निश्चेत आस

Submitted by shashank pratapwar on 6 March, 2010 - 04:15

वांझोटी स्वप्न बेदरकार किंचाळतात
वासनेचा मोहोळ घोंघावत उठतो
तीळ तीळ संपते एकेक ओळ मनाची
रक्त गोठवणाऱ्या रात्रींच्या मागोमाग
पेटून उठते फक्त सोलणारी जाणीव
चिरंतन शापाचे नवे संदर्भ घेऊन
श्वास कातरत...जीव कुरतडत...
ऐकवत असते मला
संपलेल्या संगीताची निश्चेत आस

- शशांक प्रतापवार

गुलमोहर: 

छान.

संपलेल्या संगीताची निश्चेत आस....
एकेक विशेषण चटका लावणारे..वांझोटे स्वप्न,रक्त गोठवणार्‍या रात्री, सोलणारी जाणीव, चिरंतन शाप.

बापरे!

सर्वांचे आभार... अस्वस्थ मनाच्या रात्रीचा अनुभव शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय.

@दक्षिणा
समजली नाही तरी चालेल पण त्यातली अस्वस्थता तुमच्यापर्यंत पोहोंचली असेल.