आयुष्यांवर बोलू काही

Submitted by कुलकर्णी कुमार on 2 February, 2010 - 13:49

काय आयुष्य त्या चिंधीच, झाडाला लटकलेल्या,
ना जमिनीवर ना आभाळात, मधल्या मधेच अडकलेल्या

पण तिचही एक काम आहे,
स्वतःच अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न आहे

असच आहे धूलीकणांच, इकडून तिकडे उडते आलेल्या हवेसोबत,
ना ठाव ना ठिकाणा, नवीन बस्तान बसवते नवनवीन धूलीकणांसोबत

पण तरिही प्रत्येक धूलीकणासोबत तितकाच चांगला संसार करते,
भ्रमरासारखे जीवन असुन सुद्धा रामासारख वागते

पक्षांची मात्र मजा असते, फक्त इकडून तिकडे उडायच,
खायच, प्यायच आणि मस्त हवेत हिंडत राहायच

फुलांची तर नोकरी फारच भारी,
सकाळी उठा, संध्याकाळी झोपा ही मज्जाच काही न्यारी

प्राणी तर त्यांच्याच दुनियेत असतात,
दिवसभर चरतात, रवंथ करतात आणि झोपतात

अस सगळ्यांचच चालू असत, ठरल्याप्रमाणे
सगळेजण चाकोरीत जगतात, निसर्गाने ठरवल्याप्रमाणे

पण माणूस मात्र वेगळा आहे
त्याची जगायची रीतच वेगळी आहे

जन्म एकच पण अनेक जन्म जगायचा प्रयत्न,
ठरवून दिलेल काम एकच, पण सगळीकडे हात पाय मारायचा यत्न

लहानपणी उंदरासारखा, सगळीकडेच तोंड मारणार,
पौगंडात मांजरीसारखा, लपून दूध पीणार,
तरूणपणी गाढवासारखा, राब राब राबणार,
आणि म्हातारपाणी अजगरासारखा, नुसताच पडून राहणार

का? हा अनेक काम करावचा अट्टाहास का?
ठरवलेला चाकोरीबद्द जीवन पुरेस नाहि का?
नाही, अस नाही. माणसाला जिद्द आहे काहितरी करायची
दिलेल पुरेस नाही म्हणून नाही, तर मी वेगळा आहे सिद्ध कराच्यची.

प्रसाद भगवंतराव कुलकर्णी
औरंगाबाद.

Disclaimer: ही कविता माझीच असून नावामधे जरासे साधर्म्य असले तरीहि अनुस्वाराचा विचार करावा. संदिप खरे यांची कविता "आयुष्यावर बोलू काही" अशी असून माझी "आयुष्यांवर बोलू काही" अशी आहे. तरी वाचकाने याची नोंद घ्यावी. धन्यवाद.

गुलमोहर: 

लहानपणी उंदरासारखा, सगळीकडेच तोंड मारणार,
पौगंडात मांजरीसारखा, लपून दूध पीणार,
तरूणपणी गाढवासारखा, राब राब राबणार,
आणि म्हातारपाणी अजगरासारखा, नुसताच पडून राहणार>>>>>>>> अगदी भारी

Disclaimer टाकला हे बरच झालं, मी शीर्षक वाचुनच (कविता वाचन्याआधीच) तुम्हाला ते बदला असं सुचविनार होते Happy
आणि Disclaimer मुळे शीर्षकाचा अर्थही नीट समजला.. एरव्ही तिकडे माझे तरी जास्त लक्ष गेले नसते...

बाकी कविता सुरेखच

Happy Disclaimer टाकणं मला आवश्यक वाटलं कारण माझ्या काही मित्रांनी सुद्धा त्या अनुस्वाराकडे लक्ष दिलेलं नव्हतं. बाकिच्यांची पण तशीच गल्लत होउ नये म्हणून मी त्याचा अंतर्भाव केला.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

खरे तर ही आणि चातकीय मतदान या दोन्ही कविता आज दीड वर्षांपूर्वीच्या आहेत. किंबहुना या कवितेमुळेच माझ्या मनाला चालना मिळाली. Happy