दसरा ते महाशिवरात्र

Submitted by prashant_the_one on 18 March, 2010 - 14:13

दसरा ते महाशिवरात्र

मुहूर्त कोणी मानतात तर कुणी नाही. व्यक्तिश: मी नाही मानत. ज्याक्षणी मनात काही करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते आणि काहीतरी त्यावर कृती केलीच पाहिजे अशी उर्मी येते तेव्हा मी ती सरळ करून टाकतो.

साधारणत: मे महिन्यात आम्ही आय फोन साठी AT&T सर्विस घेतली. आणि प्रचंड उत्सुकतेने त्यातील अनेक गोष्टी अनुभवू लागलो. माझ्यासाठी तर ते एक भन्नाट प्रकरण होते कारण त्यातेले App Store. तिथे हजारो प्रकारचे वेगवेगळे प्रोग्राम्स - बरेच फुकट - उपलब्ध आहेत. पहिले काही महिने असेच निव्वळ टाइम पास म्हणून गेली. हे डाउनलोड कर, ते डाउनलोड कर असे. मधल्या काळात माझ्या एका कीबोर्ड विद्यार्ध्याचे वडील - राजेश अभ्यंकर - फक्त विद्यार्ध्याचे वडील न राहता चांगला मित्र झाला. एकदा बोलता बोलता त्याने सांगितले की त्यांची कंपनी आय फोन साठी app विकसित करण्याचे काम करत आहे. तेव्हा म्हणजे काय करावं लागतं अशी साधारण चौकशी केली आणि मग तो विषय थांबला.

असेच एकदा आय फोन वर भारतासंबंधी काय काय तिथे आहे हे बघत होतो. तेव्हा एका aap वरती जाऊन थडकलो आणि म्हटले "अरे वा ...छानच". ते होते आय फोन वर सत्यनारायण पूजा !! मग त्याची सगळी डिटेल वाचली तर लक्षात आला की नुसतीच पोथी वगैरे टाकली आहे. मला वाटला की गुरुजी सांगतात तशी पूजा, कथा, आरती, पूर्ण सामग्री यादी, तयारी, चौरंग मांडणी वगैरे वगैरे. पण तसले काही नव्हते. खूप वैतागलो आणि म्हटले की यापेक्षा मी चांगले केले असते. त्याच क्षणी आधी राजेश बरोबर बोललेले आठवले आणि लगेचच त्याला फोन केला आणि सांगितले की माझ्या कडे एक कल्पना आहे, तुला इंटरेस्ट असेल तर बोलूयात. आम्ही दुपारी डोसा ग्रिल मध्ये भेटायचे ठरवले. जेवताना त्यांनी शांतपणे कल्पना ऐकून घेतली आणि थोडा विचार करून तीच कल्पना वाढवत नेऊन त्याचा एक संपूर्ण वेगळा व्यवसाय कसा उभा करता येईल याचे एक चित्र उभे केले. त्याच बरोबर हे करताना किती ताप येणार आहे, किती अडचणी येणार आहेत याचा पण एक आढावा दिला. त्या नंतर काही दिवस असेच चर्चेमध्ये गेले आणि शेवटी आम्ही हे करायचे ठरवले. त्यासाठी त्याच्या कंपनी मधील दोन वरिष्ठ लोकांची भागीदारी घेऊन त्यांचा व्यवसायातील अनुभव आणि उपलब्ध असलेले डेव्हलपमेंट सेंटर वापरण्याचे ठरवले. आणि गोष्टी विजेच्या वेगानी घडल्या सारख्या सुरु झाल्या. तो दिवस होता दसरा !!

आणि महाशिवरात्र - या दिवशी आमचे app Apple च्या app -store मध्ये उपलब्ध झाले !! दसरा ते महाशिवरात्र !! सुरुवात आणि पूर्तता दोन्ही अतिशय "सुमुहूर्तावर" झाली. आधी म्हटल्या प्रमाणे मी जरी मुहूर्तावर विश्वास ठेवत नसलो तरी ज्या दिवसांना सर्व लोक चांगले मानतात त्याच दिवसांचा हा योगायोग मात्र मनाला नक्की आनंद देऊन गेला. कारण शेवटी हे सगळे केले कोणासाठी? पहिले लोकांसाठीच आणि त्यानंतर व्यवसायासाठी. काहीहि वाट्टेल ते करून पैसे मिळवण्याच्या मी आणि राजेश पहिल्या पासूनच विरुद्ध असल्यामुळे जे करायचे ते उत्तमच या झपाटलेपणातून आज हि सत्यनारायण पूजा आय फोन वर उपलब्ध झाली आहे. हे काम करत असतानाच आम्ही इतरपण काही लहान apps सादर केली आहेत. त्याला सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

कुणी विचारलं की यातून तुम्हाला काय मिळालं? तर "समाधान" हे नक्की पहिले उत्तर असेल. व्यवसाय करायचा म्हटल्यावर त्यातून पैसे मिळालेच पाहिजेत हे शंभर टक्के खरे पण तो व्यवसाय जेव्हा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा असतो तेव्हा त्यात समाधानाचा हिस्सा मात्र जास्त असतो हे अनुभवांनी आता नक्की सांगू शकतो. या उपक्रमाच्या निमित्तानी अनेक पुस्तके वाचली ज्याचा व्यवसाय करण्याच्या दृष्टीने प्रचंड फायदा होईल. राजेश च्या अनेक वर्षांच्या अनुभवातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि अजूनही शिकतोच आहे. इतर अनेक विविध अनुभव मिळाले जे एम बी ए करण्याच्या तोडीचे होते. एका जुन्या मित्राबरोबर - राजेंद्र वैशंपायनबरोबर - काम करण्याचा एक सुखद अनुभव मिळाला. आमची सत्यनारायण पूजा हि त्याच्या Sonic Octave चे उत्पादन आहे जे आम्ही या साठी वापरले. आपल्यासारख्या मित्र आणि रसिकांचा आशीर्वाद या सारखे घासलेले शब्द अजिबात वापरणार नाही पण एवढे म्हणू शकतो की तुमचा उत्साह वाढवणारा प्रतिसाद मात्र द्या ( आणि जमले तर तेवढे app पण घ्या Happy )

http://itunes.apple.com/us/app/ipooja-satyanarayan-marathi/id355258730?mt=8

http://www.youtube.com/user/zenagestudios

लवकरच रविंद्र साठे , सचिन खेडेकर आदि दिग्गजांनी बनवलेली "आत्मन" नावाची सी डी आम्ही आय-फोन वर आणत आहोत.आपली संस्कृति नविन पिढी पर्यंत त्यांना समजेल अश्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

लोभ असावा,

प्रशांत गिजरे

गुलमोहर: 

अभिनंदन! तुमच्या या अनुभवातून येथे आयफोन अ‍ॅप बनवायचे असेल तर काय करायला पाहिजे याची काही माहिती देता आली तर इतरांनाही फायदा होईल (इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी वगळून). हे करताना आलेले अनुभव वाचायला आवडतील. येथील उद्योजक विभाग जरूर बघा.

धन्यवाद मंडळी,

नानबा, आयफोन नसला तरी आय्-ट्च वर पण अ‍ॅप चालतात बहुतेक सगळी Happy
फारएन्ड , लवकरच माहिती टाकतो.

आम्ही फक्त आम्हाला सुचेल तेच बनवतो असे नाही, तर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कडे काही भन्नाट कल्पना आहे,तर ती सुद्धा प्रत्यक्षात आणू शकतो.

मी काल ही ipooja डाऊनलोड केली आणि श्रीसत्यनारायण पूजा केली. खूप छान वाटले. धन्यवाद. आता कधीही मनात आले की पूजा करता येईल. खरंच खूप मस्त app आहे. एक सुचवावेसे वाटते, सामुग्री आणि पूजा यात थोडी mismatch आहे. for eg कापूस वस्त्रे quantity, फळे, सुकामेवा quantity etc. very minor.

धन्स अभिप्रा -

नक्की कुठे दुरुस्ती केली पाहिजे ते जरा डीटेल मध्ये सांगू शकणार का? लगेच त्या प्रमाणे सगळ्या ठिकाणी दुरुस्ती करता येईल....

माझ्या २-४ मित्रांनी एव्हढ्यातच डाउनलोड केली आणि त्यांना पण खूपच आवडली. बरे वाटले.. गणपती पूजा सुद्धा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आम्ही घरी गणपती पूजा त्यावरच केली.. इथे पाहू शकता -

http://www.youtube.com/watch?v=QC5eEbfeZRA

एक विनंती - अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर मध्ये त्यासाठी परिक्षण लिहिणार का?