चंद्राचे दु:ख!

Submitted by उमेश कोठीकर on 11 March, 2010 - 23:41

काल खुप दिवसांनी
भेटलो तिला;
छान अंधाराची शाल पांघरलेल्या
अमावस्येच्या रात्री.....मिट्ट अंधारात; सौधावर

अगदी बिलगुन होती; पण....शांत शांत, गारगार हवेत
जणू खुप दिवसांपासून हवीहवीशी असलेली मिठी
सामावून घेत, शरीरात
मी म्हणत चेष्टेने,"बघ, आज चंद्र पण नाही बघायला"

शेवटी टेकवण्यासाठी ओठ तिच्या ओठांवर
घेतले ओंजळीत तिचे मुख
तिचे डोळे; डबडबलेले... एकटक बघत माझ्याकडे
आणि उमटले तिचे अस्फुट, निरागस शब्द
माझ्या प्रश्नार्थक ओठांसाठी,
"किती त्रास होत असेल ना
चंद्राला........
अमावस्येच्या रात्री?"

गुलमोहर: 

वा !!!

वाह!

उमेश,
तुझ्याकडे पाहून वाटत नाही हो, इतक्या हळूवार कविता तू करू शकतोस असं. Proud
बाकी Light 1 घेच...

जोक्स अपार्ट कविता अतिशय सुरेख जमली आहे.
पुलेशु!! कितिवेळा देऊ? तु लिहितोसंच सुंदर... Happy

धन्यवाद मित्रांनो.
तुझ्याकडे पाहून वाटत नाही हो, इतक्या हळूवार कविता तू करू शकतोस असं. >>>>>>>>>>>
दक्षे, मी काय अमरीश पुरी सारखा वाटतो का?

मस्तच !!

Happy छान

you used the right word गिरीशजी Happy
काय चाललंय काय हो Happy तुमची अशी कविता पण खल्लास करेल वाटलं नव्हतं. all rounder झाला आहात अगदी Happy
"किती त्रास होत असेल ना
चंद्राला........
अमावस्येच्या रात्री?">>>>क्लास!!

उमेशा, लंघन करण्याचा सल्ला दिलाय ना जुन्याजाणत्यांनी. अमावस्या म्हणजे दुसरं काही नसतच बघं चंद्रासाठी. बाकी भेटीची वेळ चांगली निवडलीस हो. साभाळ, रात्र अमावस्येची आहे.... विशल्याच्या नव्या कथेचे टायटल...

च्यायला हे बरे आहे.....
उद्योग स्वत:चे आणि नाव विशल्याचे..... चालू द्या Wink