तो मी

Submitted by अज्ञात on 18 March, 2010 - 05:25

जो एक एकटा,
एकांताचा प्रवासी,....
क्षणाक्षणांची भजने,
जळप्रतिमांचा वारकरी,....
नानाविध शकलांची,
बांधून अंतरी मोट,
भ्रमण करी....

भरतील रिकाम्या पुन्हा ओंजळी केंव्हातरी,
ओढे चर्‍हाट भिजलेले; वृषभधारी;
अंकुरास गातो गाणे; बांधावरती,...
तो मी,....
आशेचा शेतकरी,...... पाटकरी......

...................अज्ञात

गुलमोहर: 

तो मी,....
आशेचा शेतकरी,...... पाटकरी....>>>>

आशेच्या तुमच्या शेतीला भरपुर आणि सकस पिक येवो हिच शुभेच्छा ! Wink

छानच !