मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

मदत_समीती,

मला माझा profile photo बदलायचा आहे....पण जरी मी जुना फोटो delete करुन वेगळा टाकला तरी पण आधिचाच फोटो दिसत आहे...काही problem आहे का?

०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..

अ‍ॅडमिन्,प्रॉब्लेम सॉल्व झालाय
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

अ‍ॅडमिन,
कृपया माझा limayeparesh@gmail.com हा ID रद्द करावा. मी limayeparesh या नावाने आधिच सदस्य आहे. नविन id माझ्याकडुन चुकुन register केला गेला आहे. दोन्ही id मधे ईमेल तोच असल्यामुळे मला प्रोफाईल मधे काही बदल करण्यास अडचण येत आहे. तथापी उपरोल्लेखित id रद्द करण्याची कृपा करावी. ही विनंती.

धन्यवाद.

हितगुज दिवाळी अ॑कातील अभिवाचने मी ऐकू शकत नाही, त्यासाठी काय केले पाहिजे?

गेल्या आठवड्यात माझा नवा फोटो माझ्या सदस्यत्वात अपलोड केलाय.. तो मी सोडून बाकीच्यांना दिसतो. मला मात्र जुनाच दिसतो. असं का? Happy
---------------------

एवढंच ना!

आणि मी नवीन अपलोड केलेला मलाच दिसतोय बाकीच्यांना बराच जूना (त्यानंतर मध्यंतरी मी एक बदलला होता- तो दिसत नाही , त्याच्या आधी लावलेला ) दिसतोय ! असं का ? Happy

-----------------------------------------
सह्हीच !

ज्यांना जुने फोटो दिसतायत त्यांनी स्वतःची cache डिलीट करा. प्रॉब्लेम सुटला.
----------------------
एवढंच ना!

प्रॉब्लेम सुटला. धन्यवाद आशुंडर्स्कोर्डी Happy
-----------------------------------------
सह्हीच !

मला माझ्या सदस्यत्वात संपादन मध्ये व्यक्तिगत माहितीत बदल करायचा आहे. तो होत नाहिये.. काहीही पासवर्ड् ची एरर येतेय. फक्त अकाउंट सेटींग्स मधेच ही एरर येत आहे. बाकिच्या पानावर मी बदल करू शकतेय. मागे मला समीर अ‍ॅडमिन ने मेल केले होते की माझ्या सदस्यत्वात काहीतरी बग आहे (म्हणून मला रंगिबेरंगी पण वापरता येत नाहिये). काय बग आहे ? दुरुस्ती होईल का ?

मधुरा दीक्षित यांस - जयवंत दळवी हे मराठीतील एक नामवंत साहित्यिक लेखक होते. ते मूळचे सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील आरवली गांवचे. कथा, कादंबरी, ललित, नाटके अशी ५०-६० पुस्तके त्यांनी लिहिली
आहेत. "ललित" या मराठी ग्रंथप्रसाराला वाहिलेल्या मासिकांत ते "ठणठणपाळ" या टोपणनावाने
२० वर्षे लेखन करीत होते. "आत्मचरित्राऐवजी" हे त्यांचे पुस्तक पहावे. ही कविता त्यांनी लिहिलेली
नाही. त्या पुस्तकांत कथानकाच्या ओघात फक्त उल्लेख आलेला आहे.

मला मराठि ऑन्लाइन डिक्श्नरी हवि आहे कशी मीळेल

नमस्कार अ‍ॅडमिन,
आम्ही बर्‍याच वेळा लेखनात, खास करुन पाककृति वरच्या लेखनात, ब्रँड नेम वापरतो. त्या संबंधी काहि खबरदारी, मायबोलीने घ्यावी का ? म्हणजे इथे वापरलेले ब्रँड नेम, हि त्याच अर्थाने वापरली आहेत, असे काहितरी लिहावे का ?

आपलाच,
दिनेश

दीपक यशवंत राणे यांस - "MARATHI ONLINE DICTIONARY" असा सर्च गुगल इंजिन वर
दिल्यास अनेक साइट्स सापडतील. तसेच या साइट्स पहाव्यात.
khandbahale.com / multilingualbooks.com / thefreedictionary.com / cfilt.iitb.ac.in /
websters-online-dictionary.org

@dineshvs
ब्रँड नेम बद्दल अशी काळजी घ्यायची गरज मला तरी वाटत नाही.

मला माझे रंगीबेरंगी पान कसे तयार करता येईल?

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

शरद, अ‍ॅडमिन टीम ला मेल करा. ते सांगतील.

मला एक मायबोलीकर शोधायचाय. कसा शोधता येईल?

एखाद्या सदस्याचे ‘वापरावयाचे नाव’ माहीत नसेल तर त्याच्या खर्‍या नावावरून त्याला कसे शोधायचे?

नूतन, वर 'मायबोलीकरांची सूची' अशी लिंक आहे त्यावर गेलं की मायबोलीकरांची यादी दिसेल. त्यात वापरायच्या नावाने शोधता येते
जर वापरायचे नाव माहिती नसेल तर त्याच यादीत सद्स्यांची नावे (ज्यांनी दिली आहेत त्यांची) दिसतात, ती सॉर्ट करुन शोधता येईल, हे वेळखाऊ आहे खरे, पण इलाज नाही.

जीवन गाणेप्रेम या दोन कविता मी स्वतः लिहिलेल्या व माझ्या मोगरा फुलला या ब्लॉगवर प्रकाशितही केलेल्या आहेत. माझ्या ब्लॉगवरील माझे लेखन मरठीविश्व व्यतिरिक्त कोठेही प्रसिद्ध होत नाही. अंकुश चव्हाण या व्यक्तीने माझ्या या दोन कविता चोरून स्वतःच्या ब्लॉगवर प्रकाशित तर केल्याच आहेत पण तो मिपा आणि मायबोली या संकेत स्थळांच्या वाचकांनाही मुर्ख बनवत आहे. त्या वर मी आक्षेप घेताच अतिशय गचाळ भाषा वापरून मला इमेल पाठवले आहेत. सदर व्यक्तीचा ठावठीकाणा शोधला असता मला बरीच आक्षेपार्ह माहिती कळून आली त्यावरून मी त्याला जे संदेश पाठवले, ते त्याने स्वतःच्या ब्लॉगवरून काढून टाकले आहेत. संपादक अशा वाड्.मय चोरांविरूध्द योग्य कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. या कवितांच्या कॉपीराईटची माहिती हवी असल्यास आपण मला येथे संपर्क साधू शकता. धन्यवाद!

मी कोणाला सपर्क केला असता त्याचा आलेला रीप्लाय कुथे बघायचा?

मला आलेलि इ-मेल्स मी कुथे बघू शकते?

तुम्हांला आलेली उत्तरे दोन तर्‍हेची असू शकतात,
१. विचारपूस : उजव्या हाताला 'माझी विचारपूस' अशी लिंक आहे त्यावर गेलं की कोणी तुम्हांला इथेच मेसेज टाकला असेल तर दिसेल (जसं आता तुमच्या विचारपुशीत manasmi18 या आयडी चा मेसेज आहे).
२. मेल : जर कोणी तुम्हांला तुमच्या वैयक्तिक मेल आयडी वर मेल केलं तर ते मायबोलीवर सद्स्य होताना जो मेल आयडी वापरला असाल त्यावर जातं.

प्रेम आणि जीवन गाणे या दोन कविता मी स्वतः लिहिलेल्या व माझ्या मोगरा फुलला या ब्लॉगवर प्रकाशितही केलेल्या आहेत. माझ्या ब्लॉगवरील माझे लेखन मरठीविश्व व्यतिरिक्त कोठेही प्रसिद्ध होत नाही. अंकुश चव्हाण (जो येथे स्कायप्रिन्स या नावाने लेखन करत आहे), या व्यक्तीने माझ्या या दोन कविता चोरून स्वतःच्या ब्लॉगवर प्रकाशित तर केल्याच आहेत पण तो मिसळपाव डॉट कॉम आणि मायबोली या संकेत स्थळांच्या वाचकांनाही मुर्ख बनवत आहे. त्यावर मी आक्षेप घेताच अतिशय गचाळ भाषा वापरून मला इमेल पाठवले आहेत. सदर व्यक्तीचा ठावठीकाणा शोधला असता मला बरीच आक्षेपार्ह माहिती कळून आली ,त्यावरून मी त्याला जो संदेश पाठवला तो त्याने स्वतःच्या ब्लॉगवरून काढून टाकला आहे. संपादक अशा वाड्.मय चोरांविरूध्द योग्य कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. या कवितांच्या कॉपीराईटची माहिती हवी असल्यास आपण माझ्या इमेलवरून माझ्याशी केव्हाही संपर्क साधू शकता. धन्यवाद!

तुम्ही अ‍ॅडमिन ना यासंबंधी मेल करा. ते यासंबंधी काय ते सांगू शकतील.

सध्या आम्ही सगळे मराठी अद्याक्षरावरुन गाणी लिहित आहोत. ती सगळी अक्षराप्रमाणे असली तरी पूढे शोधण्यास सोपे व्हावे म्हणून, डाटाबेस सारखे काहितरी करता येईल का ?

मुखडा | गायक | संगीतकार | कवि | -- असे काहितरी

अ‍ॅडमिन, दिनेशनी विचारलेला हा प्रश्न वाचल्यावर मला 'नवीन पाककृती'चं पान आठवलं. तिथे जसे -
लागणारा वेळ, लागणारे जिन्नस, क्रमवार पाककृती, वाढणी/प्रमाण इ. रकान्यांच्या स्वरूपात पाककृती लिहिण्याची सोय आहे, तसे या ग्रूप मध्ये काही करता येईल का? म्हणजे गाणे लिहिताना त्याचे गीतकार, संगीतकार, गायक, चित्रपट/गीतसंग्रह हे माहिती आगारात (database Happy ) वेगवेगळे जतन केले जाईल असे.

दिनेश, गजानन
यावर काम चालू आहे. उद्यापर्यंत त्याचा दुवा देतो.

Pages