समुद्रफळ

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

समुद्राकाठचे खारे वारे आणि मतलई वारे सर्वच प्रकारची झाडे वाढु देत नाहीत. सुरुची म्हणजेच कजुरिना सारखी विरळ पानांचीच ( खरे तर ती पाने नसतात, देठच असतात ) झाडे तिथे वाढू शकतात.

samudrafaL.jpg

पण हे समुद्रफ़ळाचे झाड मात्र याला अपवाद दिसतेय. मुंबईला चौपाटीवर, लाला लजपतराय कॉलेजजवळ याची छान वाढलेली झाडे अहेत. तशी इतरत्रहि हि झाडे आहेतच, पण नेव्ही नगरच्या टि आय एफ़ आर च्या आवारात मात्र ती भरपुर आहेत.
हे झाड तसे बरेच उंच वाढते. पानांकडे बघुन खोट्या बदामाच्या पानांचा भास होतो खरा, पण फ़ांद्याची ठेवण आणि पानांचा आकार, आणि तजेला वेगळा असतो.
पाने खुपच तजेलदार असतात. आणि गोलाकार रचनेत असतात. याच्या फ़ुलात पर्जन्यवृक्षाच्या फ़ुलाचा भास होत असला तरी हे फ़ुल बरेच मोठे असते. पाकळ्या पांढर्‍या असतात पण पुंकेसराच्या पसार्‍यात बापुडवाण्या लपुन बसलेल्या असतात. जवळजवळ सहा सेमी लांबीचे असतात. पांढरे आणि गुलाबी अश्या दोन रंगाचे तलम आणि रेशमासारखे तजेलदार. कळेहि तसेच भारदस्त.
हे फ़ुल जरा फ़ुलले कि धपकन खाली पदते. पडताना केवळ पुंकेसराचा घोसच खाली पडतो. पडताना बॅडमिंटनच्या फ़ुलासारखे दिसते पण जमिनीवर पडताच ते फुटते. त्यातून जर काहि पुंजके धड उरलेच असतील तर ते परत हवेत उडवुन पाडण्याचा एक खेळ खेळता येतो.
पायतळी अशी चक्रे पडल्यावरच वर लक्ष जाते, एरवी पानांच्या पसार्‍यामूळे, फ़ुले झाडाखालून दिसत नाहीत.

या झाडाला तशी वर्षभर फळे लागत असली तरी ती मुंबईत क्वचित दिसतात. या फ़ळांचा आकार फ़ारच वेगळा असतो.
वरुन सपाट चौकोनी आणि खाली निमुळता होत फ़ेलेला. साधारणपणे शिवलिंगावरचे अभिषेकपात्र असते त्याचा भास होतो. फ़ळही तसे मोठेच असते.

याचे शास्त्रीय नाव Barringtonia acutangula हे खरे तर मूळचे गोड्या पाण्याच्या सोबतीने वाढणारे झाड आहे, पण खार्‍या पाण्याच्या सोबतीनेही छान वाढते. याच्या लाकडाचा जळण म्हणुन तर उपयोग होतोच पण या झाडांपासून मासे पकडण्यासाठी एक प्रकारचे विषही तयार करतात. अलिकडेच या झाडाच्या सालीपासून वेदनाशामक औषधे तयार करण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत
पण ते संशोधन पुर्णत्वाला जाऊन प्रत्यक्षात ते औषध बाजारात उपलब्ध होण्यास काहि कालावधी लागेलच.

विषय: 
प्रकार: 

दिनेश, सुंदर आहे हे झाड. पाने खरचं बदामासारखी आणि फुले पर्जन्य नाहीतर शिशिराच्या फुलासारखे दिसते. कळ्या तगरीच्या कळीसारख्या दिसतात.

फुलांसारखेच याच्या फळाचेही प्रकाशचित्र बघायला आवडेल. छान माहिती व या झाडाचे उपयोग.
विषय थोडा वेगळा आहे परंतु माहितीसाठी विचारीत आहे या झाडांपासून मासे पकडण्यासाठी विष तयार कले जाते. विषप्रयोग करुन मासे कसे पकडले जातात.

बी, याचे फुल बरेच मोठे असते. पर्जन्यवृक्षाच्या किमान दुप्पट तरी.
किशोर याच नव्हे तर अनेक समुद्री वनस्पतिंच्या पानांचा रस पाण्यात टाकल्यास मासे मरतात. या विषाचा मनुष्यप्राण्यावर काहि परिणाम होत नाही. मला वाटते, झाडानी स्वरक्षणासाठि असे द्रव्य तयार केले असावे. त्याचा उपयोग माणुस करुन घेतो. पण या विषाचा परिणाम पाण्यातही फार काळ टिकत नाही. नाहीतर मासे तिथे जगलेच नसते. शिवाय याचा परिणाम थोड्या क्षेत्रातच होतो.

पाण्यात काहि स्फोट करुनही मासे पकडले जातात. त्यात मात्र मोठ्या संख्येने मासे मरतात. पारंपारिक रितीत वेळ फार जातो, तसेच किती मासे मिळतील ते सांगता येत नाही, अश्या पद्धतीत मात्र हमखास मासे मिळतात.

माहिति ख्ररच छान आहे त्याउपरान्त मला एक विचारायचे होते ह्या फळाचे उपयोग काय ?

हे फळ लहान बाळ|चा छातितला कफ बाहेर काढण्यास होतो का ? मि एइकले कि जर आपण हे फळ थोड्या पाण्या बरोबर दगडावर घासले आणि तो रस जर लहान बाळ|ला पाजला तर सगळ| कफ उलटिने बाहेर निघुन येतो.

हे बरोबर आहे का ?

कमलेशकुमार गुजराथि
Kamleshkumar Gujarathi

जर माणसाने नेहमीच चान्गली काम केली तर अजून काय हवय.

दिनेशदा, ह्या झाडाचं नाव सांगितल्याबद्दल स्पेशल धन्यवाद माझ्या लेकाकडून.....आमच्या घराशेजारीच मोठ्ठं झाड आहे समुद्रफळाचं. त्याच्या फळाच्या आकारामुळे आम्ही इतके दिवस त्याला चौरंगाचं झाड म्हणायचो Proud
फळाचे फोटो अपलोड करायचा प्रयत्न केला, पण जमत नाहीये. माबोवर नवीन असल्याने ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत अजून. काय करायचं फोटो टाकायला ?

रुईयात असताना आम्हा मैत्रीणींचा एक ठरलेली पायरी होती गप्पा मारायची, त्याशेजारीच हे झाड होतं ...सुंदर फुलं आणि वेगळाच काहीसा उग्र वास...... हे फुलं पाहिली कि ते दिवस आठवतात.

दिनेशदा,
कोंकणात बर्‍याच समुद्रकिनारी ही फुलं पहायला मिळतात. फोटो व माहितीबद्दल धन्यवाद.
<<समुद्राकाठचे खारे वारे आणि मतलई वारे सर्वच प्रकारची झाडे वाढु देत नाहीत.>> मालवणच्या
समुद्रकांठच्या गावांत [ देवबाग, वायरी इ.] हल्ली रेताड जमिनीतही घराभोवती फुलझाडांच्या बागा लोकानी फुलवल्या आहेत व त्यात गुलाब, जास्वंद इ. झाडंही आहेत.
<<पाण्यात काहि स्फोट करुनही मासे पकडले जातात. त्यात मात्र मोठ्या संख्येने मासे मरतात>> माझ्या माहितीप्रमाणे आरमारी बोटीही याचा उपयोग करत पण त्यामुळे विनाकारण असंख्य मासे मरतात व मोठ्या क्षेत्रातील माशांची जननक्षमताही नष्ट होते,यामुळे यावर जागतिक स्तरावर बंदी घालण्यात आलेली वाचनात आलं होतं.

दिनेशदा असेच फुल अगदी गुलमोहरासारख्या मोठ्या असणार्‍या झाडाला दिसते.

भाऊ, आमचे घर मालवणातच होते (मेढ्यात) पण आता बर्‍याच वर्षात जाणे झाले नाही. मालवणच्या किनार्‍यावर नोनीची पण झाडे होती. किनार्‍यावर असते ती मर्यादावेल. तिच्यापुढे झाडांनी जायचे नसते.
पण त्या मर्यादेच्या आता बरीच फूलझाडे वाढतात. अबोली, जास्वंद, कृष्णकमळ पण ती सगळी मर्यादीत उंचीची.

रुणुझुणू, इथे त्यासाठी वेगळा बीबी आहे (फोटो अपलोड करण्यासाठी) फळांचा फोटो मला पण हवा होता.

मामी, त्या काळात रूईयाच्या आवारात, कनकचंपा, शिरिष, वाकेरी, मुचकुंद अशी बरीच झाडे होती. आता सगळीच नष्ट झालीत.

रुणुझुणू, फळांचा आकार मस्तच आलाय.
मी वर्णन केलेल्या, फुलांच्या आणि पकळ्यांच्या अवस्था पण मस्त आल्यात.
हि माझी बरीच जुनी मालिका होती. आता नव्याने भर घालायला हवी त्यात.