स्वप्न...

Submitted by aishwarya2211 on 16 February, 2010 - 14:36

स्वप्न एवढी का सुंदर असतात??
आभाळभर विखुरलेल्या चांदण्यांसारखी???

उघड्या डोळ्यांनी पहावी म्हटले तर दिसत नाहीत..
डोळे जर का मिटले तर संपत नाही..

गेले एकदा स्वप्नात कि सोडवत नाही बंध....
पण धरली वाळू मुठीत तर राहते का कधी ??

ओंजळच व्यापून उरते प्रत्येक स्वप्नाची..
आणि मूठ मात्र रिक्त रहाते..

कारण मागितल्यावर जे मिळते..
ते अट्टहासाने धरल्यावर नाही..

म्हणून

स्वप्न पहावीत,
जरुर पहावीत,
पण त्यांना ओंजळीत भरून घ्यावे,
नेहमी सोबत ठेवण्यासाठी...
मुठीत रहात नाहीत ती,
संपून जातात..

गुलमोहर: 

गेले एकदा स्वप्नात कि सोडवत नाही बंध....
पण धरली वाळू मुठीत तर राहते का कधी ??

ओंजळच व्यापून उरते प्रत्येक स्वप्नाची..
आणि मूठ मात्र रिक्त रहाते..

छान.
ते अट्टहासाने धरल्यावर नाही..
येथे अट्टाहास धरल्यावर नाही, असे पाहिजे ना?
-सविनय.