भगवंत ते क्रेमलिन...(एक प्रवास)

Submitted by aishwarya2211 on 23 February, 2010 - 06:27

६ वर्षांपूर्वी ...एकदम उत्साही आणि आनंदी मनाने एक निर्णय घेतला..तो म्हणजे पुढील शिक्षणासाठी
मॉस्कोला येण्याचा...
आता १८ वर्षे कधी आई वडिलांशिवाय ३०किमी गेले नाही,ते एकुलते एक कन्यारत्न मॉस्कोला कसे जाणार??मोठाच प्रश्न?माझा आणि डॅडचा निर्णय तर पक्का होता...प्रश्न होता आमच्या मातोश्रींचा...
मी आणि माझ्या पिताश्रींनी आईला लाडीगोडी लावून.हरतर्‍हेने समजावून राजी केले...
शेवटी पंतप्रधान डॅड असले तरीही...गॄहखाते आणि बालकल्याण खाते मातोश्रींच्या अखत्यारित...
त्यामुळे माझ्याबाबतीत शेवटचा शब्द तो मातोश्रींचा...
मी मम्माला समजावत होते...अगं मी राहू शकते..माझी काळजी घेऊ शकेन..
आणि career साठी तर एवढे करावे लागेल ना...बरेच emotional balckmailing..केले...
अहो..आईवडिलांना कसे पटवायचे हे आम्हा मुलांना बरोबर जमते..त्यासाठी कोणतेही training घ्यावे लागत नाही..:)असो..शेवटी अथक प्रयत्न करून आईसाहेब तयार झाल्या...
आता पुढे अनेक प्रश्न होते..एकुलती एक असल्यामुळे जरा जास्तच लाड झाले आहेत..त्यामुळे आईवडिलांना काळजी वाटणे साहजिकच आहे..सर्वप्रथम मुद्दा आला तब्येतीचा...मॉस्कोमध्ये म्हणे temp
-20.-30 पर्यत जाते..आता??कसे राहणार एवढया थंडीत??कारण आमची तब्येत पडली नाजूक..
परत नशिबी asthma होताच.हे म्हणजे आगीतून फुफाट्यात असे काहीसे होत होते..
मग बोलावणे गेले आमच्या फॅमिली डॉक्टर ना..डॉक्टरकाकांसोबत meeting fix झाली..त्याचे म्हणणे असे पडले की भयंकर थंडी असल्याने आणि माझी तब्येत नाजूक असल्याने मॉस्कोला जाणे जरा धोक्याचेच आहे..परत तिकडे आजारी पडत राहिले तर अभ्यास आणि तब्येत कसे सांभाळणार??म्हणून रहितच करावे हे बेहतर..हे ऐकून माझा कलिंगडाएवढा चेहरा लिंबाएवढा झाला होता..:)
आता risk घ्यायची हिम्मत कोणामध्येही नव्ह्ती..पण मी एखाद्या लढाईवर निघालेल्या वीरकन्येसारखी निश्चयाशी ठाम होते..मी जाणार म्हणजे जाणार..माझा निश्चय पक्का आहे..त्यावेळी अचानक मला स्फुरण चढले..कोठून उत्साह आला माहीत नाही..फक्त तलवार आणि घोडयाची कमी होती...नाहीतर झाशीच्या राणीनंतर मीच एवढा माझा उत्साह ओसंडून वाहत होता..:)असो..माझा आत्मविश्वास पाहून सर्वांनी तोंडात चमचे घातले..अहो आम्ही जेवत होतो ना.ही सर्व चर्चा चालू असताना..म्हणून..:)
शेवटी निर्णयावर शिक्कामोर्तब झाले..आणि माझे invisible घोडे गंगेत नहाले..:)
मग लगबग चालू झाली..passport,documentation,admission etc..आणि इकडे आमचे डॅड माझी प्रॅक्टीकल घेत होते..याआधी एकटीने कोठे प्रवास केला नव्हता..पण आज डॅडने सांगितले सांगलीला जाऊन तुझा engineeringcha form fill up करून ये म्हणून..त्याना पहायचे होते मी मोठ्या उत्साहाने परदेशात जायचे निश्चित केले होते..तर आता मी निदान सांगलीला तरी जाऊन एकटी form fill up करून येऊ शकते का नाही ते..?शेवटी ऐनवेळी जर माझा निर्णय डळमळीत झाला तर engg ची admission पक्की होतीच..

क्रमश:

गुलमोहर: 

Here i am going to write my journey from India to Russia..my day to day experiences..
but i dont know whether lalit category is appropriate for this article..please anyone can tell me which is appropriate category for my article?
जेवढे जमेल तेवढे लिहायचा विचार आहे..बघूया किती जमते ते?

लिहा लिहा ललित म्हणून लिहा...
पण क्रमशः करण्यापेक्षा भाग-१, भाग-२ असे लिहा... आणि प्रत्येक पुढच्या भागाच्या सुरुवातीला आधीच्या भागाची लिंक आणि आधीच्या भागाच्या शेवटी पुढच्या भागाची लिंक द्या म्हणजे वाचणार्‍यांना पण सापडायला सोपे जाईल..

ऐश्वर्या,सुरुवात तर चांगली वाटतेय. पण हे क्रमशः प्रकरण मला अजिबात आवडत/झेपत नाही. Angry पण आता लिखाण पटपट येऊ द्या.

दरवेळेस विषय वेगळा असेल ना..कारण मॉस्कोच्या भरपूर आठवणी आहेत..
हिम्सकूल तुमचे बरोबर आहे..मी क्रमशः न लिहीता भागाला नावे देत जाईन..धन्यवाद..म्हणजे प्रत्येक भागात तो विषय संपून जाईल आणि आऊटडोअर्स आपल्याला पण चालेल हे कदाचित....?

छान लिहिलय! रशियाबद्दल वाचायला आवडेल.
मराठी प्रतिशब्द वेळीच आठवत नसतील तर अंतरजालावरील शब्दकोष वापरु शकता!
http://www.maayboli.com/hitguj/messages/35/124100.html?1220506281
http://www.online-languages.info/_ud2/dictionary.php?l1=English&l2=Marat...

@सॅम..मराठी प्रतिशब्द आठवतात ..तो प्रश्न नाहीये...पण कधी कधी इंग्रजी टाईप करणे सुलभ जाते म्हणून... Happy Anyway thanks for your link.. Happy