मोझॅक

Submitted by मीन्वा on 25 February, 2008 - 12:38

किती दिवस झालेत एकसंध असल्याला..?
अनुभवाच्या आघातांनी कितीतरी तुकडे केलेत
एकही तुकडा आपली छटा सोडणार नाहीये
हा तुकडा म्हणजे मी! ...नव्हे तो,
तो तिकडचा वेगळा दिसतोय ना..? मग तीच मी..!
नाहीतर पलिकडचा, छे....! अवघड आहे.
तो आहे ना तो.. जरा वेगळाच उठून दिसणारा
तितकासा समरस होत नाहीये या चित्राशी..
पण तोही माझाच.... एक तुकडा.......
आता जमतय बहुदा मला माझेच सारे तुकडे जोडायला
टाकाऊतून टिकाऊ का कायसंस म्हणतात ना?
अगदी तसच..
प्रत्येक वेळी वेगळं बनतंय चित्र पण...ठीक आहे.

गुलमोहर: 

छान