भारतीय कलेतून 'चॅरीटी बझार'

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

भुकंपग्रस्त लोकांकरीता निधी उभारण्यासाठी माझ्या कार्यालयात 'चॅरीटी बझार' हा उपक्रम अलिकडेच राबविण्यात आला. आम्ही काही भारतीयांनी फार कष्ट आणि पैसे खर्च न करता जास्तीत जास्त निधी कसा उभारता येईल म्हणून भारतीय कलेचे प्रदर्शन भरविले. यातून ३००० सिंगापूर डॉलर अर्थात जवळ जवळ ९० हजार भारतीय रुपये मिळालेत. प्रत्येक १ $ मागे कंपनीकडून आणखी १ $ असे ऐकून ६०००$ निधीसाठी प्राप्त झालेत. हे सर्व कसे केले याचे हे सचित्रमय वर्णन.

CharityBazaar2010ST18_0.jpg
वरच्या चित्रात आहे कँटीनमधील ती जागा जिथे जेवणाचे वापरलेले ट्रे ठेवतात. इथली टाईल्स काळ्या रंगाची आहे हे पाहता आम्ही इथे ३ रांगोळ्या काढल्यात. त्यापैकी एक फुलांची रांगोळी होती.

इतक्या छोट्या आणि चिंचोळ्या जागेत फक्त ३ रांगोळ्या काढता आल्यात. खरे तर यापेक्षा अधिक रांगोळ्या काढण्यासाठी वेळ नव्हता. आदल्या दिवशी रात्री ६ ते ११ च्या वेळेस आम्ही दोन रांगोळ्या काढून घेतल्यात. फक्त फुलांची रांगोळी दुसर्‍या दिवशी ताजी फुले वापरुन काढली. त्यासाठी ऑफीसमधे अगदी रामप्रहरी सर्वांनी हजेरी लावली.

CharityBazaar2010ST01.jpg

भुईचाफा, झेंडू, कमळ, गुलबक्षी, मोगरा अशा रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या-पाकळ्या सुट्या करताना अभिरामी, पुनिथा, वनिथा, रिझवाना आणि इतर आम्ही:

CharityBazaar2010ST12.jpgCharityBazaar2010ST16.jpg

रांगोळी काढतानाची आणखी काही चित्रे. ओला लाकडी भुसा अंथरुन मग त्यावर फुले रचून फुलांची रांगोळी काढण्याची खरीखुरी पद्धत मला पहिल्यांदाच दाक्षिणात्य भारतीयांकडून कळली.

CharityBazaar2010ST25.jpgCharityBazaar2010ST27.jpg

रांगोळी काढून दमल्यानंतर वनिथा आणि पुनिथा यांच्या चेहर्‍यावर प्रसन्न भाव उमटले होते:

CharityBazaar2010ST61.jpgCharityBazaar2010ST62.jpg

एकमेका सहाय्य करुन अवघे धरु सुपंथ अर्थात टीम-वर्क यातून साकारलेल्या ३ रांगोळ्या:

CharityBazaar2010ST04.jpgCharityBazaar2010ST33.jpgCharityBazaar2010ST35.jpg

ह्या ३ रांगोळ्या बघण्यासाठी २$ चे कुपन ठेवण्यात आले. या २$ मधे रांगोळीबद्दल माहिती, रांगोळी कशी काढतात त्याचे प्रात्यीक्ष. फोटो हवा असल्यास रांगोळीसोबत फोटो इतके काही समाविष्ट होते. अभारतियांना हे प्रदर्शन फार आवडले. बघा तर...

CharityBazaar2010ST38.jpgCharityBazaar2010ST57.jpgCharityBazaar2010ST20.jpgCharityBazaar2010ST56.jpg

भिंतीवर रांगोळीबद्दल ठळक अक्षरात माहिती लिहिली होती.
CharityBazaar2010ST43.jpg

रांगोळीबद्दल काढून दाखविताना पुनिथा आणि चायनीज मुलगा:
CharityBazaar2010ST55.jpg

टेबलावर रांगोळीच्या काही डिझाईन्स देखील ठेवल्या होत्या आणि काही छापे:

CharityBazaar2010ST44.jpg

आता काही मेंदीची चित्रे. याला देखील खूप प्रतिसाद मिळाला. सुरवातीला मेंदीचा कोन कुणालाच वापरता येत नव्हता. मेंदीच्या डिझाईन्स देखील फारशा माहिती नव्हत्या. मग जेवणाच्या वेळेतून अर्धा तास वापरुन आपल्याच हातावर आठवडाभर सराव केला तेंव्हा आपण इतरांच्या हातावर मेंदी गिरवू शकू असा विश्वास प्रत्येकाला आला.

अभिरामी मेंदी काढण्यात दंगः
CharityBazaar2010ST22.jpg

शेवटी शेवटी मेंदी काढण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत चालले होते इतकी गर्दी झाली होती:
CharityBazaar2010ST23.jpgCharityBazaar2010ST50.jpg

प्रदर्शन पहायला आलेली मोना... आम्ही तिलाही आमच्यात मेंदी काढण्यासाठी सामावून घेतले. तिनेही आनंदाने आमचे निमंत्रन स्विकारले:
CharityBazaar2010ST69.jpg

मेंदी आवडल्याची पावती:
CharityBazaar2010ST70.jpg

टेबलावर अंथरलेली चादर देखील भारतीय कलेचा नमुनाच होती. खूप जणांना ती चादरचं विकत हवी होती Happy

CharityBazaar2010ST53.jpg

मेंदीसाठी आम्ही फक्त २$ आकारले होते. चेन्नपटनाहून येताना एकाला खेळणी आणायला सांगितली होती. ती खेळणी तासाभरात विकल्या गेली. ही पहा ती खेळणी:

CharityBazaar2010ST15.jpg

आमच्या दुकानाचे नाव आम्ही 'कलर्स ऑफ ईडिया' असे ठेवले होते:

CharityBazaar2010ST19.jpgCharityBazaar2010ST45.jpg

सर्वांनी भारतीय पोषाख परिधान केला होता. वनिथानी माळलेला गजरा आणि त्याचा परिमळ जिथे तिथे रेंगाळत होता. थ्री-ईन-वन अगरबत्तीचा सुगंध, पहाटेचे झुजुमुंजू वातावरण, फुले आणि नवीन कपडे जणू सण वा लग्नकार्य आहे की काय असेच वाटतं होते.

CharityBazaar2010ST74.jpg

एका अभारतीय दुकानात झाडांची विक्री होती. मला ही कल्पना आवडली पण जरा महागडी वाटली. तर एका दुकानात जुने अंक होते जसे की रिडर्स डायजेस्ट, जिऑग्राफी वगैरे. तीही कल्पना छान होती आणि सर्व पुस्तके पटापट विकली गेली:
CharityBazaar2010ST37.jpg

युरपातील लोकांनी मिनि-गोल्फ ठेवला.
CharityBazaar2010ST73.jpg

काचेतून दिसणारे बझाराचे चित्र असे होते:
CharityBazaar2010ST75.jpg

तर मंडळी तुम्ही पाहिलंत ना स्त्रियांचा पाठिंबा असेल तर पुरुष-प्राणी काहीही करु शकतो. मायबोलीवर सयुंक्ता सुरु झाल्यानंतर मला बझाराबद्दल इथे लिहायची ईच्छा झाली. इथे मायबोलीवर कितीतरी जणांना कला अवगत आहे. आपल्या देशात कदाचित तिचे मोल कमी असेल कारण जिथे पिकते तिथे विकल्या जात नाही म्हणतात. सुदैवाने बरेच मायबोलीकर देशाबाहेर राहतात. जर त्यांनी मिळूनमिसळून आपली कला जर अभारतीयांपर्यत पोचवली तर त्यातून खूपशी मिळकत चांगल्या कामासाठी उपलब्ध करता येऊ शकते. वर मी चित्रातून हेच दर्शविण्याचा प्रयास केला आहे की अगदी साध्याशाचं रांगोळ्या, साधीशीचं मेंदी, जेमतेम खेळणी यातून आमच्या सारख्या सामान्यांना जर ३००० $ मिळवता आले तर इथे तर इथे केवढे तरी कलाकार आहेत, त्यांच्यातली कलाकुसर आणि नीटनेटकेपणा असे उपक्रम राबविण्यासाठी मदतील येऊ शकतात. तेंव्हा आपल्या कलेचा आणि ज्ञानाचा अवश्य विचार करा. एकमेकांना सहाय्य मिळेलचं...

विषय: 
प्रकार: 

बी अप्रतिम उपक्रम रे..
तुझ्या टीममधल्या सगळ्याना माझ्याकडुन खुप खुप थॅन्क्स.
तु तिकडे जे भारतीय संस्क्रुती दाखवतोयस ना ते काम खुप मोलाच आहे रे. Happy
रांगोळी आणि मेंदी सुरेखच आहेत.
चष्मेवाला तु काय रे??

सर्वांचे धन्यवाद! अपेक्षा आहे तुम्हाला यातून प्रेरणा आणि आनंद दोन्ही मिळाला असेल. अजून नवीन काही करता आलं असतं का यातं असा एक प्रश्न सुरवातीला विचाराचा होता ते विसरून गेलो. झकासराव, नाही मी तो नाही. माझा इथे फोटो नाही कारण मी फोटो काढण्यात गुंग होतो आणि बाकी इतर कामात कामात. भुसा का वापरतात फुलांच्या रांगोळीमधे मलाही नीट माहिती नाही. रांगोळीबद्दलची माहिती नेट वरुन घेतली होती.

Pages