सहारा....

Submitted by gobu on 26 February, 2008 - 08:09

सहारा....
आयुष्यात एकदा तरी भेट द्यावे असे ठिकाण.... सहारा!
ट्रीपच्या निमीत्ताने तिथे जाण्याचा योग आला....
सहाराचा फार मोठा भाग लिबियामध्ये आहे... उरलेला भाग सुदान, नायगर, चाड ई. देशात येतो... लिबिया या देशाचा दक्षिणेकडचा अर्धा भाग वाळवंट आहे.... विस्तीर्ण, निर्मनुश्य, आणि तेलाने प्रचंड समृध्द!!!!
एका मागोमाग एक असे न संपणारे वाळुचे डोंगर... थंडगार हवा... आणि सभोवताली प्रचंड शांतता....
निसर्गाच्या हा चमत्कार डोळ्यात साठवु लागलो....
मनात विचार आला...
कुठे पोहोचलो आपण...
कुठे चाललो होतो...
हा नक्की कशाचा मागोवा....
सुख... समृद्धी... वैभव... पैसा.... किर्ती.... समाधान.... की आणखी कशाचा?
"green pasture"च्या शोधात भरकटणार्‍या लाखो मनापैकी आपणही एक...
याला काय म्हणावे... पैशाचा मोह.... जगण्याची आस... न संपणारा संघर्ष... की निरंतर साधना...
....की शुद्ध वेडेपणा?
आणि हे सर्व नेणार तरी कुठे आहे आपल्याला...
बर्‍याच वर्षापुर्वीचे म्हणजे कळायला सुरुवात झाली होती तेव्हाचे २ खोल्याचे छोटे घर आठवले...
खरतर प्रवास तिथुनच सुरु झाला होता...
पिल्लाला सांगावेसे वाटले....
बापाने रिकाम्या हाताने सुरुवात केली होती.... आज इथपर्यन्त आला...
तु बापापेक्षा लाखपटीने नशिबवान आहेस....
तुझी झेप कुठपर्यंत जायला हवी !!!
1.jpg
निसर्गाची किमया...
वाळवंटात अथांग तळे...
याचे पाणी समुद्रापेक्षा ७ पटीने जास्त खारट आहे असे गाईड म्हणाला होता... 2.jpg
आणि हा हात वर करणारा... मी...
sd.jpg
Happy

गुलमोहर: 

गोबु, डेझर्ट सफारी (जीपने वाळुच्या डोंगरात फिरणे) केली कि नाही. फार मजा येते. घेईल घेईल तुमच पिल्लुही भरारी घेईल. छान आहेत प्रकाशचित्रे.

गोबु, वाळवंटाच्या अबोली वाळुत काय सौंदर्य असते ते सगळ्याना कळत नाही. या वाळवंटावरून आजवर डझनभरवेळा उडत गेलोय, पण कधी जाण्याचा योग आला नव्हता. आज निदान नयनसुख तरी मिळाले.
मला वाटते स्टार वॉर्स चा एक सेट तिथे लावला होता. ब्रुक शील्ड्स चा पण एक सहारा नावाचा सिनेमा होता. ट्युनीशिया बघितले कि नाही ?

गोबु वा!
फोटो छान आहेत.
आणि तुझ लिखाण तर वादच नाही.
फ्लो मस्त आहे.
मला वाटल होत की डिटेल मध्ये माहिती लिहिशील पण हे जे लिहिल आहेस ना ते देखिल माझ मन समाधान करणार आहे रे. Happy

आमच्या मुलुंड मंडळाची प्रवास वर्णन लिहा अशी आग्रहि मागणी पुर्ण केल्याबद्दल मुलुंड मंडळ आपल आभारी आहे. Happy

सुरेख फोटो गोबू आणि लिखाण तर अप्रतीम. :))

और लिखो मेरे दोस्त :))

गोबू खुप छान लिहिले आहेस आणि फोटो पण खुप छान काढले आहेस.

गोबू, तुझ्या निमित्ताने आम्हाला सहारा वाळवंटाची झलक बघायला मिळाली. आत्तापर्यंत पुस्तकात वाचून होते. वाळवंटात जाणं म्हणजे एक शिक्षा असेल असंच आत्तापर्यंत वाटत होतं. पण ही सफर एक आनंददायक अनुभव असतो हे तुझं ललित वाचून कळलं. फोटोही टाकलेस ते बरं झालं.

झ ला अनुमोदन. आपल्या प्रचंड बिझी शेड्यूलमधून वेळ काढून हे चार(च) शब्द लिहिलेत आणि आम्हालाही सहारा सफर घडवलीत त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. :))

तुमचं हे लिखाण म्हणजे वाळवंटातली तहान झाली.. इतकं कमी का लिहिलंत? अजून खूSSSSSSSSSप लिहायला हवं Happy फोटो मात्र सुरेख! Happy

फोटो खूप छान आलेत.. अन अनुरूप वर्णन.. Happy

अथकशेठ, थान्कु..... Happy Happy Happy
किशोर, मी गेलेल्या या जागी फक्त डेसर्ट स्पेशल जीपनेच जाता येते... हे ओअसिस ४० किमी आत आहे कैम्पपासुन... या जीपला इकडे ४ बाय ४ असे म्हणतात.... आपल्या इथे जशी सुमो असते तशीच असते पण चासिस खुप उंच असतो... या गाड्या वाळुत १५० किमी च्या स्पीडने आरामात धावतात... एकदम स्मुथली... फोटो आहेत पण वेळेअभावी टाकले नाहीत... असो, धन्यवाद Happy
दिनेशदा, ट्युनिशिया पाहीले नाही तसे... पण मागच्या वेळी भारतातुन इकडे परतताना त्रिपोलीजवळ धुके असल्याने पायलटने विमान ट्युनिसला नेले होते... ओझरते दर्शन झाले... पण एक सांगु... इकडचे सर्व देश एकसारखेच आहेत... ईजिप्तपासुन मोरोक्कोपर्यन्त... असो धन्यवाद! Happy
झकासा, अरे मुलुन्ड बिबि माझेही घर आहे .... Happy
केदारभाऊ, धन्यवाद! Happy
पल्ला, रुनी... धन्यवाद! Happy
मंजु, पुनमबेन...थंडीच्या मौसममध्ये फिरायला जायची सर्वात छान जागा म्हणजे वाळवंट... वाळवंटाबद्दल, लिबियाबद्दल, लिबिअनबद्दल आणि इथल्या अनुभवाबद्दल लिहीण्यासारखे खुप खुप आहे... वेळ काढुन नक्की लिहीन... अगदी नक्की Happy
बी, धन्यवाद.... Happy
अनघा, थान्कु! Happy
आय टी, धन्यवाद.... Happy

गोबु, या जीपला ४ व्हिल ड्राईव्ह जीप असे म्हणतात. या गाड्यांची चॅसी उंच असतेच परंतु याचे इंजिनही जरा वेगळेच असते मला सांगण्यात आले होते.
थोडा यांत्रिकि विषय आहे पण या गाड्यांच्या चारही चाकांना गती दिलेली असते. तसेच ही गाडी थांबतेही अगदी पटकन. मी दुबईमध्ये असताना गेलो होतो.
साधारण दुपारनंतर ऊन कमी झाल्यानंतरच या गाड्या वाळवंटात शिरतात. आम्ही गेलो तेव्हा तेथे उन्हाळा होता म्हणूनही असेल कदाचित. डोंगराच्या कड्यावरुन खाली येताना फार भिती वाटते परंतु तितकिच मजाही येते. आम्हाला सगळ्यांना सिटबेल्टने बांधले होते, त्यामुळे बरे नाहीतर काही खरे नव्हते. काय चालतात हो या गाड्या, वाळुतही चढणावर चांगलाच वेग असतो यांचा. महत्वाचे म्हणजे यांचे टायरही पसरट व ट्युबलेस असतात. डोंगर चढायला चालु केल्यावर ड्रायव्हरने गाडीतले वातानुकुलीत यंत्र बंद केले, विचारले तर म्हणाला बॅटरी लवकर संपते. आम्ही असेच दोन-चार वेळा वरुन खाली खालून वर गेलो आणि आमची गाडी वर डोंगरावर सपाटीला वाळुमध्ये बंद पडली. गाडीचे इंजिन खुप तापले होते. त्यामुळे आम्हाला चिंता होती कि कधी ही गाडी बाहेर निघणार आणि आम्ही पायथ्याशी कसे आणि कधी जाणार. ड्रायव्हर प्रयत्न करत होता. परंतू गाडीची मागची दोन्ही चाके नुसतीच गरागरा फिरत होती व तेथे आणखीनच खड्डा पडत होता. ते पाहुन आमच्याही पोटात भितीने खड्डा पडत होता. आमच्यातल्या एकाने ड्रायव्हरला सल्ला दिला कि तु रिव्हर्स टाक, ड्रायव्हरने रिव्हर्स टाकला तेही जमेना कारण चाकाच्या आजुबाजुलाही वाळुचा डोंगरच तयार झाला होता. तशातही आमच्यापैकी एकाने विनोद केलाच कि हे रिव्हर्सचे तुला पहिल सुचले नाही. आता काय उपयोग, याची ना ट्युब कधी वेळेवर पेटणारच नाही. शेवटी आम्हाला प्रश्न पडला, गाडी निघाली नाही तर? ड्रायव्हरही कंटाळला, त्याच्याही चेहर्‍यावरची भिती लपत नव्हती. तेवढ्यात खालून एक दुसरी जीप येताना दिसली. सगळ्यांनाच खुप बरे वाटले. ड्रायव्हरने गाडीतला लोखंडी रोप लागलीच बाहेर काढुन जीपच्या समोरील भागात अडकवला तेवढ्यात खालची जीप आलीच. आमच्या जीप समोर त्याने जीप उभी केली व त्याच्या जीपच्या मागच्या बाजुला असणार्‍या हुक मध्ये लोखंडी रोप अडकवला. त्याने गाडी सुरु केली आमची जीप थोडी हलली परंतु बाहेर निघेना. कारण समोरच थोडया अंतरावर तीव्र उतार होता. म्हणून आमच्या जीपला ओढणारी जीपही सर्व शक्ति वापरत नव्हती. समोरच्या जीपवाला चार लाकडाचे ठोकळे घेवुन बाहेर आला. एव्हाना आमच्यातले बरेच जण फोटो काढण्यासाठी इकडेतिकडे विखुरले होते. निसर्ग सौदर्यच तसे होते. गरम वाफा अंगाला झोंबत होत्या परंतु फोटो काढण्याची हौस काही भागत नव्हती. त्यापैकी दोघांना बोलावुन घेतले. आमच्या चौघांच्या हातात त्याने ठोकळा दिला. आम्ही आमचे काय काम आहे ते समजलो. आमची जीप थोडी पुढे गेली कि आम्ही चारही जण ठोकळा पुढे सरकवत होतो. ठोकळेही गरम झाले होते. ते काम करण्यास आम्ही नकार दिला. फोटो काढुन झाल्यावर
आता सगळेच जीपजवळ गोळा झाले होते. आता असे ठरले कि सगळ्यांनी पाठीमागून आमच्या जीपला ठकलायचे त्याला आम्ही तयार झालो. आमच्यातला एक जरा जास्त शहाणा होता त्याने फक्त गाडीला मागून हात टेकवले होते. आता समोरच्या जीपवाल्याने सर्व शक्तीनिशी गाडीला झटका दिला. आमचा ड्रायव्हरही तयारीतच होता. गाडी बाहेर आली आम्ही गाडीला धरुनच होतो, परंतू आमचा शहाणा मित्र मात्र चांगलाच तोंडावर आपटला व वाळुत न्हाउन निघाला. डोक्यात एवठी वाळु गेली कि पुढचे दोन दिवस केस विंचारले कि याच्या डोक्यातुन एक-दोन तरी वाळुचे कण पडायचे. थरारक म्हणजे आमच्या जीपला ओढणारी जीप लोखंडी दोरखंड तोडुन खालच्या उतारावर जाऊन थांबली होती. भरपूर शक्ती असते या जीपमध्ये. किती CC माहित नाही. आमच्या ड्रायव्हरने त्याला वरुनच हात दाखवून टाटा केले. आम्हीही वैतागलो आणि ऊन्हाने तापलो होतो, पटापट गाडीत बसलो. बरोबर आणलेले पाणीही संपले होते. ड्रायव्हरला म्हटलं पाच मिनिटं थंड हवा तरी दे, त्यालाही त्याची गरजच होती. गाडी पुन्हा तपासुन ड्रायव्हर परत आला. सुर्यही आपले दिवसाचे काम संपवुन त्याच्या घरी निघाला होता. गाडीच्या काचेआडुनच त्याला कॅमेर्‍यात साठवुन ठेवला.
आता आमचा रात्रीचा कार्यक्रम ठरला होता डोंगराच्या पायथ्याशी 'बॅले डान्सचा'. तेथेच जेवण होते बॅले डान्ससोबत. अहाहा.. काय तिचे ते नॄत्य. येथे या सार्वजनिक ठिकाणी नाही करता येणार गोबु त्याचे वर्णन, त्याचे वर्णन फक्त पुरुषांसाठी.

गोबु.. अरे तुझे लिखाण तर सुरेख आहेच पण फोटोही मस्त आलेत...
नयन रम्य वाळवंटाची सफर घडली..
किशोर चे थरारक प्रवास वर्णन वाचुन अडचणी असुनही बघण्या सारखे आहे वाळवंट नक्कि..