रंगबावरी..!!

Submitted by Girish Kulkarni on 1 March, 2010 - 07:54


******************************
******************************

तो रंग लावत गेला
अगदी चित्रकाराच्या तन्मयतेनं
अन ती मात्र स्तब्ध...लुप्त
त्याच्या अनाहुतपणात
तो परत गेलाही...तृप्तसा
ती अनभिज्ञच असल्या मळवटींनी
........

आता न्हाणीघरात ती एकटी
पाण्यात बुडवुन अंग-अंग
पण आत कुठेतरी.....
जाणवतेय सुप्त हालचाल..मनाची
केव्हढा रंग चढतोय त्याच्यावर
अन तीही....
सर्वांगानं रंगतेय-भिजतेय
आपसुकच..धीरे-धीरे...पुन्हा-पुन्हा
उतरवतांना शरीरावरचा सगळा रंग !!!!

*******************************
*******************************

गुलमोहर: 

सर्वांगानं रंगतेय-भिजतेय
आपसुकच..धीरे-धीरे...पुन्हा-पुन्हा
उतरवतांना शरीरावरचा सगळा रंग !!!

फारच सुंदर..!!