सर्व मराठी वर्तमानपत्रे उभ्या आकाराची असावीत! (टॅब्लॉईड)

Submitted by निमिष_सोनार on 24 March, 2010 - 01:35

मिड्-डे, पुणे मिरर, मुंबई मिरर, लंडनमधील "टाइम्स" व इतर काही छापील वर्तमानपत्रे ज्या आकारात येतात (बहुदा त्या आकाराला टॅब्लॉईड म्हणतात) त्या आकारात सगळीच वर्तमानपत्रे असावीत असे मला व माझ्या सारख्या असंख्य वर्तमानपत्र-वाचक-मंडळींना वाटते. सर्व लोकप्रिय मराठी वर्तमानपत्रे त्याच आकाराची असावीत. कारण शहरांमध्ये, विशेषतः मुंबई-पुण्यात नोकरदार मंडळींचे दिवसातील चार पाच तास प्रवासातच जातात. आणि अशा वेळेस चालू घडामोडींचे ज्ञान तसेच मनोरंजन मिळवण्याचे एकमेव साधन म्हणजे वर्तमानपत्र. पण, त्याच्या सध्याच्या चारवेळा घडी केलेल्या आकारत ते वाचणे फार कठीण जाते. फार तर फक्त मुख्य पान वाचता येते. तसेच लोकल ट्रेनमध्ये उभ्या उभ्या वाचणे अवघड जाते. दाटीवाटीने ट्रेनमध्ये, बसमध्ये बसले असतांना सुद्धा घडी उकलून वाचणे कठीणच जाते.

त्यापेक्षा पुस्तकासारख्या आकाराची, सध्याच्या वर्तमानत्रांपेक्षा आकाराने थोडा लहान आकार असला तर सगळ्याच बाबतीत सोयिस्कर राहील. पुरवण्या वेगळ्या न देता त्यातच समाविष्ट असाव्यात. म्हणजे वाचतांना अगदी सोयीचे होईल.
आपल्याला काय वाटते?
माझा मुद्दा बरोबर आहे का?
सकाळची सर्व मराठी वर्तमानपत्रे अशा उभा आकारात करण्यात काय अडचण आहे?
काही मराठी मात्र सायंदैनिके उभ्या आकारात येतात.
वृत्तपत्र क्षेत्रातील मंडळी या बाबत काही माहिती देवू शकतील का?

गुलमोहर: 

अनुमोदन प्रयोग.

सध्याच्या ब्रॉडशीटपेक्षाही मोठ्या आकाराची वर्तमानपत्रे आधी यायची. सध्याचा ब्रॉडशीट साइझ १९९८-९९ च्या आसपास प्रचलित झाला. (चुभूदेघे).

रोजच्या दैनिकाचे आयुष्य जेमतेम १ दिवसाचे. जाहिराती हा मुख्य विषय तर आहेच, पण कामाच्या गर्दीत मथळे भराभर डोळ्यांखालून घालण्यासाठी, तसेच पाहिजे ते पान / बातमी / सदर पटकन शोधण्यासाठी ब्रॉडशीट साईझ जास्त सोपा.

सायंदैनिके तसेच मुख्य अंकांसोबत येणार्‍या पुरवण्या मात्र टॅब्लॉइडमध्ये छापण्याची पद्धत बहुतेक सगळीकडे असावी.