उत्सव ...!

Submitted by विशाल कुलकर्णी on 7 January, 2010 - 23:19

***********************************************

वर्षेचे उत्सव रिमझिमते
जलदांचे अवगुंठन चिंतन
समिर बावरा हलक्या करतो
आषाढी धारांच्या वेणा...

निळे सावळे घन थरथरते
दंव-बिंदूचे हळवे स्पंदन
अन विहंग स्वर सुखे वाहती
शुभ्र क्षणांचा सुरेल मेणा...

गीत अधरिचे हुळहुळणारे
थिजलेल्या मौनाचे मंथन
जीवन झरते होउन आतुर
झिणझिणते हृदयातिल वीणा...

मुग्ध इशारे प्रतिबिंबांचे
रुजून झाली हिरवी पाती
शब्दांच्या सीमा लंघुनिया
कोरतात ओठांवर लेणी...
*****************************************************

मायबोलीवरील काही जेष्ठ दिग्गजांच्या सुचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे संपादीत केली आहे.
श्री. मुकुंददादा आणि श्री. अज्ञात यांचे मन:पूर्वक धन्यवाद ! Happy

विशाल.

गुलमोहर: 

लंघुन सार्‍या सीमा शब्दांच्या
एकटा कोरतो मौनाच्या लेण्या...

मस्त !

ते मुग्ध इशारे प्रतिबिंबांचे
रुजलो अन होवून हिरवे पाते
लंघुन सार्‍या सीमा शब्दांच्या
एकटा कोरतो मौनाच्या लेण्या...>>>> खास....खास !

विशाला, पेटला आहेस एकदम ! Happy

मुग्ध इशारे प्रतिबिंबांचे
रुजून झाली हिरवी पाती
शब्दांच्या सीमा लंघुनिया
कोरतात ओठांवर लेणी...
,,,,,,,,,,,,,,,,,,,, व्वा! विशा तु?

गिरीशजी, माते धन्यवाद ! असे कौतुकाचे बोल कानी पडले की एरवी ऐकावी - वाचावी लागणारी कुजकूट बोलणी विसरायला होतात. Wink