतात ना. तिकडे ३ नंबरवर दादर ट्रेनची अनाउंसमेंट होत असते, ५ ला डबल फास्ट ची नी त्याच वेळी स्लो डोंबिवली सुटायची वेळ झालेली असते मग लोक तर धावणारच ना Proud (गेल्यावर्षी पर्यंत मी पण अशीच पळत सुटायचे. आता लेकिच्या कृपेने लवकर निघते म्हणुन इकडे तिकडे बघत एखादी ट्रेन सुटली तरी चालत :P)

निळ्या आकाशाच्या बॅकग्राऊंड वर ती लालभडक पालवी फारच छान दिसतीये.

लले, मला अश्या डिझाईन चा ड्रेस पाहिजे तुझ्याकडून वाढदिवसानिमित्त :हट्ट करणारी 'धाकटी' बाहुली:

Pages