* * * केत्याची पैज * * *

Submitted by ऋयाम on 30 March, 2010 - 12:10

१: रेइको लॉज - १
२: "मानसी!!" (रेईको लॉजः भाग २)
३: * * * केत्याची लॉटरी * * *

ही कथा वरील कथांमधील पात्रांबद्दल आहे, परंतु पहिल्या दोन भागांप्रमाणे 'भयकथा' नाही.
ही कथा, भाग ३ मधल्या घटनांनंतर घडणारा पुढचा भाग आहे. त्यामुळे, आधी भाग ३ अवश्य वाचा! Happy

-------------------------------------------

"चल रे. निघतो.", केत्या म्हणाला....
गिर्‍याच्या चेहेर्‍यावरचं प्रश्नचिन्ह काही केल्या जात नव्हतं.
केत्याला नुसत्या आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, पण तो ते दाखवुन देत नव्हता.
"चल. फोन कर पोचलास की..." गिर्‍या म्हणाला, "आणि काही प्रॉब्लेम झाला तरी.."
"हो रे...." म्हणुन केत्या निघाला, आणि गिर्‍यानं घराचं दार लावलं.
"खाली सोडायला तरी येऊदे" असं खरं तर गिर्‍या म्हणत होता, पण केत्यानंच "नको नको" करुन येऊ दिलं नव्हतं.

शनिवारी सकाळी ६ वाजता अचानक उठुन आपला रुममेट "चल रे, निघतो" म्हटला,
तर कोणत्याही सर्वसामान्य माणसाच्या चेहेर्‍यावर जेवढं मोठं प्रश्नचिन्ह येईल, तेवढंच मोठं प्रश्नचिन्ह
गिर्‍याच्या चेहेर्‍यावर उमटलं होतं.
"बर, काल रात्री काही विषयही काढला नाही पठ्ठ्यानं?", गिर्‍याच्या मनात तेच चालु...
"या माणसाचं काही खरं नाही. कधी काय करेल... "
"अम्मा" लोकांना फोन करावा का? नाहीतर जाउदेच. जरा "बर्‍या" वेळेला करु. १० वाजता वगैरे .
असाही तोपर्यंत "राजे" करतीलच फोन. असेल जवळच कुठेतरी. काही भारतात वगैरे नाही पोचणार.. Happy

पण इतकं मनाला लावुन घेईल वाटलं नव्हतं नाही?", गिर्‍याला २-३ आठवड्यांपुर्वी झालेला प्रसंग आठवला आणि थोडंसं हसुच आलं...
"आमच्या जीवावर इथे रहाताय साहेब.." , केत्याची फजिती केल्यावर गिर्‍या म्हणाला होता
....आणि त्यावर केत्या जो काही चिडला होता तेही आठवलं.
एकाच वेळी गिर्‍या आणि अमित-मानसी अशा तिघांनीही चिडवल्यामुळं साहेब बिथरले होते..
"घाबरतोय काय मी कोणाला? एकटा फिरुन दाखवतो ह्या जपानमधे...
मला काही फरक पडत नाही. ही जपानी भाषा वगैरे सगळं गेलं "क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष" मधे!",
आणि अचानक 'मानसीही आहे' लक्षात आलं आणि तो गप्प झाला.

"गिर्‍या.... बेट लावतोस काय? पैज-पैज..?"..
"रेकॉर्ड आहे आपलं... कधी हारलो नाहीये.. " केत्या गिर्‍याच्या दिशेने हात पुढे करत म्हणाला..
"कितीची पैज? आणि कसली?? " अमित.
"की तुम्हा कोणाच्याही मदतीशिवाय मी एकटा 'टोक्यो बाहेर फिरायला जाऊन येणार'...
तेही अख्खा दिवस.... कधीही नाही गेलो अशा ठिकाणी..." केत्या तावातावाने बोलत होता.

"डन!" हसु दाबत गिर्‍या म्हणाला, " "स्टारबक्स" कॉफीची पैज. ठिक??? "
"नाही! मला पैसे हवेत! " केत्या..
"काय? " गिर्‍या + अम्मा लोक्स!
"हो. " केत्या म्हणाला, "कॉफीचा 'कागदी मग' का ठेवणार आहे, माझी 'ट्रॉफी' म्हणुन?"
"काहीतरी मेमोरेबल गोष्ट घेईन." केत्या चांगलाच पेटला होता.
"बर बर" पाच-पाचशे येन. "डन?" गिर्‍या.
"डन." केत्या, गिर्‍या आणि अम्मा लोकांनी हात मिळवले होते.

सारं आठवुन गिर्‍याला हसु आलं पण "हे साहेब एकटे कुठे गेले असतील?" याचा काहीच अंदाज लागेना.
एक एसएमएस करुन ठेवावा का? "कुठे आहेस सांग.." म्हणुनही वाटलं खरं..
पण असुदे. जे असेल ते १० नंतर....
आत्ता झोपुया...
.........................
.........................
.........................

न राहवुन शेवटी "कुठे आहेस सांगत रहा थोड्या थोड्या वेळानं.." असा एसएमएस करुन गिर्‍या झोपु लागला.
.................
.................
उत्तर म्हणुन केत्याचा एसएमएस आला.
गिर्‍यानं पाहिलं, तर एक "फुल" आणि एक "स्माईली" होता....
"म्हणजे?? जाऊदे..."
...ग्लासभर पाणी पिउन गिर्‍या "तुर्तास झोपायला" निघुन गेला.......

दुपारचे १२:३० होऊन गेले होते..
केत्याला, "काय रे जेवलास काय?" असा एसएमएस करुन गिर्‍या हॉटेलात शिरला.
"साबा शिओयाकी. योकुयाकी दे ओनेगाई शिमास.", तिथल्या बाईला ऑर्डर दिली, " 'साबा' मासा द्या."
चांगला फ्राय करुन...

----------------------------------------------------

"घरातुन बाहेर पडलो खरं पण कुठे जायचं काहीच ठरवलं नाहीये. काय करावं?" केत्याला काही कळेना.
"आणि आता संध्याकाळ होईपर्यंत परत जाता नाही येणार!".. पण त्याची तयारी तो करुन आला होता.

सकाळपासुन ३-३.५ तास टोक्यो स्टेशनवरच्या 'स्टारबक्स' मधे घालवले होते.
तिथंच त्याचं ऑफिसही होतं. म्हणुन तर माहिती होतं हे 'स्टारबक्स'.
तिथं काही पुस्तकं वाचत, गाणी ऐकत बसला होता.
तेवढ्यात गिर्‍याचा एसएमएस, "काय रे जेवलास काय?"
केत्याला समजेना काय उत्तर द्यावं.
मधेच वाटलं परत जावं... आपलेच मित्र आहेत. त्यांच्यापुढे कसला मान आणि कसलं काय?
पण मग तो चेष्टेचा प्रसंग आठवला. तो त्याच्या भलताच जिव्हारी लागला होता.

--------------------------------------------------

"काय साहेब? उठलात काय?" गिर्‍या.
"अरे, मी बोलतीये.." मानसी म्हटली.
"बर बर... उठले का साहेब?"
"हो.. जेवण पण झालं. थांब देते एक मिनीट.", मानसी.
.........
"काय रे? काय झालं?" अमित.
"काही नाही रे...."
.......................... आणि गिर्‍यानं सगळा प्रकार अमितला सांगितला.
"तुला काय वाटतं?" अमित गिर्‍याला म्हटला.
"चिडलाय बराच. दिवसभर कुठेतरी फिरुन येईल....
कुठेही जाऊन आला, तरी आपण त्याला 'मानलं बाबा!' म्हणु.. काय? ", गिर्‍या बोलत होता... "
"..आणि पुढच्या आठवड्यात आहेच परत........ गिर्‍हाईक! काय?? "
"डन!!" फोनवर असुनही उत्साहात 'टाळी' देत अमित म्हटला..

अमितचा फोन ठेवतो, तोच गिर्‍याचा फोन वाजला.
केत्याचा एसएमएस. "इथंच आहे अरे.. संध्याकाळी भेटुया. "
आपल्याला वाटलं, तसंच सारं होतंय बघुन गिर्‍याला फार हसु येत होतं...

----------------------------

रात्रीचे साधारण ८ वाजत आले असतील.
गिर्‍याचा फोन वाजला.
"केतन बोलतोय... कुठाय्स??"
"मी खालीच आहे. अम्मालोक पण आहेत." , गिर्‍या.
"अरे.. मी स्टेशनवर आहे. थांबा, आलोच..."

तिघांनी केत्याचं स्वागत केलं. आणि कौतुकही.
"एकटा बाहेर फिरुन आल्याबद्दल!!! "
"कुठे गेला होतास??" मानसीनं विचारलं.
"टोक्यो स्टेशन" जवळच एक मोठ्ठं मॉल आहे. तिथंच होतो.
आणि सकाळी स्टारबक्स... दोन कप कॅफे लाते. 'एक साकुरा लाते' आणि एक 'माच्चा लाते. "
केत्या भोळेपणानं सांगत होता.
यावर अमित एवढ्या जोरात हसायला लागला, की गिर्‍याला तो आवरेना.
मग तोही हसु लागला. मानसीही सामिल झाली.

केत्या रागानं लालबुंद झाला आणि एक अक्षरही न बोलता स्टेशनच्या दिशेने निघाला.
ह्या तिघांचं लक्ष गेलं पण ते काही बोलेपर्यंत तो जिना उतरुन सब-वे मधे पोचलाही होता.
फोन लागेना. गिर्‍या पळत गेला पण तोपर्यंत लकीली केत्याला ट्रेन मिळाली होती.
लकीली फॉर केतन...

--------------------------------------

" बास. फार झालं.. समजतात काय हे? " केत्या फारच चिडला होता.
उलट्या पावली टोक्योला परत आला.
सकाळपासुन ज्या 'स्टारबक्स' मधे बसला होता, तिथेच समोर ते 'एच. आय. एस.' ट्रॅवल कंपनीचं ऑफिस होतं.
"हायेस्ट इंटरनॅशनल स्टँडर्डस", एच आय एस.

एक सेकंद विचार केला. पण एकच सेकंद!
आणि तिकीट काढलं...
बसगाडी, १० वाजता निघणार होती. आणि तिथे सकाळी ५ ला पोहोचणार.
विशेष काही खायचा मुड तर नव्हता.
एक छोटसं सँडविच आणि कोक घेऊन तो वाट बघत बसला.
बरोब्बर १०वा. गाडी निघाली.

---------------------------------------

"फोन ऑफ केला आहे साल्यानं..." अमित काळजीच्या स्वरात म्हणाला.
"तरी मी सांगत होते.." मानसी.
"काही नाही गं.. लास्ट ट्रेननं येईल. तुम्ही जा घरी आणि झोपा." गिर्‍या त्यांना समजावत होता.
"मी समजावतो बरोबर त्याला. काय रे?" अमितला डोळा मारत तो म्हणाला.
चला.... "ओत्सुकारे!!" .. "बाय बाय" करुन लोक आपापल्या घरी गेले.

एक केत्या मात्र घरापासुन लांब कुठेतरी चालला होता.
भाषा येत नसुनही. जपानमधे एकटाच!!!

----------------------------------------------------

गाडी थांबण्याच्या धक्क्याने केत्याला जाग आली.
"पोचलो वाटतं... "
सामान उचलुन तो गाडीतुन बाहेर पडला.
बाहेर जाम थंडी पडली होती.
"गाडीमधे हीटर असल्यानं जाणवलं नाही, नाई?" केत्या.. "
... आणि कमाल आहे? उजाडलही नाहीये अजुन..."

गाडी निघुन गेली. लोकंही गेले.
स्टँडवर केत्या एकटाच उभा होता.
कोपर्‍यात एक दुकान दिसत होतं, जिथं लाईट लागला होता.
"काहीतरी गरम घ्यावं" मनात विचार आला आणि तो तिकडे जायला निघाला.
दुर एक टेकडी दिसत होती.... "काय असेल तिकडे??" केत्याच्या मनात आलंच..
पण आधी चहा घेऊ म्हटला...

वाटेतच उजवीकडे, त्याला एक बौद्ध मंदिर दिसलं.
केत्या आवारात शिरला.
देवाला नमस्कार करुन, बाहेर टांगलेली घंटा वाजवली.
तिचा तो घणघणता आवाज, सार्‍या शांततेचा भंग करुन गेला.

"नमस्कार क्योटो!" बाहेर येऊन केत्या म्हणाला...
"जपानच्या आद्य सांस्कृतिक स्थळाला अस्मादिकाचा नमस्कार!!!"

***************************************************************************
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\///////////////////////////////////////////////////
***************************************************************************

दुकानातुन गरम "चहा" विकत घेऊन केत्या बाहेर निघाला.
ती 'टेकडी' त्याला खुणावत होती.
"सह्याद्रीच्या कुशीत खेळलेली पोरं... अशी टेकड्यांना घाबरु लागली तर थु! आहे त्या जिंदगीवर!"
बर्‍याच काळानंतर कॉलेजमधले ते ट्रेक्स, ते डायलॉग्स आठवुन त्याला स्फुरण चढु लागलं..
विचार करायच्या आत पाय तिकडेच वळाले. नाही बंदच झाले होते विचार.
आता पावलं झपाझप पडु लागली होती...

वाटलं तितकी लहान नव्हती टेकडी, पण केत्याही काही कमी नव्हता.
झपाझप चढत जात होता.
बरोबर सामानही फार नव्हतंच. एक सॅक तर होती...
असा बाहेर कुठे यायचा विचारही केला नव्हता...
कॅमेरा मात्र होता. पण अजुन काही तो उपयोगी पडला नव्हता..
अजुन तरी...

केत्या अर्धं अंतर चढुन गेला असेल, टेकडीवर..
अचानक उजाडु लागलं.
उकडायलाही सुरुवात झाली, त्यानं स्वेटर काढुन बॅगेत टाकला.
आणि तो परत चढु लागला.

.................................
................................

आता लख्ख उजाडलं होतं.
टेकडीवर पोचयला थोडंच अंतर बाकी होतं.
पण एक मोठ्ठा दगड वाटेत दिसत होता.
बाजुने वर जायला चिंचोळी जागाही होती.
एक श्वास घेऊन केत्या चिंचोळ्या जागेकडे निघाला.
जोर लावुन उडी मारली आणि एका दमात तो चढला.
समोर पाहतो तर भलं मोठ्ठं पठार दिसत होतं...

क्योटो.. जपानच्या पुर्वीच्या राजधानीमधे "साकुरा" फुलला होता!

sakura_!.jpg

साकुराची फुलं जितकी झाडावर होती, तितक्याच त्या फुलांच्या पाकळ्या रस्त्यावरही पसरल्या होत्या..

जपानचा राजा, युद्धावरुन नुकताच परतलाय.
ऐन वसंताचा मौसम आहे आणि खास त्याच्या स्वागतासाठी जणु काही सडा घातला गेलाय फुलांचा!

त्यानं त्या झाडाला लागलेला एक गुच्छ तोडुन घेऊन त्याचा वास घेतला.
अतिशय मंद पण सुंदर असा गंध दरवळुन गेला..
आहा! साकुरा!!!

झाडाला टेकुन तो खाली बसला.
या क्षणाला त्याला गिर्‍या, अमित, मानसी, तो राग, भांडण.. सार्‍याचा विसर पडला होता.
ऑनसाईट.. जॉबमधले प्रॉब्लेम्स..
ती पैज! एकट्यानं ट्रिप!
........ सारं सारं कुठेतरी रस्त्यातच सोडुन तो एकटाच आत्ता या टेकडीवर आला होता.
मन मोकळं झालं होतं. हलकं झालं होतं...

आता तिथं तिसरं कोणीही नव्हतं.
फक्त तो आणि साकुरा!

"साकुरा!!!" डोळे मिटुनच तो बोलला...
......आणि अचानक ओ ऐकु आली... "हाई??" ...... "काय??"

"दाइजो~बु देशो~ का? " ती म्हटली.. "सारं ठिक आहे ना?"
केत्यानं खाडकन डोळे उघडले.
समोर 'किमोनो' घातलेली ती उभी होती....

केत्या उठुन उभा राहिला.
ती केत्याकडे निरखुन पाहु लागली.
केत्या हसला.
तीही हसली.
"हसल्यावर कातिल दिसते! " म्हटलंच होतं! आपला अंदाज चुकणार नाहीच..... केत्या.

पुढे काहीतरी बोलायचं होतं पण आता भाषेचा प्रश्न त्याच्याकडे पाहुन खदखदा हसत होता.

आपल्या आढ्यताखोर स्वभावाचा आज पहिल्यांदाच त्याला थोडा राग आला.
"काय बिघडलं असतं थोडं जपानी शिकलं असतं तर??"
क्योटो आपलं स्वागत करताना इतकं काही देतंय आणि आपण असे रित्या हाताने आलोय...
आज भरभरुन हे सारं वैभव जपान आपल्यासमोर उलगडतोय...
ते मंदिर.... ही शांत टेकडी! आणि वसंतात हा " साकुरा! "....... शेवटाचा शब्द 'साकुरा' तो नकळत बोलुन गेला.
.. आणि ती परत म्हणाली "हाई??" ...... "काय??"
"दाइजो~बु देशो~ का? " ती म्हटली.. "सारं ठिक आहे ना?"

केत्याला एक अक्षरही कळत नव्हतं.
"साकुरा. नेम.. साकुरा. माय नेम... " ती केत्याला म्हणाली.
"ओह! आय सी.." हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे करत केत्या म्हणाला, "मायसेल्फ केतन. केतन फ्रॉम इंडिया.' सो, यु आर साकुरा! युअर नेम इज साकुरा! " इंटरेस्टींग!
साकुरानं मात्र जपानी पद्धतीप्रमाणे "कमरेत लवुन नमस्कार" केला.
हसुन म्हणाली.. "एइगो वाकारीमासेन.".. "मला इंग्रजी कळत नाही... "
केत्या हसला.
त्यालाही अर्थातच ती बोलली यातलं अवाक्षरही कळलेलं नव्हतं...

आता तिथं तिसरं कोणीही नव्हतं.
फक्त तो आणि साकुरा!

sakura_2_1_0.jpg

फोटो सौजन्यः- कु. दिप्ती आणि कु. इंटरनेट.
(क्रमशः)

गुलमोहर: 

गूढ़ कथा कशा काय सुचतात ??? हे गूढच आहे , पण ह्या गोष्टीतले गूढ अजून ताणू नये आणि लवकरात लवकर पुढे काय आहे ते लिहा.

फोटो फारच सुन्दर!! कु.दिप्ती व कु.इंटरनेट ला नक्की कळवा. Happy
लेख ही छानच..
बिचारा केत्या..जपानी न येता जपानात फिरतोय..

एक फुल)
<<फोटो फारच सुन्दर!! कु.दिप्ती व कु.इंटरनेट ला नक्की कळवा. स्मित
लेख ही छानच..
बिचारा केत्या..जपानी न येता जपानात फिरतोय..>>
धन्यवाद. कळवण्यात आले आहे Happy
ह्म्म. बिच्चारा आहे खरा.. अजुन तरी... Wink
@आभार्स! Happy

सुंदरी आणि केत्या चा संवाद पाहून नवीन येऊ घातलेला सिनेमाचा प्रोमो आठवला . त्यातली नटी चक्क मंगळावरची आहे. कल्पना छान आहे . sundaraa सुंदर आहे अगदी. फुलाची लाली तिच्यागालांवरहि आहे.

धन्यवाद वाचल्याबद्दल;)

अजुन एकः- काल अतिउत्साहात मी बर्याच जनांच्या घरि जाउन पत्रके वाटली. (वि. पु. मधे जाउन) तसे करणे विशेष चांगले नाही असे समजले . तरी कोणाला बरं वाट्लं नसेल तर माफ्स... मलाही बरं नाही वाट्लं नंतर... @ऋयाम.

ऋयाम.. अरे पत्रिका खास मेहमानांसाठी असतात ना.. मला आवडतं पत्रिका आली की.. Happy
बी कूल !!!चलो अब आगे ... पटकन दुसरा भाग टाक बघू

अजुन एकः- काल अतिउत्साहात मी बर्याच जनांच्या घरि जाउन पत्रके वाटली. (वि. पु. मधे जाउन)>>> बरं झालं पत्रक दिलतं ते.. नाहितर हे "बदलुन" लिहिलेलं वाचायचं राहुनच गेलं असतं... छान आहेच पण पुढचा भाग लवकर टाका... Happy

सर्वांना)
धन्यवाद वाचल्याबद्दल आणि उत्सुकता दाखवल्याबद्दल! Happy

चिमुरी, वर्षु नील)
धन्यवाद Happy तुमच्या बोलण्यानं फार चांगलं वाटलं. उगाच दिली वाटलं होतं बराच वेळ. Happy

@ आभार्स!! Happy