भटकंती दापोलीची -२

Submitted by जिप्सी on 1 January, 2010 - 12:57

दापोली परिसरातील काहि मंदिरे
दाभोळची चंडिका देवी
Dapoli_2.jpgDapoli_3.jpgकोळेश्वर मंदिर (कोळथरे)
Dapoli_4.jpgझोलाई देवी मंदिर (आसुद)
Dapoli_7.jpgDapoli_6.jpgDapoli_5.jpgव्याघ्रेश्वर मंदिर (आसुद)
Dapoli_9.jpgDapoli_10.jpgकड्यावरचा गणपती (आंजर्ले)
Dapoli_16.jpgDapoli_17.jpgकेशवराज मंदिर (आसुद बाग)
श्री केशवराज मंदिराचे आणखी काहि फोटो व माहिती खालील माझ्या लिंकवर आहे.
http://www.maayboli.com/node/2208
Dapoli_12.jpgनिसर्गरम्य दापोली
Dapoli_1.jpgDapoli_8.jpgDapoli_11.jpgDapoli_14.jpgफिरताना भेटलेला हा अनाहुत पाहुणा Happy
Dapoli_15.jpg

गुलमोहर: 

योगेश, छान फोटो आहेत. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. निसर्गरम्य दापोलीच्या चित्रांमधे एक पूल आहे, तो आसूदला जाताना ओढ्यावर आहे तोच आहे का? हा आनंद घेण्यासाठी पुन्हा लवकरच एक फेरी मारावी लागेल. Happy

स्वाती, आशु, श्री धन्यवाद!
स्वाती तुम्ही ज्या पुलाबद्दल बोलत आहात तो बहुतेक श्री केशवराजला जातानाचा (आसव नदिवरचा) आहे (गारंबीचा बापु चित्रपटाची शुटिंग जिथे झाली तोच तो प्रसिद्ध पुल) चु.भु.द्या.घ्या.
वरील प्रकाशचित्रामधील पुल हा आसुद गावातुन झोलाई देवी आणि व्याघ्रेश्वर मंदिराकडे जाणारा आहे.

ारंबीचा बापु चित्रपटाची शुटिंग जिथे झाली तोच तो प्रसिद्ध पुल) चु.भु.द्या.घ्या. >>> तोच पूल आहे तो.
लाडघर ला "सागर सावली" ला गेला नाहीत का?

योगेश२४ : सुंदर आले आहेत फोटो. १४ नं. फारच आवडला. १५ नं. च्या फोटोत बेडे वाळत घातले आहेत का?
योगेश२४ / भ्रमर "सागर सावली" रहाण्यासाठि कस आहे? तिथे कस जायच याबद्द्ल जमल्यास माहिती द्या.

मोगरा, सागर सावली राहण्यासाठी अगदी मस्त. ५ नंबर ची खोली मिळाली तर छानच. पलंगावर पडल्यापडल्या समुद्र दिसतो. जर तुम्ही मासेखाऊ असाल तर ताज्या माश्यांवर ताव मारु शकाल. नाश्ता, वेज जेवण देखिल अप्रतिम!! मालक (बापूसाहेब) बोलायला अगदी मस्त माणूस. स्टाफ पण चांगला आहे. मी मधु-चंद्र तिथेच साजरा केला. Happy

कुठुन जाणार आहात? जर मुंबईहून स्वत:च्या गाडीने जाणार असात तर आंबेत वरुन एक फाटा मंडणगड वरुन दापोलीला जातो. कॄषी विद्यापिठाच्या शेजारुनच रस्ता जातो लाडघरला. (विद्यापिठासमोर एक पानवाला आहे, मंगेश नावाचा. त्याच्याकडे मघई पान अप्रतिम मिळतं).

कड्यावरचा गणपती (आंजर्ले) >>>
==========================
ह्या चित्रात मागे लिहिलेली पाटी वाचा
"क्रुपया मूर्तीचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे"
==========================
योगेश भाऊ, तुम्हाला फोटो काढताना कोणी अडवले नाही !!! LOL Happy

छान आहेत फोटोस
योगेश खर तर बाप्पाचे फोटो काढाय्ला मनाई आहे तिथे, कोळेश्वर आमच कुलदैवत आहे, दरवर्षी जातो.
मस्त आठवणी तज्या झाल्या सगळ्या , पुढच्या वेळेस आर्यावर्त ला पण जाऊन ये

Hotel Sagar Savli, Tamas Tirth. Phone: 02358-288047, 282271.
Bombay # 022-28723249,24378801
Post: Ladghar
Tal: Dapoli–415 712
District: Ratnagiri

वा! मस्त आहेत फोटोज! मुंबईहून गाडीने जायला किती वेळ लागतो? आता ३-४ महिने हवा कशी असेल? कोणीतरी प्लीज सांगा.

स्वप्ना मुंबईहून गाडीने जायला अंदाजे ४-५ तास लागतात.
पहिला मार्ग - मुंबई - पनवेल - पेण - वडखळ नाका - नागोठणे - कोलाड - माणगाव - लोणेरे फाटा
(लोणेरे फाट्यावरुन दापोलीला जायचा रस्ता आहे)
दुसरा मार्ग - मुंबई - पनवेल - पेण - वडखळ नाका - नागोठणे - कोलाड - माणगाव - वीर
(वीर स्टेशन पासुन अंदाजे ३-४ किमी अंतरावर दापोलीला जायचा रस्ता आहे (वीर फाटा ते दापोली अंदाजे ६७-७२किमी). आंबेत-मंडणगड मार्गे दापोली)
तिसरा मार्ग - मुंबई - पनवेल - पेण - वडखळ नाका - नागोठणे - कोलाड - माणगाव - वीर - महाड - पोलादपुर - खेड
(खेडपासुन साधारण २७ किमी अंतरावर दापोली)
पहिला मार्गावरचा रस्ता थोडा खराब असल्याने आम्ही वीर फाट्यावरून गेलो.

आता ३-४ महिने हवामान भटकंतीसाठी मस्तच आहे.
दापोली हे कोकणचे महाबळेश्वर म्हणुनही ओळखले जाते. त्यामुळे थंडी बर्‍यापैकी असते. सध्या गुलाबी थंडीला सुरूवात झाली आहे.

सुंदर माहीती!
४ थी मधे असताना राहुरीहुन वडीलांबरोबर दापोली कृषी विद्यापीठात गेलो होतो! तेव्हा गेस्ट हाऊसवर राहीलो असताना रात्री कोल्हेकुईच्या आवाजाने रात्रभर झोप झाली नव्हती! आणि नंतर हर्णे बंदरावर शंख-शिंपले वेचत घालवलेली संध्याकाळ....सगळे सगळे आठवले!

कोकणातील घरांसारखीच मंदीरेही कौलारु असतात काय?