अपुर्ण

Submitted by प्रिती on 25 January, 2010 - 03:45

रैना...तुझ्या पाचोळीवरुन सुचलेलि कविता...

मी अपुर्ण का पुर्ण
हे का कोणी पाहते
मी स्वतःच स्वयंमपुर्ण
हे कोणाहि न दिसते

आकार मी व्यापते
मज हवा तेवढा
रिकाम्या मनी हि
मी विचार बनुनी ऊरते

मीच आहे गर्द अंधार
मीच आहे आशेचे किरण
मीच माझि सखि असता
मी आधार का शोधते????

विचार कुणाचा करण्यासाठी
मी माझा विचार त्यागिते
स्वयंपुर्ण होऊनि हि मी
अपुर्ण त्यांसाठी राहते...
अपुर्ण मी मजसाठी राहते...

प्रिति Happy

गुलमोहर: