महाराष्ट्राच्या आराध्यदैवतास सादर वंदन

Submitted by sabha on 31 March, 2010 - 04:50

महाराजांची किर्ती पाहुन प्रत्यक्ष सुर्यनारायण देखील त्यांच्या चरणाशी नतमस्तक झालेला आहे.

RAIGAD-1 copy

महाराष्ट्राच्या आराध्यदैवतास सादर वंदन.

गुलमोहर: 

छान!!!

लै भारी!
महाराजांची किर्ती पाहुन प्रत्यक्ष सुर्यनारायण देखील त्यांच्या चरणाशी नतमस्तक झालेला आहे.:)

खरंच सही फोटोग्राफी!!!!
परफेक्ट अँगल!!

लै भारि.....पण राजगडावर या पुतळ्याशेजारि अशि कमान नाहि कि जिथुन हा एन्गल घेता येइल.....

नमस्कार मि. भारद्वाज,

लै भारि.....पण राजगडावर या पुतळ्याशेजारि अशि कमान नाहि कि जिथुन हा एन्गल घेता येइल.....

सर्व प्रथम हा फोटो "राजगडावरील" नसुन "रायगडावरील" होळीचा माळ येथिल आहे.

अशि कमान नाहि कि जिथुन हा एन्गल घेता येइल....

आपण बरोबर ओळ्खलेत. फोटो तिथलाच असला तरी त्यावर फोटोशॉपमध्ये संस्कार केलेले आहेत. मुळच्या फोटोत आजुबाजुला लोक्स ऊभे होते त्यामुळे कमान टाकुन लोक्स झाकायचा प्रयत्न केला आहे. असो. प्रतिक्रियांबद्द्ल सर्वांचे आभार.

माफ करा, पण देवादिकान्च्या मागिल "प्रभावळी"-तेजाचे गोल चित्रात बघण्याची सवय असलेल्या मला, कुणाच्याही "पायाशी" सूर्य दाखविणे तितकेसे भावले नाहीये! देव मस्तकी धारण करावा असा सन्केत आहे. सूर्याची उपमा देणे वेगळे अन सूर्य पायाशी दाखविणे वेगळे, सूर्यकिरणान्नी पदस्पर्श केला असे म्हणणे वेगळे अन तेजाच्या उद्गात्यालाच पायदळी दाखविणे वेगळे.
स्पःष्टच सान्गायचे तर छ.शिवाजी महाराज या आराध्य दैवताला मोठे करुन दाखविण्यासाठी, ज्या उगवत्या/मावळत्या सुर्यास प्रत्यही त्यान्नी देखिल वन्दन केले असेल त्या हिन्दु धर्माच्या आराध्य दैवतास पायापाशी दाखविणे नैतिकतेला धरुन नाही. एका देवतेला मोठे करण्यास दुसर्‍या आपल्याच धर्मातील मूलभूत देवतेस वाकविणे अयोग्यच होय.
याच पुतळ्याचे, अनेकान्नी, सूर्यबिम्ब पुतळ्याच्या डोक्याच्या मागे असताना काढलेले अनेक फोटो बघायला मिळतील, त्यान्च्याशी जरुर तुलना करुन बघावी.
यावत्चन्द्रौ दिवाकरौ अशा शब्दात सूर्य चन्द्राची आठवण काढून, जोवर आकाशात सूर्य चन्द्र तळपत अस्तील, तोवर हे राजा, तुझी किर्ती दशदिशात पसरलेली राहूदे असे म्हणायची पद्धत आहे, अन त्यातिलच दिवाकर अर्थात सूर्याला वरील पद्धतीने ........ असो!
उत्साहाच्या भरात वा वेगळे काही करुन दाखविण्याच्या इच्छेने अशी चूक अजाणता होऊ शकते, पण काळजी घ्या! Happy

बाकी फोटो/कलाकारी छान