वेडी!!!

Submitted by स्मिता द on 22 December, 2009 - 04:28

पुनःप्रत्यय......

वेडी!!!

शहाणी झालीये माझी बाबी
आई.. मी अन शहाणी?
होतेच तशी वेडी लहानपणी
वार्‍यासारखी अवखळ आणि भाबडी
लाटेने मोडलेल्या खोप्या साठी रडणारी
ढगांचे वेगवेगळे आकार बघुन टाळ्या पिटणारी
फ़ुलांचे जसेच्या तसे रंग हवेत म्हणुन हट्ट करणारी
भातुकलीच्या खेळात मन हरवुन रमणारी
रडता रडता हसणारी,हसता हसता रडणारी
निरागस,निखळ.......
पण आताशा मी
उगाचच कशासाठी ही रडत नाही
फ़ुलांचे रंग जसेच्या तसे मिळत नाही
हे मला कळलय...
शेवटी भातुकलीचा खेळच असतो
हे मला उमगलय.....
ढगांचे आकार क्षणाक्षणाला बदलतात
हे मी स्विकारलय.....
हट्ट करणं तर मी सोडुनच दिलय
म्हणुन मी शहाणी झालेय
खरं सांगु आई
हे सगळ शहाणपण नाही गं
शहाणपणाची पांघरलेली झुल आहे
अजुनही आतुन मी तशीच आहे
भाबडी,मनस्वी,निरागस
हट्टी आणि....वेडी

गुलमोहर: 

स्वतःशी किती संवाद साधशील? तू अशी आहेस हे आईला तू न सांगतादेखील माहित आहे. पण तुला हे नेमके कोणाला सांगायचे आहे?

धन्यवाद गिरिशजी, उमेशजी अन गंगाधरजी..:)

उमेशजी प्रत्येक कविता हि कुणाला सांगायचीये हे बघुन वाचावी असे नाही. हा संवाद सकृतदर्शनी आईला उद्देशुन केलेला असला तरी त्याची व्यापकात बरीच मोठी आहे. वैयक्तिक दृष्टीने हे कुणाला उद्देशुन हा किंवा ही लिहितेय ही काव्य वाचनातली सर्वात मोठी चूक .

वैयक्तिक संदर्भ कुठलेही लेखन वाचताना करू नये. स्वतःशी साधलेला संवाद बाकी कुणाला क्लेशदायक ठरू नये ही माझी प्रामाणिक इच्छा!

तुम्हाला सहन नसेल होत तर वाचु नका पण उद्वेगाने आता स्वतःशीच किती संवाद साधणारेस असे उदगार नसावेत ही विनंती..:)