तुला पाहताच मी...................

Submitted by श्रीमत् on 25 February, 2010 - 03:07

आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्ती कोन? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न हा पण ही व्यक्ती कोणीही असु शकते उदा. जवळचा मित्र/मैत्रीन, प्रियकर /प्रेयसी, नवरा/ बायको, भाऊ/बहीन अगदी आपले आई/बाबा सुद्दा व कशाचीही अपेक्षा न करता ही व्यक्ती (वर दर्शविल्याप्रमाणे) आपल्यावर निर्व्याज, निस्वार्थ प्रेम करत असते कशासाठी.....? अर्थात आपल्याच उत्कर्षासाठी. कधी-कधी आपल्याला ते जाणवते ही पण गळ्यापर्यंत आलेले शब्द तसेच अडखळुन पडतात कारण तिच्या (वरील प्रमाणे कोणीही?) निष्पाप प्रेमापुढे शब्दही थिटे पडतात व नकळतच अंतकरणातील पटलावर उमटु लागतात ते असे........................

तुला पाहताच मी,
शब्द आज गोठले.
अजुन बंद ओठ हे,
न बोलताच उमटले........ ॥ध्रु॥
वास तु सहवास मी,
आभास तुच भास मी.
न झाकताच पापण्या,
नयन आज झडपले..........॥१॥
हर्ष तु उल्हास मी,
स्पर्श तुच आस मी.
न शोषताच रुधिर हे,
ह्रुदय आज धडकले...........॥२॥
वेळ तु अवेळ मी,
नाळ तुच बाळ मी.
न मांडताच डाव हा,
खेळ आज बहरले............॥३॥
शक्त तु अशक्त मी,
अव्यक्त तुच व्यक्त मी
न संचित नभात या,
मेघ आज बरसले.............॥४॥
निस्वार्थ तु स्वार्थ मी,
अर्थ तुच व्यर्थ मी.
न दाटताच कंठ हा,
बाष्प आज खळकले..........॥५॥
तीर तु कमाण मी,
धीर तुच उधान मी.
न सोडताच जीव हा,
प्राण आज हरपले...................॥६॥

Shrimat

गुलमोहर: