सिंगापूरमधे नोकरी व्यवसाय

Submitted by महेश on 15 February, 2010 - 20:26

सिंगापुरकर लोकहो, तुमच्या कडे जॉब मार्केट कसे आहे ?
तिकडे डायरेक्ट सर्च करता येईल का ? कसा करता येईल ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश,

कृपया खाली दिलेल्या जॉबसाईटींवर आपले प्रोफाईल बनवून अप्लाय करायला लागा. तुम्हाला थेट अप्लाय करता येते. इथला व्हिसा आधीपासूनच असावा असे बंधन नाही. कंपनीकडून जॉब ऑफर आली तर कंपनी तुमचा एम्प्लॉयमेंट पास काढून देते.

http://www.jobsdb.com.sg
http://www.monster.com.sg
http://www.jobstreet.com.sg

जॉब मार्केट हळूहळू सुधारत आहे. आणि तुमचे प्रोफाईल कंपनीला चांगले वाटले तर तुमच्याशी ते नक्कीच संपर्क साधतील. तुम्ही भारतात असलात तरी फरक पडणार नाही. (माझ्या नवर्‍याची सिंगापुरातली पहिली नोकरी ही त्याला तो भारतात असतानाच मिळाली होती. त्याचे फक्त टेलिफोनावर इंटरव्ह्यू झाले होते. प्रत्यक्ष मुलाखतीस यावे लागेल, वगैरे अटी नव्हत्या.)

तसेच इथे थेट येऊन नोकरी शोधण्यासाठी एक सुविधा सिंगापूर देऊ करते.
'एम्प्लॉयमेंट पास एलिजिबिलिटी सर्टिफिकेट' येथे कृपया माहिती वाचा. हे सर्टिफिकेट मिळाल्यास एका वर्षासाठीचा 'लाँग टर्म व्हिजिट पास' (ज्यात मल्टिपल एंट्री व्हिसा समाविष्ट आहे!) मिळवता येतो, जो घेऊन तुम्ही सिंगापुरात राहू व नोकरी शोधू शकता.

अजून काही प्रश्न, शंका असतील तर जरूर विचारा. अथवा मेल टाकलेत तरी चालेल. तुम्हाला नोकरीशोधासाठी शुभेच्छा!

हो महेश श्रद्धानी सांगितलेली सर्व साईट्स उपयुक्त आहेत. तिथेच नियमित सर्च करत रहा. बघा तुम्हला एक दोन दोन महिन्यातचं मुलाकतीसाठी पत्र येतील की नाही. माझ्याकडूनही तुला शुभेच्छा! मला देखील या साईट्सचा खूप खूप छान अनुभव आहे.