आल्याची चटणी/लोणचं

Submitted by मनःस्विनी on 8 January, 2010 - 14:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ आल्याची रूट्स मध्यम आकाराचे साल काढून धूवून बारीक चिरलेले,
लहान मध्यम बोराएवढी चिंचेचा(बियांशिवाय) गोळा(हि हवीच),
भिजवून बाहेर काढून ठेवलेल्या २-३ लाल सुक्या मिरच्या,(चवीप्रमाणे घ्या, मी कमी तिखट पण रंगाने लाल अश्या मेक्सिकन मिरच्या आणते. नाव विसरले)
लहान मध्यम बोराएवढा गूळ किसलेला/खडा,
२ चमचे उडीद डाळ,
२ चमचे तेल/शुद्ध तूप,
भरपूर कडीपत्ता,
फोडणीसः पाव चमचा मोहरी(हि हवीच जरा बर्‍यापैकी), हिंग.
मिठ

विशेष टिपः मी माझ्या तेलगु मैत्रीणीशी बोलले ती म्हणाली की तिने मला जे खायला दिले ते "हेच"आल्याचे लोणचे होते जे मी चटणी समजले.
तर वरील साहित्यात लसूणाच्या ८-९ पाकळ्या, मेथी दाणे, जिरे थोडेसे व धणे दाणे फोडनीत सरतेशेवटी घालून वाटायचे. ती मैत्रीण ह्याच्यात वाटीभर तेल ओततात वाटत असतानाच पाणी घालत नाही म्हणून हे टिकते लांबच्या प्रवासाला ते हे लोणचे घेवून जातात.

क्रमवार पाककृती: 

१) टोपात तेल्/तूप टाकायचे. गॅस मंद ठेवायचा. मला तूप आवडते कारण मस्त वास येतो ह्या चटणीला. हिंग टाकायचे. मग मोहरी. मग मिरच्या.
२) आता कच्ची उडीद डाळ टाकायची व बदामी रंग येइल अशी भाजायची. मस्त वास सुटतो.
३) कडीपत्ता टाकायचा.
४) हे सर्व थंड झाले की मिक्सीत आले, चिंच व हे मिश्रण टाकून आधी बारीक झाले की मग गूळ टाकून एकदा मिक्सी फिरवायचा.
मस्त चटणी तयार. सुंदर लागते.
मला ही चटणी खूप आवडते. एक तर ह्याच्यात कडीपत्ता आहे जो शरीराला चांगला. आले-गूळ पाचक, चिंच सुद्धा शरीराला चांगली मग उडीद डाळीत प्रथिने आहेत ती सुद्धा चांगली. मला जरा बरे वगैरे नसेल तर,चव नसेल जिभेला तर मस्त दलियाची गोडा मसाला घालून मिक्स भाज्या खिचडी,जिरा पापड व हि चटणी.

अधिक टिपा: 

१.चटणीत अजिबात पाणी नाही घालायचे म्हणूनच गूळ आधी घालू नये कारण मिक्सी चिकट होइल व पातं नाही फिरणार.
२. चिंच ,गूळ चवीप्रमाणे अ‍ॅडजस्ट करा.

माहितीचा स्रोत: 
तेलगु मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिंच ओलसर असते, मिरच्या ओलसर असतात भिजवलेल्या. हळू हळू फिरवायचे. मग एकदा ढवळायचे.
पटकन खायची असेल तर टाक पाणी.

नानबा, वरते लिहिल्या प्रमाणे हे लोणचे आहे तेलगु पद्ध्तीने. त्याच्यात अर्धा वाटीभर तेल गरम करून व अर्धा वाटीभर उरलेले फोडनीचे तेल घालून वाटतात. पाणी घालत नाहीत.

मी वरती कमी प्रमाणात केले ते दुप्पत कर व तूपाएवजी तेल दोन वाट्या घे. Happy
मला एवढे तेल चालत नाही म्हणून मी दोन चमचे तूप घालते व दोन दिवसात संपवते फ्रीजमध्ये ठेवून.

मनु,
मी हिरव्या मिरच्या कच्च्याच घालते. आणि या चटणीत गुळ घालत नाही. मी पाण्यातच वाटते. उडदाची डाळ घालत नाही, चण्याची घालते. तेलुगु लोक चटणी तेलात वाटत नाही. तुझी मैत्रिण अपवाद असावी.

नानबा, चिंच, मिरच्या, मीठ, लसूण, आलं पाणी घालून वाटून घ्यावं. तेलात हिंग, मोहरी, चणाडाळ, कडीपत्ता घालून फोडणी करावी. फोडणी खमंग व्हायला हवी. तुपाच्या फोडणीने मजा नाही येत.
पण वर मनुने सांगितल्याप्रमाणे ही चटणी फार टिकत नाही. लोणच्यांच्या चिनी मातीच्या बरणीत एक-दोन आठवडे राहते.
मनु, सायलीमीच वाचून लिहायलाच आले होते, पण तू आधीच लिहिल्यामुळे फक्त मी करत असलेले बदल देत आहे.
हो मेथीपूड घालावी, मी आधी लिहायला विसरले!

अग मी तेलगु लोक तेलात वाटतात असे न्हवते म्हणायचे पण ती मैत्रीणच म्हणाली हम लोग इसमे .. असे तर मला ती मैत्रीण करते तसे लिहिले वरते आता. सॉरी. Happy खरे सांगू, तुलाच विपू करणार होते कि नक्की ही रेसीपे एकाय आहे पण तुझे नाव शोधून मिळाले नाही. Happy

अय्या मने, त्यात काय गं सॉरी लगेच Happy
मला खरं सांगायला बर्‍याच गोष्टी, तुझ्याइतक्यापण माहीत नाहीत. आता साबांकडून एक एक शिकणं चाललयं. त्यात तू व्यवस्थित डीटेल्स लिहीतेस. त्यामुळे मलापण रेसीपी करून पहायचा उत्साह येतो Happy

मला हे लोणचं खूप आवडते. आताच मी विचारच करत होते की हे डाळी,कडीपत्ता,मेथी घालून किती चांगले जेवणात आपल्याला न्युट्रीशन मिळतात. साधा चटणी सारखा पदार्थ पण त्यात ते चिंच आलं,गूळ किती फायदेशीर आहे. Happy

मनु, तू जी आल्लम पचडी म्हणत्ये, ती वेगळी, त्यात लसूण घालत नाहीत. चिंच-गुळ असतो नी डाळीची फोडणी. वरच्या पच्चडीला चिंतकाय पचडी म्हणतात. त्यात हिरवी चिंच/कोवळी चिंच घालतात.

मी ही तेलगुच आहे. खरचं छान लागते ही चटणी. आल्यामुळे तिखट होते तर मिरची कमीच लागते.
लाल मिरचीने रंग चांगला येतो. हो ना! मनःस्विनी
होय चिन्नू आम्ही चटणी तेलात कधीच वाटत नसतो. पण हे लोणचं आहे.
या लोणच्याचं नाव आहे, आल्लम तोक्कू.

अवंतिका आधी 'तेलुगु' असं लिही पाहू १०० वेळा Proud मनुला सांगून सांगून थकल्ये मी!
बायांनो, आल्लम पचडी/तोक्कु(आल्याची चटणी/लोणचं) आणि चिंतकाय पचडी (चिंचेचं लोणचं) मध्ये गल्लत करू नका!

आता आल्याच्या चटणी/लोणच्यात चिंच आणि चिंचेच्या चटणी/लोणच्यात आले असे घटक पदार्थ असल्यावर आलम आणि चिंचम मध्ये गडबड होणारच... \P

मला वर मनुने दिलेली आहे ती आलम की चिंचम आणि मग चिन्नुने दिलेली ती चिंचम की आलम ते कोणीतरी एकदा सांगा....

आल्याला तेलगुत आल्लम् म्हणतात. चिंचेला चिंतपंडू म्हणतात.
आल्याच्या लोणच्यात चिंचेचं प्रमाण कमी असतं. हे लोणचं तिखट गोडसर होतं.
चिंचेच्या लोणच्यात आल्याचं प्रमाण कमी असतं. हे लोणचं आंबट होतं.

धन्यवाद अवंतिका Happy
साधनाताई, आल्याच्या चटणीत लसून नसतो, पण गुळ घालतात.
चिंचेच्या चटणीत मी लसूण घालते पण गुळ घालत नाही.

मनु, झटपट होणारी छान रेसिपी आहे.
मला फक्त एक शंका आहे, फोडणी मिक्सर मधुन काढलेल्या वाटणात गार झाल्यावर टाकयची ना ?

वर आल्याचा इतका कीस पाडलाय कि आता करुन पहायलाच हवी..
मनु.खरंच खुप मस्त रेसिपी /चटणी लिहीली आहेस..आले आहे बरेच.. त्यामुळे लगेच करण्यात येईल..बर्‍याच दिवसांनी मस्त रेसिपी लिहीली आहेस..

...>>>>>आता आल्याच्या चटणी/लोणच्यात चिंच आणि चिंचेच्या चटणी/लोणच्यात आले असे घटक पदार्थ असल्यावर आलम आणि चिंचम मध्ये गडबड होणारच... \P

मला वर मनुने दिलेली आहे ती आलम की चिंचम आणि मग चिन्नुने दिलेली ती चिंचम की आलम ते कोणीतरी एकदा सांगा....
हसुन हसुन <>>>>

पावसामुळे फळभाज्या, पालेभाज्या स्वस्त झाले असून आल्ले दर मात्र वाढला. आल्ले दर ८० ते १०० रुपयांवरुन प्रतिकिलो १५० रुपये झाला आहे. मेथी आणि कोथिंबीर पेंढीचा दर १० रुपये होता.