<strong>वसंत आबाजी डहाकेंना साहित्य अकादमी पुरस्कार</strong>

Submitted by pkarandikar50 on 14 February, 2010 - 03:52

वसंत आबाजी डहाकेंना साहित्य अकादमी पुरस्कार

चांगल्या बातम्या इतक्या दुर्मिळ झाल्या आहेत की एखादी चांगली बातमी वाचायला मिळाली की टुण्ण उडी माराविशी वाटते. अशीच एक बातमी : वसंत आबाजी डहाके यांच्या 'चित्रलिपी' काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे! त्यांचे इतर काव्य-संग्रहः योगभ्रष्ट [१९७२], शुभवर्तमान [१९८७] शुनःशेप [१९९६].
या पुरस्काराकरता वसंत आबाजींपेक्षाही साहित्य अकादमीचंच अभिनंदन करायला हवं.

एका योगायोगाची प्रचंड गंमत वाटतेय. ही बातमी आली त्याच दिवशी मी 'माझी संस्कृती कोणती? भाग -२ हा लेख मा.बो. वर पोस्ट केला. त्यात मी "वसंत आबाजींच्या कविता जरूर वाचा, कमीतकमी चित्रलिपी तरी नक्कीच वाचा" अशी जोरदार शिफारस केली आहे आणि 'चित्रलिपी'तल्याच काही कवितांचे अंश उधृत करून शेवटी म्हटलं आहे - वसंत आबाजींच्या काव्य-संग्रहाला शासनाचा पुरस्कार मिळतो. [हा विनोद असतो का?] उद्या पद्मश्रीसुद्धा मिळेल; कुणी सांगावं? कारण, हे असंच चालत आलेलं असतं.
पद्मश्री नव्हे पण तितक्याच तोलामोलाचा पुरस्कार नेमका त्याच दिवशी जाहीर व्हावा हा काय विलक्षण योगायोग आहे!
-बापू करंदीकर

गुलमोहर: