अलवार तुझी चाहुल...

Submitted by gobu on 1 March, 2008 - 15:41

आशा भोसले यांनी हिन्दीत जी गाणी म्हटली आहेत त्यांचे नेहमी कौतुक केले जाते...
पण त्यांची मराठी गाणी मात्र त्यामानाने जरा उपेक्षितच आहेत.
माझ्या उमेदीच्या काळात म्हणजे साधारणतः एक ९-१० वर्षापुर्वी एक मराठी सिनेमा पाहीला होता....
सरकारनामा...
या चित्रपटातले एक गाणे इथे देतोय...
प्रियकराची वाट पहाणारी प्रेयसी ही त्याच्या वाटेकडे डोळे लावुन आहे आणि हे गीत म्हणजे तिच्या मनातल्या भावनांचे प्रतिबिंब....
गाण्याचे शब्द असे आहेत...
अलवार तुझी चाहुल... का धडधडते हे ऊर....
अलवार तुझी चाहुल... का धडधडते हे ऊर....
मनास का उमगेना... तु समीप की रे दुर....
अलवार तुझी चाहुल... का धडधडते हे ऊर....
घनवादळ वार्‍यातुन... मी जपले सारे सुर...
कोंदणात आनंदाच्या लपविले असे काहुर.... लपविले असे काहुर...
अलवार तुझी चाहुल... का धडधडते हे ऊर...
मनास का ऊमगेना... तु समीप की रे दुर...
या गाण्यात आशाजीनी चढवलेला सुर थांबत थांबत येतो...
हळुवार...
तरंगत यावा तसा...
अगदी आपल्या मनापर्यंत पोहोचे पर्यंत!
आज बर्‍याच वर्षांनी हे गाणे ऐकले आणि पुन्हा हळवा झालो...
प्रियकराची काळजी...ओढ...प्रेम...आकर्षण...लज्जा... अगदी अगदी शब्दात जशीच्या तशी पकडलीय... आणि वर आशाजींच्या सुरांनी अतिशय सुंदर साज चढवलाय...
शब्दांनी आणखी किती नाजुक व्हावं...
आणि सुर देखील किती थेट काळजाला भिडावेत...
नायिकेच्या मनातली चलबिचल आपल्याला कासावीस करते...
लाजवाब!
हे गाणे ऐकणे हा अवर्णनीय अनुभव आहे...
ऐका तर खर...
http://www.dhingana.com/album/marathi/album/sarkarnama/2706
Happy

गुलमोहर: 

गोबु,

गाणे खरच अतिशय सुन्दर आहे. पण मला वाटत हे गाणे कवीता कृष्ण्मुर्तीने गायले आहे.
कदाचित ओरिजनल गाणे आशाजीनी गायले असेल.

जी लिंक दिली आहे ते गाणे कवीता कृष्णमुर्तीने गायले आहे. कदाचित मुळ गाणे आशा भोसले यांनी गायले असेल.

प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद....
Happy
माझ्या माहीतीप्रमाणे ते गाणे आशाजींनी गायले आहे.