तुझ्या-माझ्या लग्नाची आज Anniversery आहे

Submitted by Suryakant Majalkar on 6 February, 2010 - 03:46

तुझ्या-माझ्या लग्नाला आज ....वर्ष झाली
अजुनहि कायम आहे गालावरची लाली
डोळ्यातली लाज अन अधरांची लाली

तु बिलकुल बदलला नाहिस,-जसा आहे तसा
तुझ्या बोलण्याला नाही क्षणाचा भरवसा
मला कळत नाही संसार केला कसा

प्रेम केल-लग्न झाल..! सांगतो पिळून मिशी
तुझ्या बोलण्यात माझी खुशी, ...पोर झाली कशी,
तुझ्या-माझ्या लग्नाच्या जुळल्या होत्या राशी

म्हणे मामा घर मोटे, जमिन-जुमला खुप काहि
सध्या खासगी नोकरी करतो, मुलगा आहे चांगला बाई,
दिवाळित प्रमोशन, वरकमाई चुकत नाही

आत्या मला बोलली होती, रुपान सुन्दर अन गुणवंती
चारचोघात विचारल-स्वभावान सालस म्हणती
मलाही खर वाटल, झाली पाहून्(एकुन) शांती

तुझ्या-माझ्या लग्नाची आज Anniversery आहे
सगळा दिवस निघुन जाईल 'चंद्र मधुस रात्र आहे
आज मात्र नको भांडुया, आयुष्य अजुन जगाचय

हो , पोरांचा संसार बघायचाय

--सुर्यकांत मा.

गुलमोहर: