जगण्याची घाई

Submitted by harish_dangat on 30 December, 2009 - 20:47

जो तो इथे व्यस्त आहे
जगण्याची आहे घाई
प्रत्येकाचे काम वेगळे
क्षणाचीही उसंत नाही

बालकांचे पाय कधी
कुठे भुईवर ठरती
कधी पुढे कधी मागे
दाही दिशा गरगरती

तरुणांचे रक्त कसे
सदोदीत सळसळते
कधी क्रांतीची ज्योत
कधी जळते पलीते

संसाराचा भार घेउनी
मध्यवयीन वाकलेले
थोडी जीत कधी कधी
बाकी हार चाखलेले

थोडी बहू पुंजी मोजती
ज्यांनी गाठली साठी
चालून घेती झरझर ते
हाती येण्या आधी काठी

ज्यांच्या हाती आली काठी
त्यांना चालणे भाग आहे
चालून घ्या चार पावले
जोवरी डोळ्यात जाग आहे

-हरीश दांगट

गुलमोहर: 

छान आहे कविता. हरीश, आज काय प्लान्स मग रात्रीचे?
दक्षिणा, का छळतेस ग गरीब बिच्चार्‍या कवीलोकांना?
अगं, भाजी, लग्नाची मुलगी आणि कविता या तिन्ही गोष्टींना 'बरी वाटली' या एकाच मापाने नको हो तोलूस. जरा वेगळे वेगळे शब्द वापरत जा! Wink हलके घे हो ! (कारण मला परवडणार नाही)

<<ज्यांच्या हाती आली काठी
त्यांना चालणे भाग आहे
चालून घ्या चार पावले
जोवरी डोळ्यात जाग आहे>>
छान आवडले.. मस्तच