"अनामिक"

Submitted by गणेश कुलकर्णी on 29 March, 2010 - 09:46

मनाच्या खोल तळात...
कांहीतरी अनामिक...
तरंगत असावे...,
असे होतात भास!
त्यांच्या तरगंण्याने
एरव्ही सळसळणारे ही...
दबत आहेत श्वास!
काय आहे ते ...
मलाही माहित नाही!
पण...
जाणीव मात्र होते आहे...
मी जेव्हा, जेव्हा...
एकटा असतो तेव्हा तेव्हा...
मनाच्या खोल तळात...
कांहीतरी अनामिक...
तरंगत असावे...,
एकटे एकटे!

:गणेश कुलकर्णी (समीप)

गुलमोहर: 

धन्यवाद अनिलकुमार,मुकुंददादा!!