काय रे देवा..(कविता नवरेच्या "काय रे देवा" च्या चालीवर)

Submitted by वर्षा_म on 23 December, 2009 - 23:19

आता पुन्हा
आमची परीक्षा असणार

आता पुन्हा आमची परीक्षा असणार
मग आम्ही पुस्तकासमोर बसणार
मग आई आल्याचा चहा आणुन देणार
तरीही अभ्यासाचा मुड नाही येणार
काय रे देवा..
नापास झालो की आम्ही चिडणार
पेपर अवघडच काढले ओरडणार
एटीकेटीचे विषय वाढवुन मागणार
दुसर्‍या दिवशी हीच चर्चा रंगणार
मग आम्ही मोर्चे नेणार
शिक्षकांच्या नावाने खडे फोडणार
तरिही पुन्हा परीक्षा असणार
पुन्हा अभ्यासाचा मुड नसणार
वर्षभर नुसती लफडी करणार
पुन्हा आम्ही नापास होणार
पुन्हा परीक्षापध्दतीवर टीका करणार
काय रे देवा....
सुरवातीपासुण अभ्यास करायचे ठरवणार
पण ते काही केल्या नाही जमणार
मग कॉपीचा प्रयत्न करणार
आमची कॉपी पकडली जाणार
परत आम्ही नापास होणार
परत त्याच वर्गात बसणार
नवीन नवीन चेहरे असणार
परत नवीन प्रकरण सुरु करणार
काय रे देवा...

हे असेच चालायचे....
परीक्षा काल झाल्या.., आजही होतायत.., उद्याही होणार...
काय रे देवा...

वर्षे सहीच एकदम

तो संदिप खरे हे वाचेल सगळ तर म्हणे

मी एक कविता करणार
मग त्यावर माबोकर काहीच्या काही रचणार
वर ती प्रकाशीतही करणार
कुणी स्मायली फेकणार
कुणी त्यावर पण कविता करणार
काय रे देवा Proud

मस्त.

सहीच! Happy
<<मी एक कविता करणार
मग त्यावर माबोकर काहीच्या काही रचणार
वर ती प्रकाशीतही करणार
कुणी स्मायली फेकणार
कुणी त्यावर पण कविता करणार
काय रे देवा>> Lol Lol

मूळ गाणं ऐकलेलं नाही.. Sad त्यामुळे ये झेपी नही Sad >>> दक्षिणा, मूळ गाणं इथे पाहू आणि ऐकू शकतेस... म्हणजे तू एकटीच काय ती नशीबवान राहणार नाहीस.... Proud
http://www.youtube.com/watch?v=SyH7wdo2TC8