द्वंद अन अर्थ

Submitted by Girish Kulkarni on 9 March, 2010 - 23:01

******************************
******************************

तो बर्‍याच कविता करायचा
ती त्या कवितांत स्वतःला बघायची
ओळी-मात्रा-अनुस्वार-वेलांट्या
सगळ्यांवरनं हळुवार फिरुन यायची
ही माझी-तीही माझीच अस म्हणत शिक्का मारुन यायची
तो असहाय्य असल्या मालकीहक्कांबद्दल
धीरे धीरे या रहदारीच रुप एकेरी होत गेलं
दारातल्या कवडश्यांच ऊन होत गेलं..
मग तिला कळलं...
भारण्या-उतरण्यातलं निरंतर द्वंद
किनार्‍यावरच्या वाळुशी लाटांचा संग
अन हेही कळलं
दाणे टाकले म्हणुन पाखराचे पंख चाचपणं
म्हणजे वेडेपणच
..
..

आता ती त्या कविता नुसत्याच वाचते
अन त्यातल्या दिवस-रात्रींचे अर्थ शोधते!!!

*******************************
*******************************

गुलमोहर: 

ती त्या कवितांत स्वतःला 'बघायची'

यातच सारं काही आलं ना!. खूप सुंदर.
पण दाणे टाकणारं, आणि पंख चाचपणारं (कुरवाळणारं जास्त चांगलं वाटेल का?)
कोण? कवितेची प्रेरणा की कवी?

छान..!!

भारण्यातलं-उतरण्यातलं निरंतर द्वंद
किनार्‍यावरच्या वाळुशी लाटांचा संग
अन हेही कळलं
दाणे टाकले म्हणुन पाखराचे पंख चाचपणं
म्हणजे वेडेपणच

छान.

छान .

अलिप्त राहुन प्रेम करण्याची कल्पना मांडलीये का गिरीशजी..मला असं वाटलं.
म्हणुन वेगळी वाटली कविता..खुप छान..

सगळ्या मित्रांचे मनःपुर्वक आभार Happy
एका नात्याचा ( हे रिलेशनशिप म्हणण इतक सोयीच का झालय ...) प्रवास दाखवायचा प्रयत्न केलाय पण ते एक्सप्रेशन प्रत्येकाला वेगवेगळ वाटू शकत.
भरत : दाणे टाकणारं...... - ते कवितेच्या प्रेरणेलाच उद्देशून
मुकुंदजी : तिला छळणारं द्वंद अन त्यातला बदलणारा अर्थ अस अभिप्रेत आहे शिर्षकात... प्रथम मी "अर्थातलं द्वंद की द्वंदातला अर्थ" अस काहीस लांबलचक शिर्षक घेतल होत्..पण मग बदललं...
( मुकुंदजी : मी आज योगायोगान हा प्रतिसाद दुबईतूनच लिहीत आहे ...)

सुमेधा : होप आय आन्सर्ड युवर क्वेश्चन अल्सो Happy

सस्नेह : गिरीश

दारातल्या कवडश्यांच ऊन होत गेलं.. व्वाह!
टर्निंग पॉईंट दाखवलात आणि तो ही असा.. कवडश्यांच ऊन.. आवडलं! Happy

लहान तोंडी मोठा घास घेतोय गिरीशजी माफ करा पण कवडश्यांच ऊन कश्यामुळे झाल हे जर एका वाक्यात मध्येच आल असत तर पूर्णत्वाकडे गेल असता तो नात्यातला प्रवास अस वाटून गेलं. मस्त पंच आला असता तिथेही.

वैभवच्या काही ओळी आठवताहेत एका कवितेतल्या राहून राहून (त्याची परवानगी न घेता टाकतोय.. माफी वैभवा)

... त्यानंतर

त्यानंतर त्या वेशीवरती
ऊन सावली विभक्त झाले
त्यानंतरचे चंद्र निरर्थक
त्यानंतरचे सूर्य निरर्थक!

माणिक : अरे कसला घास अन कसल काय राव...तुमच्या अभ्यासपुर्ण प्रतिसादात बरच काही वेगळ्या रितीन बघता येत ... थँक्स फॉर दॅट... प्रथम मला ते 'अनसेड'च ठेवावस वाटल (बहुधा कविता शब्दबंभाळ होणार या भितीन )पण तुमचा प्रतिसाद बघुन मी जरा वेगळ्यान यावर विचार केला अन पटलाही...बदल टाकतोय बघा आवडतोय का ते Happy

अन हा... वैभवच्या या चार ओळी एकदम जानलेवा आहेत...धन्यवाद त्या सांगितल्याबद्दल !!!

सस्नेह : गिरीश