मुक्तनिशी २ - डॉ. किरण बेदी

Submitted by नितीनचंद्र on 17 January, 2010 - 10:00

२००९ वर्ष सरल. २०१० चा जानेवारी महिना आज संपतो आहे तरी पण १० जानेवारी २००९ हि दिवस अजुनही जसाच्या तस्सा डोळ्यासमोर आहे. माझ्या व्यावसायिक जीवनात अनेक व्यक्ति जवळुन पहाण्याचा योग येतो. संदीप खरेंच्या कवितेच्या ओळी " आताश्या मी....रकाने भरतो " या प्रमाणे आयुष्यभर आळसावलेले जीव तर दुसर्‍या बाजुला तडफदार आणि नेत्रदिपक पावले टाकुन जगाला मंत्रमुग्ध कराणारी माणसे एकाच मातीत जन्माला येतात.

आश्चर्य ध्येयवादी माणसांच नाही वाटत कारण त्यांच्याजवळ जगण्याचे कारण भरपुर प्रमाणात असते. आश्चर्य त्यांचे वाटते, जे ध्येयाशिवाय जगतात. मास्लो या जगप्रसिध्द मानसशास्त्रज्ञाचा सिध्दांत ही माणसे धादांत खोटा ठरवतात.

आजच चिंतन ध्येयाशिवाय जगणार्‍या माणसांच नसुन ध्येयवादी माणसांच आहे. तडफदार पावले टाकुन, निर्भयपणे आव्हाने पेलण्यार्‍या आणि आपल्या कामगिरीने जगाला नवी दिशा दाखवण्यार्‍या या व्यक्तिंना नुसते पाहिले तरी उत्साह निर्माण होतो. १० जानेवारी २००९ हि दिवस जसाच्या तस्सा आठवण्याचे कारण एच. आर. मॅनेजर्सच्या मेळव्यातली डॉ. किरण बेदी यांची उपस्थिती.

My motto in life is that nothing is impossible, no target unachievable - one just has to try harder and harder." यासारखे अनेक संदेश http://www.kiranbedi.com/thoght.htm या वेबपेज वर पहायला मिळतात. "इट ऑलवेज पॉसिबल" या तिहार जेल मधिल सुधारणा यावर मॅड्मनी लिहीलेल्या पुस्तकाचा अनुवाद मी आधिच वाचला होता. या कार्येक्रमात त्यांना पहाण्याचा व एकण्याचा योग आला. मॅडमची तिहार जेल मधली महासंचालक पदावरची नेमणुक बहुदा त्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न होता. ५.१/४ उंचीच्या परंतु दुर्दम्य इच्छाशक्तीने भारलेल्या या व्यक्तीने या सर्वाचे प्रयत्न हाणुन पाडुन मेगासेसे हा सन्मान या काळातल्या कामगिरीसाठी मिळवला.

३ ह्जार क्षमता असलेल्या तिहार जेल मध्ये ६ हजार पेक्षा जास्त प्रिझनर्स या काळात येथे होते. जेमतेम जेवायला घालता येईल इतकेच बजेट उपलब्ध असताना, नुसते जेवणच नाही तर डॉक्टरी उपचार, शिक्षण, व्यसनमुक्ती व आत्मपरीक्षण करायला लावणारी विपश्यनासारखी साधना यासारखे अनेक उपक्रम मॅड्मनी राबवले नव्हे तर यशस्वी करुन दाखवले.

जगात ध्येयाशिवाय जगणारी अनेक माणसे असतात. ध्येयाचा विचार खुप मोठा पण साधने नाही म्हणुन निराश होणारी सुध्दा माणसे दिसतात. पण प्रतिकुल परिस्थीतीत साधने निर्माण करण्याची क्षमता असलेली माणसे फारच थोडी असतात. उरलेले त्या मार्गावर चालु सुध्दा शकत नाहीत याचे कारण कळत नाही.

विचार करायला लावण्यासारखी परिस्थीती आहे. अण्णा हजारेंचा वस्तुपाठ गिरवुन कुणी दुसरे राळेगण उभे केले नाही. तिहार जेल सारखा उपक्रम अन्य जेल मध्ये झाल्याचे वाचले नाही. टी. एन. शेषन सारखा दुसरा अधिकारी निर्माण होताना दिसत नाही. मग आपण करतो काय ? आम्हाला जर कॉपीसुध्दा करता येत नसेल तर " आताश्या मी....रकाने भरतो " या पेक्षा आम्ही वेगळे काय करतो?

गुलमोहर: 

आम्हाला जर कॉपीसुध्दा करता येत नसेल तर " आताश्या मी....रकाने भरतो " या पेक्षा आम्ही वेगळे काय करतो?>>>>>>>> अगदी खरं... वाईट गोष्टींची कॉपी लगेच होते पण चांगल्या गोष्टींची होत नाही.... Sad

हे मुक्तनिशी नावही मस्त आहे.
किरण बेदींचं लेखन वाचायचं ठरवूनही माझ्याकडून वाचलंसुद्धा जात नाही. त्यांच्या कामासारखं काम उभं करण्याचा तर विचारही मनाला शिवत नाही. जेमतेम जेवणाच्या बजेटमध्ये एवढ्या सार्‍या उपक्रमाचं शिवधनुष्य कसं पेललं असेल? आपल्याला तर जरा महागाई वाढली तर आपापल्या घराचं कोसळलेलं बजेटही सावरता येत नाही.
पण तरीही 'काहीतरी' करावं अशी ऊर्मी अनेकदा येऊन जाते हेही खरंय.