ओला!!(हेल्लो) पनामा!!!

Submitted by वर्षू. on 23 March, 2010 - 06:48

पनामा

सेंट्रल अमेरिकेतील दक्षिण कोपर्यातला हा एक छोटासा देश. पनामा सिटी, ही पनामा ची राजधानी असून पनामा प्रॉव्हिन्स ची राजधानी ही आहे. तर या देशाला आमची पाचवी भेट या फेब्रुवारी २०१० मधे घडली.
पण कितीही वेळा भेट दिली तरी या देशाचं आकर्षण कमी होत नाही. या देशाच्या पूर्वेला अटलांटिक ओशन तर पश्चिमेला पॅसिफिक ओशन आहे.
पनामा ,३०० वर्षं स्पॅनिश राज्याचा भाग होता.त्यामुळे अजून ही इकडे भाषा,पोशाख,जेवण यांवर स्पॅनिश ची पकड जबरदस्त आहे. येथील बहुतांश लोकं कॅथलिक धर्म पाळतात. शहरभरात जागोजागी ,सुंदर स्पॅनिश शैलीतील पुरातन चर्चेस आहेत.
येथील जेवणात केळी(कच्ची/पिकलेली) ,ओला नारळ, सी फूड चा भरपूर उपयोग केला जातो.

panamafood_patacones.jpg

हिरव्या कच्च्या केळ्यांच्या ,पातळ ,तिरप्या चकत्या कापून, मीठे लावून डीप फ्राय केलेले हे पाताकोनस

sancocho.jpg

चिकन, मक्याचे कणीस, तांदूळ, युका ,मसाले घालून तयार केलेले अत्यंत पौष्टिक सूप्,'संकोचो'

typical panamian food.jpg

हे टिपिकल पनामिअन जेवण. रेड बीन्स आणी नारळाचं दूध टाकून केलेला फ्राईड राईस, नारळाच्याच दुधातील चमचमीत ताज्या माशाचा दाटसर रस्सा बरोबर सलाद किन्वा फिंगर चिप्स .

यासोबत मेक्सिकन जेवणालाही पनामाच्या खाद्य संस्कृतीत सामावून घेतलेले आहे. त्यामधे नाचोज,स्टीक,पिझ्झाज ,तामालेस, एंपनादास हे खाद्यपदार्थ तर पनामिअन घराघरातून बनवले जातात.

empanadas.jpg
एंपनादास- मक्याच्या किन्वा मैद्याच्या पिठाच्या गोळ्यात चिकन,पोर्क्,हर्ब्स भरून ,करंजीसारखा शेप देऊन तळता किन्वा बेक करता येतात.

येथील लोकल लोकं साधे भोळे आहेत. अजून 'नये जमाने की हवा' न लागलेले. Happy
मोस्टली लोकं युरोपिअन- अमेरिकन ,किन्वा युरोपिअन-आफ्रिकन मिक्श्चर चे आहेत. नेटिव्ह रेड इंडिअन्स मात्र आता इंटिरिअर भागात वसतात .

पनामा कनाल मुळे पनामा जास्त प्रसिद्धीला आलं. या कनाल मुळे अ‍ॅटलांटिक आणी पॅसिफिक सागर जोडले गेल्यामुळे दळणवळण खूपच सोयिस्कर झालं . १९०३ साली कनाल बनवण्याचं काम हाती घेऊन अमेरिकेने ते ११ वर्षात पूर्ण केलं . २००० साली अमेरिकेने कनाल चा कंट्रोल पनामाला सोपवला.इतकी वर्षं इकडे अमेरिकन मिलिट्री चा बेस असल्याने अजून ही त्यांच्या बर्याचशा निशाण्या अजून शिल्लक आहेत.

पनामा कनाल ला ३ लॉक्स चे सेट्स आहेत. त्यापैकी दोन मिराफ्लोरेस आणी पेड्रो मिग्वल हे पनामा सिटीच जवळ च्या पॅसिफिक किनार्यावर तर तिसरा,'गातून' पनामा सिटीपासून दीड तासाच्या अंतरावर (बाय रोड ) असलेल्या अ‍ॅटलांटिक ओशनवर बांधलेला आहे.

गातून ला प्रथम छागरेस नदीवर दोन पर्वतांमधे ८४०० फूट लाम्ब आणी अर्धा मैल रुंदीचा अजस्त्र बांध बांधण्यात आला. त्यामुळे नदी चे पाणी बाजूच्या दरीत जमा झाले आणी जगातला मनुष्य निर्मीत सर्वात मोठा असा हा गातून लेक तयार झाला. हा तलाव अ‍ॅटलांटिक ओशन च्या वर ८५ फुटावर स्थित आहे.
या बांधावर असलेल्या १४ गेट्स मुळे तलावातील पाण्यावर नियंत्रण ठेवता येते.

पॅसिफिक ओशन आणी अ‍ॅटलांटिक ओशन यांच्या पाण्याच्या लेव्हल मधे फरक असल्यामुळे पॅसिफिक मधून येणार्या जहाजांना , या लॉक्स चा उपयोग करून हळू हळू खालच्या लेव्हल ला आणले जाते आणी मग या जहाजांना अलगद खालच्या पातळीवर असलेल्या अ‍ॅटलांटिक मधे सहज शिरता येते.

या दोन ओशन्स ची उंची एका लेव्हल वर आणताना आणी त्यातून सरकणारे अजस्त्र जहाज पाहतांना डोळ्यावर विश्वास बसत नाही. मनुष्य निर्मित हा चमत्कार पाहतांना सर्व दर्शकांचे डोळे विस्फारलेले असतात्,तोंडातून शब्दही फुटत नाही.

gatun-2.jpg
हे गातून कंट्रोल रूम

gatun-3.jpg

शिप गातून लॉक्स मधे येताना

gatun-5.jpg
गातून लॉक्समधे शिरतांना-

कनाल चं फंक्शन थोडक्यात ..
जहाज लॉक्स च्या जवळ आलं की त्याची गती मंदावतात. मग ते थांबवून त्यात एक लॉक्स चा स्पेशल पायलट चढतो. तो गती आणी दिशा नियंत्रित करतो. हे लॉक्स अत्यंत अरुंद असल्यामुळे जहाज यातून न्यायचे काम कुशल पायलटवरच सोपवले जाते.
लॉक्समधे शिरताना जहाजाला दोन्ही कडे असलेल्या,अरुन्द ट्रॅकवरून धावणार्या इलेक्ट्रिक पुलीज च्या आधाराने ओढतात. या पुलीज चालवणारे पण अत्यंत कुशल चालक असतात.
पॅसिफिक कडून येणारे जहाज,मिरा फ्लोरेस आणी पेड्रो मिग्वल वरच्या अरुंद लॉक्समधे शिरले कि ते दोन गेट्सच्या आधाराने तिथेच अडवले जाते. मग या लॉक्स चेंबर मधे पाणी पंप करून भरले जाते.पाण्याची पातळी बरोबर जहाज ही हलकेच वर उचलले जाते. मग हलकेच ते दुसर्या लॉकचेंबर मधे शिरते. अश्या प्रकारे जहाजाला पॅसिफिक ओशनच्या लेव्हल च्या वर उचलले जाते . हे जहाज गातून ला पोचल्यावर त्याची लेव्हल खाली आणण्यासाठी आता ते गातून लॉक चेंबर मधे शिरते. येथे चेंबर मधे भरलेले पाणी पंप आऊट करून पाण्याची पातळी हळू हळू खाली आणतात. लॉक चेंबर मधली पाण्याची पातळी ,अ‍ॅटलांटिक ओशनच्या पातळीवर आली कि सर्वात बाहेरचे लॉक्स गेट उघडतात्,आणी शिप अलगद अ‍ॅटलांटिक मधे दाखल होते. लॉक्स च्या अजस्त्र गेट्स ची उघड बन्द इलेक्ट्रिक मोटरद्वारे करण्यात येते.

या कनाल मुळे १९४८ अमेरिकेतील सर्वात मोठे 'कोलोन फ्री झोन' ची निर्मिती झाली. हे झोने टॅक्स फ्री असल्याने पुषकळश्या देशातून इकडे माल पाठवला जातो आणी इकडून साऊथ अमेरिकेतील सर्व देश आणी अमेरिकेत री एक्स्पोर्ट केला जातो. कनालमुळे इंपोर्ट एक्स्पोर्ट च्या धंद्याला गती मिळालीये.त्याचा परिणाम म्हणून पनामामधे भरभराटी आली.
तर असे हे पनामा.. पोल्युशन फ्री, रेन फॉरेस्टने नटलेले, फळाफुलांची रेलचेल असलेले ,सुबक छोटेसे शहर. आजच्या आधुनिक काळातही आपल्या परंपरेचा अभिमान वाटणारा ,तिला जपणारा आहे हा देश

panama kinara-2.JPG
पनामाचा पॅसिफिक कडील किनारा

national dress of panama.jpg

पनामाचा नॅशनल ड्रेस

गुलमोहर: 

<<चिकन, मक्याचे कणीस, तांदूळ, युका ,मसाले घालून तयार केलेले अत्यंत पौष्टिक सूप्, 'संकोचो'>>
आयला... इतके मस्त पदार्थ.. फोटो... त्यांचं वर्णनही सुरेख.

पण संकोचो?
एवढं खायला असताना संकोच कसला करायचा?? Proud

दुसर्‍या फोटोतली रंगसंगती तर लाजवाब... वाह!

>>येथील लोकल लोकं साधे भोळे आहेत. अजून 'नये जमाने की हवा' न लागलेले.
Wink म्हणुनच मज्जा आहे!

>>नॅशनल ड्रेस
भारी आहे. Happy

एन्जॉय करताय मस्त! जबर्‍या आहे!!!!

आता हे वाचून कसं मस्त वाटलं. नुस्त्या फोटूला मजा नाय, बरोबर वर्णन हवच, तेही वर्षूदी स्टाईलचच. Happy
बादवे, तो ड्रेस कसला जबरी आहे, त्यातल्या सुंदरीपेक्षाही छान.

वर्षू.... मस्तच आणि ते संकोचो तर झ्याकच दिसतंय. रेसीपी टाक ना असेल तर.
आणि त्या सुंदरीच्या पोशाखावर पण स्पॅनिश झाक दिसतेय.

वर्षू
आत्ताच लेख वाचला. मस्त............आता आजिबात "संकोच" न करता जेवायला उठते. कारण फोटो पाहून भूक लागली.

वा वा!

पायेया अर्थात भाताचा एक प्रकार आहे का तिकडे? स्पॅनिश असणार म्हणजे पायेया असणारच!

नॅशनल ड्रेसवाली पण छान! Happy

फोटो एकदम मस्तच.... Happy
पाताकोनस , पौष्टिक सूप्,'संकोचो' यांचीन रेसिपी टाका ना ... सगळ्यांनाच वाचायला मिळेल.

Pages