वपुंच्या संवादिनी चे पुढचे पान

Submitted by एस अजित on 22 February, 2010 - 03:21

नुकतच लग्न झालेल्या जोडप्याचा एक रविवार, पावसाळी संध्याकाळ

ती: ????? [त्रासिक चेहरा]
तो: बोला काय हवय ?
ती: मला कंटाळा आला आहे
तो: कोणाचा माझा ?
ती: शट अप
तो: मग ?
ती: माझा वेळ जात नाही रे तू ऑफिस ला गेल्यावर
तो: कमाल आहे. किती तरी गोष्टी आहेत घरी बसून करण्यासारख्या
ती: मला नाही काही सुचत, आणि मला कुठलाही गृहउद्योग करायचा नाहीये
तो: मग गर्भ धारण कर
ती: ????? [ लगेच न कळल्यामुळे, नंतर...त्याला एक जोरात चिमटा] शट अप
तो: अरे त्यात शट अप काय?
ती: म्हणजे तुलाही इतर पुरुषांसारखेच वाटते का मी चूल आणि मुल यातच अडकावे म्हणून ?
तो: मी गर्भ धारण करू शकतो का ? आज ना उद्या तुलाच तो करावा लागणार आहे
ती: ते तर आहेच, ते कोणत्या बाईला चुकलं आहे का ? मला त्या आधी काहीतरी करायचे आहे
तो: तू स्वताला बाई समजायला लागलीस ? अरे देवा माझे कसे होणार आता ?
ती: [रागावून] तू सिरीअसली घेणार आहेस की नाही ?
तो: ओके ओके आय एम सिरिअस नाऊ, टेल मी
ती: मला पण जॉब करावासा वाटतो
तो: का?
ती: ????
तो: म्हणजे ? पैशासाठी, की तुझ्या नॉलेजसाठी ?
ती: अरे असं काय करतोस? पैशांसाठी नाही म्हणत मी. पण माझ्या शिक्षणाचा काय उपयोग ?
तो: तू शिक्षण नोकरी मिळावी म्हणून घेतलेस का ?
ती: [चिडून] तुझ्याशी काही बोलायचं म्हणजे कठीणच असतं, आणि तुझे विचार नॉर्मल लोकांसारखे का नसतात?
तो: चिडू नकोस, स्वतःचे मुद्दे नीट विचार करून मांड
ती: मला नाही जमत ते. मी इतका विचार करून नाही बोलत कधी
तो: तेच मी म्हणतोय, नीट विचार कर आणि मग बोल
ती: मला एवढ्या लवकर अनुभव संपन्न होऊन गंभीर व्हायचे नाहीये
तो : गोंधळ आहे, तू जॉब करायला लागलीस तर तुला विविध अनुभव येणार, मग तू गंभीर होणार नाहीस का ?
ती: मला असं जॉब करून तुझ्यासाठी काहीतरी घ्यावसं वाटतं. एखादा छानसा शर्ट, किंवा भारीतले पेन, गिफ्ट
तो: त्यापेक्षा मी घरी येण्याच्यावेळेस साडी नेसलीस तर मला ते जास्त आवडेल
ती: [अतिशय चिडून] अगदी अगदी टिपिकल...
तो: चिडू नकोस..
ती: तू एकदा साडी नेसून बघ म्हणजे कळेल तुला किती त्रास असतो ते, सतत भीती वाटते मला
तो: भीती काय वाटायची त्यात
ती: सुटली तर ?
तो: नाइस आयडिया
ती: शट अप, मला तर खात्री आहे, मला बघायला आलास तेव्हा मी साडी नेसले नसते तर, तू पसंतीच कळवली नसतीस
तो: अगदी बरोबर, तू मला ओळखायला लागलीस बघ, याला म्हणतात अनुभव, तू छान गृहिणी होते आहेस, आणि मला ते आवडतेय
ती: मी हा विषयच बंद करते, मला राग आला आहे, मी तुज्याशी बोलणार नाही
तो: ओके, माझ्या कडे एक आयडिया आहे, तुला जॉब करायचा आहे ना, बिनधास्त कर, मी माझी नोकरी सोडतो
ती: यु आर इम्पोसिबल, तुझे विचार नॉर्मल होऊच शकत नाही का?
तो: का? आता यात काय प्रोब्लेम आहे ?
ती: मला ते आवडणार नाही की माझा नवरा घरी बसून आहे
तो: अरे तू स्वतःच, स्वतःचा अनादर करते आहेस
ती: म्हणजे ?
तो: घर सांभाळणे यात तुम्ही कमीपणा का समजता तेच मला कळत नाही
ती: ????
तो: हे बघ, मी ऑफिसला निश्चिंत मानाने जाऊ शकतो कारण तू घराची सगळी जवाबदारी सांभाळली आहेस
ती: प्लीज, आपण दोघे संसाररूपी गाड्याचे दोन चाक आहोत वगैरे काही सांगू नकोस
तो: अगदी तेच वाक्य नाही, पण तेच खरं आहे. लग्नापूर्वी मी एकटा राहू शकत होतो की नाही ?
ती: हो पण ते ब्याच्लर म्हणून
तो: कोण म्हणतं असं ?
ती: [रागावून उठून उभी राहते] मला तुज्याशी अजिबात बोलायचे नाहीये
तो: अग अग बैस, मी गम्मत केली तुझी
ती: तेच, सगळ मस्कारीतच चाललेलं असतं तुझं
तो: अग एव्हडीशी तू, आत्ता फ्रोक घालून दहावीच्या वर्गात जाऊन बसलीस तर कोणी ओळखणार नाही तुला
ती: हो, माझ्या वडिलांनी दहावीतच लग्न लाऊन दिले आहे माझे
तो: काय सांगतेस
ती: मस्करी नको करूस, मला करमत नाहीरे काही, तू गेल्यानंतर, सगळा दिवस खायला उठतो, किती टीव्ही बघणार, तेच पिक्चर्स, त्याच सिरिअल्स
तो: डीस्कोव्हरी बघ सांगतो तर ऐकत नाहीस
ती: मला नाही आवडत ते किडे मकोडे, घाणेरडा प्रकार सगळा
तो: नीट विचार करून बघितलास तर जीवनाचा सार कळेल तुला
ती: [उठून जायला निघते]
तो: [तिला हाताला धरून खाली बसवत] हे बघ, तू जॉब केलास तर मला काही हरकत नाही, पण त्यामुळे आपण एकमेकांपासून लांब जाऊ
ती: असं कसं? दिवसभर कुठे जवळ असतो आपण, तुझ्या बरोबरच मी सुद्धा बाहेर पडेन, दोघं ही एकाच वेळी घरी येऊ शकू, कितीतरी कपल्स दिसतात असे
तो: अग तसे नाही म्हणत मी
ती: मग ?
तो: नीट समजून घे, तू जॉब करायला लागलीस तर एका नवीन विश्वाशी तुझी ओळख होईल, जे जोकर्सच्या पिक्चर सारखे गुडी गुडी, केरिंग नाहीये, आणि सहज सोपही नाही
ती: कोण जोकर्स ?
तो: शाहरुख आणि करण जोहर
ती: भलतीकडे जाऊ नकोस. तुला असं वाटतं का मी बाहेरच्या जगात वावरू शकणार नाही म्हणून?
तो: नाही, तसं नाही. तू सहज म्हणून, वेळ जात नाही म्हणून कोणत्यातरी कंपनीत नोकरी करणार
ती: हुं
To: पण ती कंपनी तिचा वेळ जात नाही म्हणून तुला जॉब देणार नाही. ती तुझ्यावर काहीतरी जवाबदारी टाकणार, जी तू कोणत्याही परिस्थितीत नाकारू शकणार नाहीस
ती: म्हणजे?
तो: आता बघ, पुढच्या महिन्यापासून रांगेत सणवार सुरु होतील, श्रावण, गणपती, दसरा दिवाळी, या प्रत्येक वेळी तुला सुट्टी मिळेलच असं नाही, तू नोकरी केलीस तर तू स्वतःला दोन भागात विभागून टाकणार, मग तुला सणवार पण साजरे करायचे असतील आणि ऑफिसचे पण काम असेल. मग ऑफिसचा ताण, गाडीच्या प्रवासातला मनस्ताप, रस्त्यावर थुंकणारे लोकं, नको असलेल्या नजरा, स्पर्श याचा तुला मनस्ताप होणार, तुझी चीडचीड होणार. आपल्या दोघांच्याही माता आत्ता शांत आहेत, पण काही महिन्यानंतर त्यांना बाळाचे वेध लागणार. अशावेळी तू पटकन नोकरी सोडणार, पण ते एव्हडं सोपं नाही. तू जॉब करते त्या कंपनीचे त्यामुळे दैनंदिन रुटीन बदलणार, तू तिथे रुळू लागली असतानाच, त्यांना तुझ्या जागी नवीन मुलगी नियुक्त करावी लागणार. कंपनीच्या दृष्टीने विचार केलास तर ही एव्हडी सोपी गोष्ट नाही. नवीन इम्प्लोयीला सगळं पहिल्यापासून समजाविण्यात त्या कंपनीचा वेळ, पैसा वाया जातो, हा सगळा विचार कर. ऑफिस मधले, प्रवासातले मनस्ताप तू उंबरठ्याबाहेर ठेवू शकशील का? ते तुझ्यासोबत घरात येणार. मी तुला दिस्करेज करत नाहीये पण हे सगळं होणार आणि मग तुझी चिडचिड होणार, आणि तू माझ्या पासून लांब जाणार.
आज मी हे सगळं करू शकतो कारण तू घरची जवाबदारी समर्थपने पेलते आहेस. दोन्ही चाकं एकाच चाकोरीतून चालत नाहीत, तर एकमेकांना समांतर चालतात, म्हणून गाड्याचा तोल राखला जातो. जर तुला तुझी बाजू बदलायची असेल तर मला माझी बाजू बदलावी लागेल, तू माझी बाजू घे, मी तुझी घेतो, सिरीयसली, आत्ता मी मस्करी नाही करत, आणि घर सावरण्यास अजिबात कमीपनाचे समजू नकोस. ते एक व्यवस्थापनच आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी अगदी बाहेर पडण्याची गरज नाही. सुरक्षित आहेस, सुरक्षित रहा ! पण तयार रहा. उद्या काही जरी झाले तरी हातपाय नं गाळता आत्मविश्वासाने उभी रहा . आत्ता तू सुरक्षित कवच तोडण्याची काही गरज नाहीये. तू करशील तो जॉब कदाचित कोणा गरजू मुलाला मिळाला तर ते जास्त चांगले. एक स्त्री शिकली तर सगळे घर साक्षर होते असं म्हणतात, एक पुरुष कमविता झाला तर एका घराचे पोट भरते. बघ पटते आहे का?
ती: ...........
तो: पट्या क्या?
ती: हो
तो: वेरी गुड. एव्हडी रोमांटिक संध्याकाळ, आणि आपण एव्हडे गंभीर झालो आहोत, त्या पेक्षा मस्तसा चहा कर
ती: [तोंड वाकड करत] करते बंर नवरोजी [आत जाते]
तो: चहाच्या आधी मस्त कांदा भजी मिळाली तर क्या बात है
स्वयंपाक घरातून दाणकन भांडी आदळण्याचा आवाज येतो
ती: भजी खायची असतील तर बायकोला मदत करा जरा
तो: [स्वयंपाकघरात जात] ग्रेट, आय अम रेडी

गुलमोहर: 

छान Happy

मस्त !

ही वपुंची कथा ?

मग ऑफिसचा ताण, गाडीच्या प्रवासातला मनस्ताप, रस्त्यावर थुंकणारे लोकं, नको असलेल्या नजरा, स्पर्श याचा तुला मनस्ताप होणार, तुझी चीडचीड होणार >> यातलं नोकरी करणार्‍या पुरुषांना काहीच होत नाही ? की पुरुषांना असल्या गोष्टींचा त्रास होत नाही ?
कैच्या कैच

रस्त्यावर थुंकणारे लोकं, नको असलेल्या नजरा, स्पर्श याचा तुला मनस्ताप होणार, तुझी चीडचीड होणार >> नोकरी न करणार्या बाईला पण काहिना काहि कारणाने घराबहेर जावे लगतेच कि. आणि तेव्हा या सर्व गोश्टिन्चा त्रास होतोच की. मग असे होउ नये म्हणुन काय बायकान्नि घरातच कोडुन घ्यावे काय स्वतला. काय पण logic आहे !!

गोश्टिमधल्या तीचे विचार अगदीच बालीश वाटतात. तिला नोकरी कशासाठी करयची आहे तर - <<मला असं जॉब करून तुझ्यासाठी काहीतरी घ्यावसं वाटतं. एखादा छानसा शर्ट, किंवा भारीतले पेन, गिफ्ट>> तिचे वय फार कमी आहे काय ?
गृहिणी असणे हे कमीपणाचे नक्किच नाही. घर चालवणे ही पण मोठि जबाबदरी आहे. पण तिने नोकरी करु नये म्हणुन त्याने दिलेले justification\logic तर अजीबातच पटत नाही.
<< स्वतःला सिद्ध करण्यासाठी अगदी बाहेर पडण्याची गरज नाही. सुरक्षित आहेस, सुरक्षित रहा ! पण तयार रहा. उद्या काही जरी झाले तरी हातपाय नं गाळता आत्मविश्वासाने उभी रहा . >> आधी गृहिणी असुन नन्तर वेळ आल्याने काम सुरु करणार्या बायका आहेत. पण ही अतिशय कठिण गोश्ट आहे. आणि अशा परिस्थिति मधे तग धरणे अजीबात सोप्पे नाही. तेव्हा 'तहान लागल्यावर विहीर खोदण्याच्या' या उपायापेक्शा शक्य असल्यास आधीच तयरि करणे योग्य नाही का.

नमस्कार,

संवादिनी ला दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल मनःपुर्वक धन्यवाद.

कथेच्या सुरुवातीलाच 'नुकतच लग्न झालेल्या जोडप्याचा एक रविवार, पावसाळी संध्याकाळ' असा उल्लेख आहे. त्यामुळे कथेतील नायिकेकडुन भग्वदगितेतील प्रग्ल्भतेची अपेक्षा नाहीये. हे एक सर्वसाधारण वर्णन आहे. जरुरी नाही की प्रत्येक मुलगी असाच विचार करेल. मी अशा अनेक स्त्रिया बघितल्या आहेत ज्या वेळप्रसंगी खंबिरपणे उभ्या राहिल्या आहेत.
मला कथेतला जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्या बद्द्ल प्रतिक्रिया अपेक्षित होत्या.

तो: ओके, माझ्या कडे एक आयडिया आहे, तुला जॉब करायचा आहे ना, बिनधास्त कर, मी माझी नोकरी सोडतो

नोकरी न करणे म्हणजे अगदिच स्वत:ला कोंडुन घेणे असे नव्हे. वर दिलेला उपाय अजून कुणीही स्विकार्लेला नाहीये.

असो. प्रतिसादाबद्द्ल पुन्हा एकदा मनःपुर्वक धन्यवाद.

<<नोकरी न करणे म्हणजे अगदिच स्वत:ला कोंडुन घेणे असे नव्हे.>> मलाही तेच म्हणायचे आहे. नोकरी न करणार्या बाईला पण काहिना काहि कारणाने घराबहेर जावे लागतेच. आणि तेव्हा त्यानाही << रस्त्यावर थुंकणारे लोकं, नको असलेल्या नजरा, स्पर्श याचा तुला मनस्ताप होणार, तुझी चीडचीड होणार >> असा त्रास व्हायची शक्यता आहेच की. तेव्हा 'नोकरि न करणार्या बायकांना देखिल या problems चा सामना करावा लागतोच. '
त्यामुळे नोकरी न कर्ण्यासठि हे कारण पटत नाही.

<<तो: ओके, माझ्या कडे एक आयडिया आहे, तुला जॉब करायचा आहे ना, बिनधास्त कर, मी माझी नोकरी सोडतो >>वर दिलेला उपाय अजून कुणीही स्विकार्लेला नाहीये.
>> पुर्वी नसेल पण सध्या काही कुटुम्बातुन हा पर्याय पण स्वीकारलेला दिसत आहे. विषेश करुन IT मधे काम करणारी बायको असल्यास. बायको ला onsite opportunity (mostly US ) मिळाल्यास तिच्याबरोबर देशातला नोकरी / व्यवसाय सोडुन H4 वर US ला येणारे काही नवरे बघितले आहेत. अर्थात ते घरातील सर्व काम करतात कि नाहि हे माहित नाही. बायकोला घर कामात मदत करत असावेत. त्यात वाईट कीन्वा कमीपणाचे असे काहीच नाही. ज्या पर्यायाने जास्त फायदा ( कौटुंबिक आणि आर्थिक सुद्धा ) होत असेल तो लोक स्वीकारतात.