.

Submitted by क्ष... on 29 December, 2009 - 14:11
लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

अधिक टिपा: 

.

आहार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनोती ने दिलेल्या झटपट लोणच्यासाठी लिंबु शक्यतो खूप नीट पारखून एकदम पातळ सालिचे घेतल्यास लोणच्यात सालिचा कडसरपणा जाणवणार नाही.
एक महत्वाची गोष्ट लिंबातल्या सगळ्या बिया नक्की न विसरता काढून टाकाव्यात.
एखादी जरी राहून गेली तर भयंकर कडवटपणा येईल लोणच्याला... Sad

बाकी मिनोती कृती पाहून तोंपासु... Wink

आम्ही करतो त्या लोणच्याची कृती अशी आहे:

२५ लिंबं घेऊन, चांगली धुवुन त्याच्या प्रत्येकी ८ फोडी कराव्यात. बिया काढल्या तरी चालेल, किंवा तशाच राहिल्या तरी हरकत नाही. ह्या फोडी एका बरणीत भरून वरून वाटी भर मीठ घालून ठेवावे. दुसर्‍या दिवशी बरणी हलवावी. जितके जास्त दिवस हे मिश्रण मुरवत ठेवू तितकं चांगलं. दुसर्‍या दिवशी फोडींना पुरेसं पाणी सुटलं नसेल तर थोडं अजून मीठ घालावं. किमान ५ दिवस तरी हे मिश्रण ठेवावं. लोणचं करायच्या दिवशी मोठ्या पातेल्यात साखरेचा एकतारी पाक करावा, त्यात आवडीनुसार लाल तिखट घालून पाक चांगला हलवावा, (अन्यथा लोणच्याला तिखटाचा कच्चट वास येतो.) मग त्यात बरणीतले मिश्रण ओतावे, परत चांगले हलवून चव घ्यावी, जे कमी असेल ते घालून गॅस बंद करावा. व्यवस्थित थंड झाल्यावर बरणीत भरावे. २-३ दिवसात लोणचे व्यवस्थित मुरून खाण्यास तयार... Happy

थेट शिजवलेल्या लिंबाच्या फोडी (लोणच्यात) थोड्या चिवट लागतात, वरिल प्रकारे केल्यास तशा लागत नाहीत.

बनवण्यासाठी सोपे लोणचे

तीन चार लिंबे धुवून घ्या... नेहमी फोडी करतो तशा करा.
एका स्वच्छ बरणीत लिंबाच्या फोडी, गुळ, तिखट आणि मीठ चवीप्रमाणे भरा. कमीत कमी ७-८ दिवस उन्हात ठेवा. मधे मधे स्वच्छ चमच्याने वरखाली करा.लिंबे मुरली की त्यांचा रंग बदलेल.

मिनोती, हाय!! कसलं दिसतंय ते लोणचं.. स्लर्र्र्र्र्र्र्र्र्प!!!

लिंबाचं एक इन्स्टन्ट लोणचं प्रेशर कूकरमध्ये शिट्या करून होतं. त्याची कृती कोणाला ठाऊक असेल तर यो.जा.टा.

फोटो मस्तय Happy मलाही कडवटपणाबद्दल शंका आहे. करुनच बघितलं पाहिजे. मी गोडं लोणचं दक्षिणाच्या कृती प्रमाणेच करते.

आम्बट पदार्थाने माझे दात खूप आम्बतात. त्यामुले मी ते खात नाही. मला हल्ली ते आवडतही नाहीत.आंबट पदार्थ पाहिले तरी माझ्या अंगावर काटा येतो.

मिनोती,
मस्त दिसतय लोणचं. करुन बघीन. शिजवून करायच्या लोणच्यात मला एक शंका आहे, लिंबाच्या फोडी, साखर वगैरे एकत्र शिजवलं कि लिंबाची साल ताठर होते. (माझ्या सा बा म्हणतात कि ती टाकुन द्यायची आणि मला तर लिंबाची सालच आवडते खायला) बहुतेक दक्षिणाच्या कृतीने तसं होणार नाही ,साल मुरेल ना?

आई नेहेमी करते अश्या पद्धतीने. कडवटपणा येत नाही. यावेळी मी पहिल्यांदाच १० लिंबांचं नुसतं मीठ-साखर घालून आयामसाठी लोण केलंय. यात अजुन एक प्रकार म्हणजे केप्रचा लिंबु लोणचे मसाला घालून असचं बिना साखरेचं लोणचं करायचं मिक्सरमधून. मस्त लागतं. Happy

मिनोती आजच करुन पाह्यलं. अमेझींग झालं. खूप खूप धन्यवाद.
कडवटपणा मला किंचीत जाणवला. दोन दिवस उन्हात ठेवलं की जाईल. दक्षिणा म्हणते तशी लिंब पारखुन घेतली पाहिजे इकडे भारतात.
रच्याकने आम्ही लिंबाच वार्षिक गोड लोणचं दक्षिणाने लिहीलेल्या कृतीने करतो. पाकही टाकायची गरज नाही नुसती साखर चालते. फक्त मग मुरायला महिना लागतो. मागच्या वर्षिचं या वर्षी काढतो छान काळं झालेलं. Happy

लिंबाच तिखट लोणच कसं करतात ? मदर्सचं मिळतं तसं ?

मामी,

बारीक तिखट, मीठ आणि साखरेला अजून मिस्कर मधे फिरवून किती बारीक करणार. लिंबूसाठीच तेवढे मिस्कर हवे आहे इथे खरे तर... Happy

Pages