वेडी माणसं...

Submitted by विमुक्त on 26 February, 2010 - 00:34

You've got to find what you love - Steve Jobs
------------------------------------------------------------------------
परवा इंटरनेटवर Heinz Stucke बद्दल वाचलं.. एकदम वेडा माणुस आहे हा.. हा मुळचा Germany चा.. वयाच्या २० व्या वर्षी सायकल घेऊन जग बघण्या साठी घरातून बाहेर पडला.. आज पर्यंत ५४५००० कि.मी. सायकल चालवलीय आणि १९३ देश भटकलाय.. घरातून बाहेर पडला तेव्हा त्याच्याकडं एक सायकल, थोडेफार कपडे आणि फारच थोडे पैंसे होते.. त्याच्या फिरण्याला त्याच्या बाबांचा विरोध होता, त्यामुळं त्याला बाबां कडुन पैश्याची मदत मिळाली नाही आणि त्याला ती नकोच होती.. जवळचे पैसे संपले की असेल त्या देशात पडेल ते काम करायचा.. कधी एखाद्या दुकानात तर कधी एखाद्या बोटीवर काम करुन थोडेफार पैसे मिळवायचा.. पुरेसे पैसे जमले की पुढच्या प्रवासाला सुरुवात करायचा.. मग हळु-हळु त्यानं काढलेल्या फोटोंचे पोस्टकार्ड, लीहीलेले अनुभव विकून पैसे मिळू लागले.. बरेच अपघात आणि अडचणी आल्यातरी त्यानं प्रवास मात्र अखंड चालू ठेवला.. आता त्याला बर्याच sports कंपन्या sponser करतात.. आता तो ६८ वर्षांचा आहे.. अजूनपण तो सायकलवर भटकतोय..
तु इतकं का भटकतोस असं त्याला विचरल्यावर तो म्हणाला होता..
By that time I was 20, I did not particularly like my job and I did not see why I should spend the rest of my life doing something I did not care for very much .... just to make a living. "Is this all there is to life?", I asked, "I might as well go around the world"

(Heinz Stucke चा हा फोटो मी इंटरनेट वरुन मिळवला आहे...)

---------------------------------------------------------------------------
अल्ट्रा रनींग (ultra running) हा एक भारी प्रकार आहे. मँरेथॉनच्या दुप्पट-तिप्पट अंतर ह्या रेस मधे पळायचं असतं. म्हणजे १०० कि.मी. किंवा त्याहून जास्तच. दोंगरदऱ्या, वाळवंट, स्नो अश्या अवघड जागी एकटं-दुकटं पळायचं असतं. प्रचंड वेदना आणि प्रचंड आनंद अनुभवायचा असतो.

Diane Van Deren ही एक अल्ट्रा रनर आहे. हिला नकाशे वाचता येत नाहीत... हिच्या organizational skills आणि memory फारच weak आहेत... रेस मधे पळताना अनेकदा चुकीची वळणं ती घेते... बऱ्याचदा तीला परतीचा रस्ता देखील आठवत नाही... तरी सुद्धा ती पळते... आणि नुसतीच पळत नाही तर मागच्याच वर्षी Yukon Arctic Ultra 300 ही रेस ती जींकली. खूपच खडतर रेस असते ही. प्रचंड थंडी, स्नो आणि एकटेपणा सहन करुन ती जींकली. ह्याच रेस च 400 mile version पुर्ण करणारी ती पहीली महिला आहे. आता ती ४९ वर्षांची आहे.

Diane Kobs हे तिचं लग्नाआधीचं नाव. ती एक प्रोफेशनल टेनीस प्लेयर होती आणि athletics ची तिला खूप आवड होती. लग्ना नंतर तिसऱ्या मुलासाठी गरोदर असताना (म्हणजे ती ३० वर्षांची असताना) तीला पहिला epileptic seizure आला आणि नंतर नेहमीच येऊ लागले. epileptic seizure च्या वेळी मेंदूचा शरीरावरचा ताबा सुटतो आणि भयंकर अनियंत्रीत हालचाली शरीर करु लागतं. मेंदूच्या एका ठरावीक भागातूनच हे epileptic seizures येत असल्या कारणानं तीचं ऑपरेशन करण्यात आलं. ऑपरेशन (lobectomy) मधे तीच्या मेंदूचा एक लहानसा भाग कायमचा काढून टाकला. आता तीला seizures येत नाहीत, पण लोकांचे चेहरे नीटसे लक्षात राहत नाहीत... गाडी नक्की कुठे पार्क केलीयं हे पण आठवत नाही. आपल्या कुटूंबातल्या महत्वाच्या घटना तीच्या लक्षात राहाव्यात म्हणून तीच्या नवऱ्यानं त्या घटनांचे फोटो घरभर लावून ठेवलेत.

नवरा आणि मुलं तीला सतत प्रोत्साहन देतात आणि ती तासोंतास पळत असते... वेळेचं आणि अंतराच भान तीला नसतं... पळत असताना पायाच्या आवाजावरुन 'आपण किती वेगात पळतोय' ह्याची जाणीव तीला होते... बऱ्याचदा मध्यरात्री हेडलँप आणि रनींग शुज घालून सरावासाठी ती घरा बाहेर पडते...

(Diane Van Deren चा हा फोटो मी इंटरनेट वरुन मिळवला आहे...)

खरंच काय जीद्द असेल तीची!... इतक्या लिमीटेशन्स असून सुद्धा अजीबात तक्रार न करता ती पळते...
इंटरनेटवर तीच्या बद्दल वरची माहीती वाचली होती आणि त्यातच लिहीलं होतं...
"she just runs, uninhibited by the drudgery of time and distance, undeterred by an inability to remember exactly where she is going or how to get back".
---------------------------------------------------------------------------
"डॉक्टर, मला पेनकिलर नका देऊ... मला वेदना सहन करायच्या आहेत..." असं माझ्या मित्राचे बाबा डॉक्टरला सांगत होते.

७१ वर्षांचे आहेत ते. ६ महिन्यापुर्वी पळत असताना पायतपाय अडकून पडले. उठायचा प्रयत्न केला पण डावा पाय टेकवताच येईना. मग कसेबसे स्कूटर चालवत घरी पोचले. दोन दिवस वेदना अजीबात कमी झाल्या नाहीत. डॉक्टर कडे गेल्यावर कळालं की डाव्या पायाचं achilles tendon तुटलयं. डॉक्टरच्या सल्या नुसार ऑपरेशन केलं. त्यांनी ऑपरेशन नंतर पेनकिलर घेतल्या नाहीत.
म्हणाले... "पूर्वी युध्दात मावळे जखमी होत असणार... मग उपचाराच्या वेळी ते कुठे पेनकिलर घ्यायचे? बघू तरी किती सहन करु शकतो ते...".
रात्रभर खूप वेदना झाल्या. रामाचं नामस्मरण करत रात्र काढली.

ह्या ऑपरेशन नंतर पुर्ववत चालायला ६ महिने लागतात. "उगीचच पळायला गेलो आणि पडलो" असं एकदा सुद्धा ह्या ६ महिन्यात काका म्हणाले नाहीत. मागच्याच आठवड्यात ६ महिने पुर्ण झाले आणि काका पळायला पण गेले. डावा पाय जरा दुखला, पण प्रचंड आंनदी होते ते.
म्हणाले..."खूप वाट बघत होतो आजच्या दिवसाची... मस्त वाटलं पळून...".
आता परत नियमीत पळायला जातात. कधीकधीतर अनवाणीच पळतात. अधून-मधून अजिंक्यताऱ्यावर, सज्जनगडावर जातात. कोणतीही गोष्ट करताना एकदम प्रसन्न आणि उत्साही असतात. आपण एकादी गोष्ट आता करु नये किंवा करु शकत नाही असं त्यांना अजीबात वाटत नाही. अश्यावेळी... "नको रे... आता मला जमत नाही... झेपत नाही" असं म्हणणाऱ्या अनेक फक्त वयानं तरुण असणाऱ्या लोकांची आठवण होते.
----------------------------------------------------------------
"आयुष्यात नक्की काय करायचयं?" असा प्रश्न अनेकदा पडतो मला.... आणि आजकाल दर वेळेस त्याचं एकच उत्तर सुध्दा मिळतं, पण "हेच ते! आता काही झालं तरी हेच मी करणार" असं म्हणून झपाटल्यागत वागायचं धाडस अजून होत नाहीये...

विमुक्त
http://murkhanand.blogspot.com/

गुलमोहर: 

छान माहिती!!
>>पण "हेच ते! आता काही झालं तरी हेच मी करणार" असं म्हणून झपाटल्यागत वागायचं धाडस अजून होत नाहीये...
हंअमम...

छान लिहिलय, विमुक्ता.
<<"आयुष्यात नक्की काय करायचयं?" असा प्रश्न अनेकदा पडतो मला.... आणि आजकाल दर वेळेस त्याचं एकच उत्तर सुध्दा मिळतं, पण "हेच ते! आता काही झालं तरी हेच मी करणार" असं म्हणून झपाटल्यागत वागायचं धाडस अजून होत नाहीये...>>

आपल्याला जे आपलं, आतलं वाटतं ते उरलेल्या दुनियेला वाटत नाही म्हणून आपणच ते "झपाटल्यासारखं" ह्या खणात टाकून मोकळे होतो नाही? मोकळे होतच नाही खरतर...
पण तुझं हे स्वगत आवडलं.

"झपाटल्यासारखं" म्हणजे एकदम मनापासून म्हणायचयं मला... "झपाटल्यासारखं" म्हणजे अगदी १००% प्रयत्न करायचे मग निकाल काहीही असो... उरलेल्या दुनियेशी तुलना नाही करत आहे मी...

'आयुष्यात नक्की काय करायचयं?" असा प्रश्न अनेकदा पडतो मला.... आणि आजकाल दर वेळेस त्याचं एकच उत्तर सुध्दा मिळतं, पण "हेच ते! आता काही झालं तरी हेच मी करणार" असं म्हणून झपाटल्यागत वागायचं धाडस अजून होत नाहीये...' खरय विमुक्ता..आपल्याला जे आतून करावेसे वाटते त्याच्यासाठी थोडासा झपाटलेपणा हवाच नाहीतर जन्मभर आवडत नसलेली नोकरी/व्यवसाय करण्यात आयुष्य कधी म्हातारं होईल ,कळणार ही नाही. निदान पोटापाण्यासाठी काम करताना आपल्या हॉबी साठी मात्र प्रत्येकाने वेळ काढणे जरूरीचे आहे..प्रत्येकाला Heinz Stucke बनणे अशक्यच..

बरोबर... प्रत्येकाला Heinz Stucke बनणे अशक्यच... पण तुम्ही म्हणता तसं पोटापाण्यासाठी काम करताना आपल्या हॉबी साठी मात्र प्रत्येकाने वेळ काढणे जरूरीचे आहे... खरंतर हॉबीला पण तेवढंच महत्व दिलं पाहिजे... कारण हॉबी मुळे जगण्याला अर्थ येतो... आणि रोजचं कामंच जर हॉबी असेल तर आनंदी आनंद...

खुप छान माहिती...

मी ही आता काहीतरी करतोच! बरेच दिवसापासुन मनात होते, अन आत्ताच माझ्या 'ज्ञान केंद्र' ह्या उपक्रमाचे ऑर्कुट वर प्रोफाईल बनवत होतो.....

नेवासा तालुक्यातील (नेवासा तालुका हे एक प्राथमिक युनिट मानुन)
१)ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीमध्ये मदत करणे.
२) शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी पडणारी क्षेत्रे लक्षात घेउन त्या उणीवा दुर करण्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना सहकार्य करणे.
३) रोजगाराच्या अन स्वयंरोजगाराच्या संधींबद्दल माहिती देणे.
४) उच्च शिक्षणासंबंधी संधींची माहिती देणे.
५) शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, क्रिडा, आरोग्य, सामाजिक अन राजकीय क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे.
६) नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान त्यांचे पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणे.
७) प्रगत राष्ट्रांमधील नागरिकांच्या राहणीमानाच्या दर्जाप्रमाणेच, ग्रामीण भारतातील नागरिकाचे जगणे सुसह्य व्हावे ह्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करणे.
.

(व्यक्तीगत पातळीवर अनेकांना माहीती, मदत, सल्ला ह्या कामाच्या स्वरुपाला संस्थात्मक रुप देण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत! ) बघु कितपत यश येतेय.....

बचेंगे तो ओर भी लडेंगे......:)

विमुक्त,

तू वर जी वेड्या लोकांची उदा. दिली आहेत ती वाचून मला काहीही वाटले नाही कारण त्यांच्या सानिध्यात मी कधी राहिलेलो नाही. पण इथे तू जे काही प्रवास करतोस ते इतके छान यथार्त लिहितोस की तू मला वेडा वाटतो.

आयला, काय एकेक वल्ली असतात ना?
अन त्यामानाने आपण कस्ल सुखासीन आयुष्य जगत अस्तो? इश्वरदत्त शरिराला कसलीच तोशिश लागू न देता व पुढे लागु नये म्हणून!
तुमचे काका पण लय भारी! पेनकिलर न घेता सहन करायचे म्हणजे जोक नाही!
(फक्त त्यान्ना म्हणाव, त्याकाळी देखिल उपचार होते अ‍ॅनॅस्थेशिया नसला तरी बधिरतेचे अन्य उपाय होते, अर्थात आजच्या इतक सोप्प नव्हते ते! आमचा एक मित्र आहे, तो अन इतर ट्रेकला गेलेले, तिथे एकजण जखमी झाला, तर कातकर्‍यान्नी ती जखम, विशिष्ट जातीच्या वनस्पतीन्चा पाल्याचा रस जखमेत भरुन, नन्तर दोन्ही बाजुन्ची कातडी चिमटीत पकडुन, विशिष्ट जातीच्या डोन्गळ्यान्ना तिथे चावावयाला लावुन नि मग त्याच्या जबड्याने दोन्ही बाजुची कातडी पकडली की मुन्डके तोडुन, असे अनेक मुन्गळे लावुन जखम शिवुन टाकली होती! एका अर्थाने काकान्चा "सहनशक्तिबाबतचा" प्रयोग [?] बरोबरच होता अस म्हणायच, आमच्यासारख्याला अवघड आहे! )

"अन त्यामानाने आपण कस्ल सुखासीन आयुष्य जगत अस्तो? इश्वरदत्त शरिराला कसलीच तोशिश लागू न देता व पुढे लागु नये म्हणून!".... हे अगदी खरंय...

man vs wild मधला Bear Grylls म्हणतो तसं जगायचा पुरेपुर प्रयत्न केला पाहिजेे...
"Remember that life should not be a journey to the grave with the intention of arriving safely in an attractive and well preserved body, but rather to skid in sideways, covered in scars, body thoroughly used up, totally worn out and screaming `yahoo! what a ride!'".

ही सगळी वेडी माणसं 'लोकैषणा' न बाळगता, लोक मला काय म्हणतील ह्याची तमा न करता स्वतःच्याच मस्तीत जगतात. असं मस्त, मुक्त 'वेडेपण'च त्यांचं वेगळेपण जाणवून देते.
माहितीचं संकलन व सादरीकरण आवडले! Happy