महाराष्ट्र राज्याचे नवे सांस्कृतिक धोरण

Submitted by pkarandikar50 on 7 February, 2010 - 09:52


महारश्ट्र सरकारने नव्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा प्रसिद्ध केला असून त्यावर सूचना / प्रतिक्रिया मागवल्या आहेत. शेवटची मुदत २८ फेब्रुवरी २०१० आहे.
मसुदा पहाण्यासाठी mahanews या वेबसाईटवर जावे. http://mahanews.gov.in
तीन भागात मसुदा दिला आहे. १, २ आणि ३ फेब्रुवरी अशा तीन हप्त्यात तो वाचायला मिळेल.
मा. बो. करांनी आपल्या सूचना/प्रतिक्रिया नोंदविणे आवश्यक वाटते.
-बापू करंदीकर

गुलमोहर: 

बापू,
मसुदा बघतो, पण त्यापूर्वी एका गोष्टीबद्दल तुमचे अभिनंदन करू देत. 'अंतर्नाद'च्या चालू अंकात तुमचे पत्र आणि सरकारी नोकरशाहीच्या मानसिकतेवर जो लेख आला आहे तो वाचला. अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. बापू तुम्ही तर्कसंगत लिहिता आणि मला आवडते तुमचे लेखन. शुभेच्छा Happy

बापू हे बाकी छान केलेत हं. माय बोलीकराना रस वातेल असाच विषय आहे हा. शिवाय उठताबसता मराठी स,न्स्कृतीच्या नावाने गळा काढणार्या तोंडपाटलाना म्हणावे आता पाजळा तुमची विद्वत्ता.

मला फक्त एकाच गोष्टीत रस (म्हणजे, interest) आहे.
यंदा अमेरिकेतील ठिकठिकाणच्या महाराष्ट्र मंडळांना व त्यांच्या सभासदांना डॉलर्स मधे किती देणगी (donation) देणार?

आम्ही इथे मराठी नाट्यसंमेलन करतो आहोत, मराठी साहित्य संमेलन केलेच होते.

शिवाय आमच्यापैकी कित्येक मराठी आईबापांच्या मुलांना वाचायला मराठी पुस्तके विकत घेण्यासाठी एखादे अनुदान (grant) करावे.

या बाबतीत मागील मराठी साहित्य परिषदेत जसे पैसे देऊ केले होते, त्यापासून स्फूर्ति घेऊन, आता त्याहून जास्त पैसे द्यावेत. म्हणजे मराठी संस्कृतीचा झेंडा अगदी सातासमुद्रापलीकडे पोचवण्याचे श्रेय सरकारला मिळेल. महाराष्ट्रातील जनतेच्या कराचे पैसे (टॅक्स) याहून जास्त चांगले कुठे खर्च (म्हणजे spend)करता येणार, नाही का? त्यामुळे पुनः निवडून येण्याची खात्रीच. (याच साठी केला होता अट्टाहास).

Light 1 Light 1 Light 1

सर्वांना धन्यवाद. कृपया आपल्या बर्‍या-वाईट प्रतिक्रिया / सूचना शासनानाला कळवाव्या. त्याचा कितपत उपयोग होईल ते सांगणे अवघड आहे पण निदान आपण आपले कर्तव्य केले एव्हढे समाधन तरी लाभेल.
बापू करंदीकर