उत्क्रांतीवाद ( एका नव-याच्या जीवनचक्रातील टप्पे )

Submitted by Kiran.. on 21 January, 2010 - 05:46

अय्या तुम्ही ..?

इश्श !

असं काय करता ?

ऐका ना ..

अहो...

अहो, ऐकलंत का ?

मी काय म्हणते ..

लक्ष कुठय तुमचं ?

आधी माझं ऐका...

ते काही नाही....

जरा घरात पाय टिकेल तर शप्पथ

मुलं मोठी झालीत..त्यांच्या कलाने घ्यायला शिका

तुमच्या आयडिया राहू देत... विशाल काय म्हणतोय..

मी म्हणून संसार केला तुमच्याशी..

सारखीच काय हो किरकिर...सदानकदा ?

किचनमध्ये जाउन चहा करून घ्या...

सांगितलं होतं ना.. सूनबाई दमली असेल..गप्प झोपा आता..!

Kiran

गुलमोहर: 

काय प्पण! Biggrin

बायकोच्या दृष्टीतून नवर्‍याची उत्क्रांती Wink :

प्रिये, सखे, मला तुझ्यावाचून अजिबात करमत नाही. रात्रीची झोप, दिवसाचा चैन (कोणी रात की नींद दिन का चैन चे योग्य भाषांतर करून देईल काय?!) सग्ळं सग्ळं तुझ्याविना व्यर्थ गं!

हे बघ, सिनेमाची दोन तिकिटं आणली आहेत, लवकर लवकर तयार हो, डिनर बाहेरच करू!

आज हापिसात जास्त वेळ थांबावं लागणार गं, पण तू माझी वाट बघशील ना?

अगं, तो नवा खडूस म्यानेजर आलाय, आजपण उशीर होणार.... तू नको बघूस वाट!

त्या क्लाएंटला, ***** ला आजचीच संध्याकाळ मिळाली डील विषयी डिस्कशन करायला.... आता त्याला एंटरटेन करायला लागणार.... तू नको थांबूस माझ्यासाठी....

आज आमच्या त्या ह्याच्याकडं पार्टी आहे, उशीर होईल....

ए सॉरी हं, काल जरा जास्त झाली होती..... फार बरळलो का मी?

ए काय तुमची बायकांची कटकट असते.... इथं हापिसात मर मर मरायचं आणि वर तुमची उशीरच का झाला, अमुकच का विसरला म्हणून बोलणी खायची....

काय, आज बाहेर जायचं म्हणतेस जेवायला? आजच काही नडलंय का... मी दमलोय गं फार!

ए, त्या कार्यक्रमाला यायला मला काही जमणार नाही हां, तूच सांग काय सांगायचं ते तुझ्या नातेवाईकांना....

ते मुलांचे अभ्यास वगैरे तूच काय ते बघ, मला रोज किती उशीर होतो बघतेस ना!

हे क्काय, गणूला एवढे कमी मार्क्स! थांब आता मीच त्याचा अभ्यास घेतो....

तुझा लेक माझे काहीही ऐकत नाही.... उलट वर तोंड करून सांगतो की बाबा, तुला माझा अभ्यासच घेता येत नाही म्हणून!

तूच ह्या पोरांचे फाजील लाड करून डोक्यावर घेतलं आहेस त्यांना, मी अस्तो तर कधीच चार कानाखाली लगावल्या असत्या!!

तुमच्या त्या बायकांच्या सीरियल्स कसल्या बघतेस?!! आज मी मस्त क्रिकेट बघणार आहे दिवसभर!

अ‍ॅ, तुम्ही थांबला नाहीत जेवायला माझ्यासाठी?

काल तुझ्या चहाला नावे ठेवली म्हणून काय आज लगेच मलाच माझा चहा करून घे म्हणून सांगायचं?

बरंय, तुझे नातेवाईक तुलाच बोलावतात.... मला म्हणतात, जावईबापू, जमलं - वेळ झाला तर या.... ह्यॅ, हे काय निमंत्रण झालं?

आणि.... अजून असेच.... बरेच..... Proud Biggrin

बायकोची उत्क्रांती दोन टप्प्यातच होते, तीही उलट्या दिशेने..

लहान मुली अगदी फुलपाखरासारख्या असतात ..:)

पण लग्नानंतर त्यापासून बाई नावाचे सुरवंट तयार होतात.. Sad

सगळ्या बाया जन्मभर फुलपाखरासारख्या छान राहोत, हीच तुळशीदासांच्या चरणी प्रार्थना ! Happy

(फोटो काढून टाकला आहे..)

सगळ्या बाया जन्मभर फुलपाखरासारख्या छान राहोत, हीच तुळशीदासांच्या चरणी प्रार्थना ! Proud

वर काढतोय ब-याच दिवसांनी... Proud

झंडु, लै भारी !!!! Proud Proud Proud

अकु... मस्तच ग.

जमोप्या... फोटो नक्की कसला होता? फुलपाखराचा, सुरवंटाचा की तुळशीदासांचा??? Happy

किरण भाऊ उर्फ झेंडुभौ
बर्‍याचदा वाचतोय हे.
अधून मधून वाचायची इच्छा होतेच. खूप आवडतेय बरका. Happy

अरुंधतीजी Rofl

जामोप्याजी Rofl

पण लग्नानंतर त्यापासून बाई नावाचे सुरवंट तयार होतात>>>>>

आणि ते नवरा नावाच्या प्राण्याला ''सर्व्हंट'' बनवतात... Biggrin

Pages