माराष्ट्रातील ग्रामिण भागातील शिक्षणाची अधोगती

Submitted by लक्ष्मण on 17 December, 2009 - 03:30

नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालाच्या पार्श्वभुमी वर मी हा लेख लिहित आहे. ग्रामिण भागातील सद्य आणि खरी परिस्थीती मी वर्णन करायचा प्रयत्न केला आहे. मला आलेल्या काही वैयक्तीक अनुभवातुन मी हा लेख लिहीला आहे.
ह्यातुन कुणालाही दुखवण्याचा हेतु नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी किंवा सगळ्या ग्रामिण भागात अशी परिस्थीती असेल असे नाही. माझ्या गावातील मात्र हे विदारक सत्य आहे.
*****************************************************
महाराष्ट्रातील ग्रामिण भागात शिक्षणा बद्दल जागरुकता व महत्व दिवसेंनदिवस वाढुलागले आहे
शिक्षण हे वाघिणी चे दुध आहे जो पिईल तो गुर गुरणारच याची जाणिव सर्व सामान्य शेतकरी , शेतमजुर , आदीवासी , दलीत , मुस्लीम या सर्व ग्रामिण भागातील जाती धर्मातील लोंकाना झाली आहे .
महाराष्ट्रातील ग्रामिण भागात जे शिक्षण दीले जाते ते सुपर पॉवर बनणर्‍या भारताला उपयोगी पडेल काय .
*****************************************************
माहीत नाही
का तर मुल जेव्हा शाळेत जाउ लागली, ती बोलायला लागल्या नंतर त्याला कोणी नातेवाइकाने प्रश्न विचारला कि मोठ्यापणे कोण होणार याचे उत्तर ठरलेले पोलिस , बसड्रायव्हर , मास्तर , कंन्डाक्टर , डॉक्टर , मिल्ट्री मॅन ,मजुर , बस याच्या पलिकडे काही असते हे प्रश्न विचारण्यावालेला तु हे बन असे म्हणण्याची दुसरी नावे माहीत नस्तात व प्रश्नला उत्तर देनाराला ही .
असो ग्रामिण भागात प्राथमिक स्थरावरील शिक्षण हे प्रत्येक गावात मिळते तिथे केंद्रीय प्राथमिक शाळा असतात साधरण चैथी पर्यंत मुलगा पुढील वर्गात गेला कि एक तर तो जिल्हापरीषद किंवा एखादया नेत्याच्या संस्थेच्या शाळेत दाखल होतो प्रत्येक गावात माध्यमिक शाळा नसतात साधरण १० ते १२ गावात मिळुन एक शाळा असते तेथिल शिक्षक शिक्षण देण्याच कार्य कमी व आपल्या संस्था चालकाचे कार्य जास्तीत जास्त करतात .
महाराष्ट्रातील प्रत्येक पुढारी , आमदार , मंत्री , खासदार ,यांनी आपाआपल्या जिल्हात शैक्षणिक संस्थाचे जाळे निर्माण केले आहे ( ते काही कर्मविरां सारखे ग्रामिण भागाचा विकास व गरीबांना शिक्षण ) या हेतुन नाहि तर , पैसा कमविण्याच्या उद्देशान. हो पैसा कमविण्याच्याच उद्देशान कोणी म्हणेल दया पुरावा तर तो मी देउशकतो .
ग्रामिण भागात १० वि पर्यन्त व्यवस्थीत शिक्षण दीले जाते पण १० व १२ बोर्ड परीक्षा जेंव्हा असतात तेंव्हा तर बिहार पेक्षा गोष्टी महाराष्ट्रातील ग्रामिण भागात घडतात .
कोणती ही बोर्ड परीक्षा आसेल तर ९ ते १० शाळेत मिळुन १ परीक्षाचे सेंटर आसते परीक्षा केंद्रावर १ कींवा २ पोलीस कर्मचारी व ईतर शाळेतील शिक्षक गार्डींग करण्यासाठी येतात परंतु परिक्षा हॉलमध्ये जो गोंधळ चालु आसतो तो फारच भायानक आसतो संपुर्ण परीक्षा केंद्र संगमताने कॉपी करत आसतात , शिक्षक त्यांना कॉपी करण्यास मदत करतात कोणी आधिकारी चेकिंग करण्या करीता येणार असेल तर तो १० किलोमीटर दुर आसतांनाच शाळेत खबर मिळते सर्वात मोठा कहर म्हणजे एकादया पुढारयाचा मुलगा किंवा मुलगी त्या शाळते वा कॉलेजात आसेल तर संपुर्ण शाळा व कॉलेजला पुर्व परवानगीन कॉपी करण्यास मिळते .
कॉपी करण्या करीता मराठवाड्यातील काही केंद्र कु प्रसिध्द आहेत , मी आसे ही काही महाभाग पाहीले आहेत ज्यांचे घर शहराच्या ठिकाणी आहे परंतु गावच्या परिक्षा केंद्राच्या ठिकाणी कॉपी खुप चालते म्हणुन ते शहर सोडुन गावात अ‍ॅडमिशन घेतात व पास होतात .
१२ वी झाल्या नंतर काय ( दुसरे काही माहीत नाही ) मग डी. एड . करायचे मास्तर होयचे या साटी कायकाय उद्योग केले जातात महीत आहे
१) १२ वी बोर्ड ची परीक्षा दील्या नंतर पेपर कोणत्या शिक्षकाकडे तपासण्या करीता गेला आहे याचा शोध घेउन संबधित शिक्षकाला गाठून मार्क वाढवुन घेतले जातात , या कार्याकरीता घरातील एक सुशिक्षीत व्यक्ती सर्व सोपस्कर पार पाडते .
२ ) समजा १२ वी ला कमी मार्क पडले तर घाबरायचे नाही ,आहे सोपा उपाय , डुप्लीकेट टी.सी. काढुन नविन शाळेत अ‍ॅडमिशन घ्यायची , व पास व्ह्यायचे.
३ ) डी.एड. ला विधवा , घटस्फोटीत , अपंग यांच्या करीता राखीव जागा असतात मग याकरीता तयारी सुरु होते काय मुलीला कमी मार्क पडले आहेत काळजी नाही , मुलीचे लग्न झाले नसेल तरी तीला विधवा घोषीत केले जाते कींवा अपंग सर्टिफिकेट दीले जाते , मुलीचे लग्न झाले आसेल तरी तीचा घटस्फोट झाला आहे आसे म्हणुन डी,एड. नंबर लावला जातो .( काय खोटे वाटत आहे , कागदत्रे , सर्टीफिकेट हे केसे मिळणार , अहो ते पण लिहले आसते ... वेळ नाही )
हे आसले लोक नंतर भावी शिक्षक म्हणुन बाहेर पड्तात , जिल्हा परिषद च्या माध्यमातुन यांना वेगवेगळ्या गावात नेमणू का दील्या जातात ज्यांची जिल्हा परीषद च्या माध्य्मातुन नेमणूक होत नाही ते मग पैसे आसतील तर ४ ते ५ लाख एखादया संस्था चालकाला दीले जातात व शिक्षक म्हणुन नोकरी करु लागतात . आणी पैसे नसतील तर आयुष्यभर तुमच्या पगारातुन कपात केली जाते .
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
गावात एक म्हण आहे "गव्हा सोबत कीडे पन रगडतात " त्या प्रमाणे हुशार आभ्यासु , मेहेनती , अशी मुले या गोष्टी मुळे कॉपी करण्या ची ईच्छा नसतांना ही या भानगडीत पडतात परंतु मला इथे एक सांगावासे ग्रामिण भागात जी मुले आभ्यासात हुशार आसतात ती खरोखर पुढे गावाच्या बाहेर जाउन आपल्या आइवडीलांचे नाव कमवतात .
आता मह्त्वाचे माझा सारख्याचे काय ? : पैसा नाही , हुशार ही नाही , नेमके कॉपी करण्यास गेलो की आमचे गाईड जप्त , त्या मुळे शेजारच्याचे चोरुन थोडे थोडे बघुन कसेबसे काठावर पास व्हायचे
( पुढे चालुन आभ्यास या क्षेत्रापासुन आम्ही पुर्ण फारकत घेतलि आणी -प्राक्टीकल जास्त आसलेले क्षेत्राची निवड केली ) आरे थांबा , हुशार नाही , बुध्दी नाही , मार्क नाही , पैसा नाही म्हणुन काय नोकरी नाही ...अहो पोलिस भरती , मिल्ट्री भरती , होमगार्डस , कर्ल्क , शिपाइ , या जागा कोणा करीता ? अहो आमच्या सारख्या बुध्दीमत्तेचा कळस आसणार्‍या करीताच आसतात .
मग या जागा कधी निघतात याच्याकडे वाट पाहत बसायचे तो प्रयन्त एखाद्या कॉलेजात अ‍ॅडमिशन घ्यायची बी.ए .किंवा बी. कॉम. थोडे आभ्यासु असालतर बी .एस .सी .करायचे जेव्हा सराकारी नोकरी च्या जागा उपलप्ध होतात तेंव्हा पेपरला जाहीरात "१०० पोलीस कॉन्टेबल च्या जागा भरणे आहे " यातील ५० जागेवर आधिच नावे फिक्स केलेली आसतात उरलेल्या ५० जागेकरीता १५००० तरुन उभे आसतात त्यातील मी पण एक .
सांगण्याचे तात्पर्य एव्ह्ढेच आमच्या डोसक्यात सरकारी नोकरी व्यतेरीक्त दुसरी नोकरी आसते हे शिरायाला आणखी वेळ आहे.
( मुलीच्या वडीलांनी माझ्या मित्राला केलेला प्रश्न )
मु व : - काय करताय
मित्र :- नोकरी
मु व : कुठे
मित्र :- प्रायव्ह्टे ऑफीस मध्ये
मु व :- म्हन्जे सरकारी आफिसात नाही ?
मित्र :- नाही
मु व : ठिक आहे कळवितो तुम्हाला राम राम ....
//////////////////////////////////////////////////////////////////////////////////
गावाकडे माझा एक मित्र भेटला
मित्र : काय लक्ष्या कुटे आस्तुस
मी : पुण्याला
मित्र : पुण्याला अन काय करुतुयस
मी : काय नाय हाय कामाला एका ठिकांनी , आर पन तु काय करुतयस
मित्र : मायला ल्य शाहाना जस काय माहीतच नाही वाट्त ? आर शाळेत मुख्यधापक आहे मी ....
मी : तु आणी मुख्यधापक पन क्स तुला तर काहीच येत नाही , ना गणित , ना ईग्रजी , आर तुला मराठी पन धड वाचता येत नाही तु पोरांना काय शिकीविनार ?
मित्र : हे हे आर मुख्यधापकाच शिकवाय्च काम्च नस्त त्याच काम फक्त देखरेख , बील काढणे , पोंराकडून फि घेणे आणी काय ? Wink .

मित्रांनो वरील संवाद सत्य आहे या माझ्या मित्राने डी. एड .ला नंबर कसा लावला त्याची खुप मोठी कहाणी कथन केली पण शेवटी एक सांग्तो या जॉब करीता त्याने १०,०००००/- रु मोजले होते , गावाकडचे माझे बरेचसे मित्र हे शिक्षक आहेत , यांची बुध्दी , व्यसने , चारित्र , यांची सखोल माहीती मला आहे .
शेवटी वाइट वाटते आसल्या शिक्षकाच्या हातात ग्रामिण भारताची भावी पिढी घडत आहे .
////////////////////////////////////////////////////////////////////////////////////
मुम्बई व पुणे , येथील कामगार साफ सफाइ , धुणी भाडीं , ड्रायव्हर , कंपनी कामगार , हातगाडी व्यवसाइक , थ्रड व फोर्थ क्लास शासकीय कामगार , पोलीस , वा ईतर आनेक लोक यांचे शिक्षण जेमतेम झालेले असते पण यांची मुले ईंग्लीश मिडीयम मधे शिकतात या मुलांचा सगळ्यात मोठा प्रॉबलेम घरी होमवर्क दील्या नंतर होतो कारण आई वडिलांना ईग्रजीचे ज्ञान नसते त्यामुळे आशी मुले ३ त ४ वर्ष एकाच वर्गात राहतात .
यावर नंतर सविस्तर कधीतरी

लक्ष्या चे लक्ष .

गुलमोहर: 

एक म्हण आहे "आपलेच दात आणि आपलेच ओठ" त्या चालीवर, मुले तुमचीच, शिक्षक तुमचेच,गावही तुमचाच.

गावाकडचे माझे बरेचसे मित्र हे शिक्षक आहेत , यांची बुध्दी , व्यसने , चारित्र , यांची सखोल माहीती मला आहे .
>> लक्ष्या. माझ्या कॉलेजात हल्ली जे काही प्राध्यापक झाले आहेत, त्यांच्याबद्द्ल एकदम लागु! अर्थात ते सर्वजण संस्थाचालकांचे जावई असल्यानेच तिथे ज्ञानदान करित आहेत, त्यामुळे 'ब्र' पण नाही.

मध्यंतरी नेट/सेट ला पी एच डी हा पर्याय दिल्याने अनेक 'जावई' नोकरीला चिकटले किंवा अनेक लग्न होउ न शकलेले मुले/मुली उजवले/ल्या गेले/ल्या.

याबद्दल वाद घालुन उपयोग नाही कारण हे उघडे-पाघडे सत्य आहे.

श्री. हेरंब कुलकर्णी यांनी या विषयावर बरंच लेखन केलं आहे. त्यामुळे चिडून शिक्षक त्यांच्या घरावर मोर्चा घेऊन गेले होते म्हणे.
बाकी, लेखातली दारुण परिस्थिती सर्वत्र आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना (आणि त्यांच्या शिक्षिकेलाही) जोडाक्षरं येत नाहीत, हे गेल्याच आठवड्यात एका शाळेत पाहिलं.

मध्यंतरी नेट/सेट ला पी एच डी हा पर्याय दिल्याने>> आता रद्द झालय ना हे. मी तर ऐकलय त्याना कायम नाही करणार / सहावा वेतन आयोगही नाही मिळणार म्हणुन.
एकदा PMT च्या बसमधे नेट/सेट पास न झालेली प्राध्यापिका भेटली होती, ह्या विषयावर गप्पा मारता मारता "जे लोक नेट/सेट देतात त्यांनीए असा काय तीर मारलेला असतो कळत नाही" अस काहीसे तिरमिरीत बोलली, मी गप्प बसले.

महाराष्ट्रातल्या काही मोजक्या जिल्ह्यात असे प्रकार खुप घडतात, पण याचा अर्थ असा नाही की सगळ्या ग्रामीण भागात सगळं असच घडतं ...

महाराष्ट्रातल्या काही मोजक्या जिल्ह्यात असे प्रकार खुप घडतात>>> हो ३५ पैकी साडे चौतीस~!

आता रद्द झालय ना हे. >> हो. आता केंद्राने दबाव आणलाय. अजुन केंद्रात काही लोकांचे वरचे मजले ठिक आहेत म्हणायचे.

नेट/सेट अन पी एच डी हे ज्ञान/क्वालिफिकेशन मिळवण्याचे दोन वेगळे प्रकार आहेत. एकाने दुसर्‍याला मोजु-मापु नये. आता प्राचार्य नाहीत म्हणुन अनेक महाविद्यालये धोक्यात आहेत. सगळे प्रभारी 'जावई' बसवलेले. सगळा गोंधळ आहे.....

धन्यवाद ,
चंप्या , चिनुक्स , arc ,
महाराष्ट्रातल्या काही मोजक्या जिल्हात असे प्रकार खुप घडतात >>>हो ३५ पैकी साडे ....
एकदम बरुबर कि राव .
असो , माझा शिक्षणाच्या निमत्ताने गाव , जिल्हा , पुणे , मुम्बई येथिल शिक्षण संस्था व विविध स्तरातील लोकांशी संर्पक आला प्रत्येक ठिणाचे अनुभव खुप भिन्न स्वरुपाचे आहेत .
शिक्षण घेने व शिक्षण देने यांचा मात्र बाजार मांडला आहे एव्हढे नक्की . अगदी गावापासुन ते मुम्बई पुण्यापर्यंत .

""""डी.एड. ला विधवा , घटस्फोटीत , अपंग यांच्या करीता राखीव जागा असतात मग याकरीता तयारी सुरु होते काय मुलीला कमी मार्क पडले आहेत काळजी नाही , मुलीचे लग्न झाले नसेल तरी तीला विधवा घोषीत केले जाते कींवा अपंग सर्टिफिकेट दीले जाते , मुलीचे लग्न झाले आसेल तरी तीचा घटस्फोट झाला आहे आसे म्हणुन डी,एड. नंबर लावला जातो ."""" हे धक्कादायक आहे...

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात परिस्थिती खूप वेगळी आहे का? मेकप चांगला केला आणि इंग्रजीची झूल पांघरली तरी अंतरंग तेच. विनाअनुदानित व विशेषतः सिबीएसअ‍ई बोर्डाच्या शाळेतले किती शिक्षक पात्रताधारक असतात? बी कॉम झालेल्यांना पण गणित विज्ञान इंग्रजी शिकवायला हारतुरे घालून बोलवतात. माझ्या एका परिचितांचा अनुभव : त्यांच्या मुलाच्या ४ वर्षातल्या ४ वर्गशिक्षिकांना धड इंग्रजी बोलता येत नाही. वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सच्य नावाखाली लूटमार चालू. शिक्षकांना पगार सही केलेल्यापेक्षा हातात कमी...मग हे शिक्षक मुलांकडून प्रोजेक्ट्सच्या नावाखाली खंडणी वस्तुरूपाने उकळणार.

लक्ष्मण परिस्थिती दारुण आहे. इतक्या उघडपणे कुणी लिहितही नाही, कारण सगळेच त्यात सामील असतात.
आणि हि आजची कथा नाही आहे. मलाही मॅट्रिकला आमच्या गावात सेंटर घे, अशा अनेक ऑफर्स आल्या होत्या.

परदेशाई..... आम्च्या सुदलेखनाची बेसुद्धी चा उगम तिथंच झाल अम्हणायचा कि Happy

<<माराष्ट्रातील ग्रामिण भागातील शिक्षणाची अधोगती >> हे "माराष्ट्रातील" मुद्दामुन शैक्षणिक अधोगती दर्शविण्यासाठी आहे की टायपो आहे ?

लक्ष्मण सही विषय घेतला आहेस. शाळा हा खूप मोठा व्यवसाय आहे. स्पेशली आता शहरी भागातल्या नविन शाळा. गावातला उजेड तर लक्ष्मणदे दाखवलाच आहे.

खरा राग येतो तो शाळेत मराठीच्या तासाला धड मराठीही नीट न लिहीणार्‍या मास्तरांचा ,
एखाद्या विषयाची नावड पोरांच्या मनात तेंव्हाच तर उत्पन्न होते! तेच पुन्हा आयुष्यभर पुरते!

लक्ष्मण यांच्याशी सहमत पण आष्चर्य वाटले नाही. माझ्या M Sc च्या वर्गात एकाला केवळ कागदी भेंडोळे हवे होते. त्याच्या साठी पद रिकामे ठेवले होते. कसाबसा ४ वर्षात पास झाला... अजुन अनेक उदाहराण आहेत.

काही लोकं राजकीय हितसंबंधांचा वापर करतात. ज्यांच्या जवळ पैसे असतात ते पैसे मोजतात, पद मिळवतात. ज्यांच्या जवळ द्यायला पैसे नसतात, ते काही वर्षे फुकटात, किंवा अत्यंत कमी पगारावर काम करतात. मॅनेजमेंट कागदावर पुर्ण पगार दाखवते. जे काहीच करु शकत नाही पण पोटाची खळगी भरायची असते ते मन मागे ठेवुन विदेशात जातात :अरेरे:.

पदा साठी योग्य पात्रता नसतांनाही पद मिळू शकते हे अनेकदा, अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. परिस्थिती बदलणे आपल्यालाच मान्य नाही.

Sad Sad

उदय..... आता नवीन मराठी/इंग्रजी विनाअनुदानित प्राथमिक शाळांना मान्यता मिळणे सोपे झाले आहे. पालकांना शिक्षणाचे महत्व कळु लागल्याने ते ही पैसे द्यायला तयार आहेत. गरज आहे ती फक्त आपल्यासारख्यांनी एक पाऊल पुढे टाकायची. सुरुवात कठीण आहे, पण मन लावुन काम चालु ठेवले, तर अशक्य नाही.

नुकतेच माझ्या मित्राने पुण्यात बाणेर रोड ला एक केजी-प्री स्कुल असे काही सुरु केले आहे. खाजगी कंपनीचे प्रांचाईसी म्हणुन..... मी विचार करतो आहे, गावाकडे अशी छोटी शाळा काढु शकेल का? स्वप्न तर मोठ्या वर्ल्ड क्लास ट्रेनिंग सेंटर चे आहे, पण जसे जमेल तसे........!

जास्त माहिती मिळाली कि इथे टाकतो.

चंपक, गावात चांगल्या शाळा काढल्या तर जोमाने चालतील. लोकांमध्ये जागृती आहे पण पर्याय अजुन उपलब्ध नाहीत. गेल्या आठवड्यात माझ्या गावी गेले, तर तिथे नर्सरी ते पाचवी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची जोरदार जाहिरात चाललेली. गावात इंग्रजी माध्यम नाही म्हणुन तालुक्याला जाऊन राहणा-यांची सोय झाली.

चंपक, साधना ...
गावाकडे केजी,प्री स्कुल काढायला नक्कीच वाव आहे,
पण यात परवाना लागत असेल तर राजकिय लोक सोडुन बाकींना किती वाव मिळेल ?

अनिल...सर्वच शाळा परवानामुक्त नाहीत. पण प्री स्कुल अन के जी - इंग्रजी माध्यम ला परवणा लागत नाही, केवळ एक शॉप अ‍ॅक्ट अन लोकल ग्रामपंचायत/महापालिका नो ऑब्जेक्शन सेर्टिफिकेट लागते.

बाकी माहिती, मिळेल तसे टाकेल....

___
थोडे शिकलेल्या लोकांनी शाळा काढली, तर दर्जा राहतो... पण केवळ राजकिय हेतुने शाळा काढली तर ....

उत्तम शिक्षक उपलब्ध नसणे, हि खरी समस्या आहे ना ?
दूरदर्शन ज्यावेळी सुरु झाले त्यावेळी शालेय चित्रवाणी असा कर्यक्रम असायचा.
आमच्या प्राध्यापिका श्रीमती जेनेट पिंटो यांनी काही भाग सादर केले होते.
त्यावेळच्या तोकड्या तंत्रज्ञनामूळे ते कार्यक्रम अगदीच बाळबोध असत.
आता तंत्रज्ञान सुधारले आहे, आता नव्याने असे कार्यक्रम तयार करणे
सहज शक्य आहे. टिव्ही तर खेडोपाडी पोहोचला आहे.

आमच्या पुस्तकातले काही प्रयोग अपुऱ्या साधनांमूळे म्हणा किंवा इतर
काही बाबींमूळे म्हणा, आमच्या शाळेत करता येत नसत (ही शहरातल्या
शाळेची कथा ) ग्रामीण भागात तर त्याहून वाईट परिस्थिती असणार.
यांचे कार्यक्रमदेखील सादर करता येतील.

इतक्या विस्तृत आवाका असणार्‍या माध्यमाचा आपण उपयोग करुन घेत
नाही.
भविष्यकथनाचे अनेक कार्यक्रम आहेत पण खगोलशास्त्राचा एकही नाही.
किमान आपली रास आकाशात ओळखण्याचे कसब आपल्याकडे नाही.
कार्टून नेटवर्क ला नाक लावून बसलेल्या किती मुलांना, ते कसे
तयार केले जाते, हे माहीत असते ?

पाठ्यपुस्तकातला धडा, जर खुद्द लेखकानेच समजावून दिला, तर तो
नक्कीच कायम लक्षात राहिल.

भूगोलात शिकलेले प्रदेश, हवामान हे प्रत्यक्ष दिसले तर. असे कार्यक्रम
नव्याने पण करावे लागणार नाहीत. या क्षेत्रात बरेचसे काम झालेले आहे.
फ़क्त ते नेमकेपणाने आणि नियोजनबद्ध रितीने मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे.

टाटा स्काय याबाबतीत काही प्रयत्न करताना आढळले होते.

एखादा उत्तम शिक्षक, एखाद्या नीरस विषयात पण जान आणू शकतो. मला
सुदैवाने असे अनेक शिक्षक लाभले होते.
उदा ज्यावेळी नॅशनल जिऑग्राफिक चॅनेल सुरुही झालेले नव्हते, त्यावेळी
आमच्या प्राध्यापिका सौ सुनंदा नाथन, आमच्या नजरेसमोर अनेक देश, केवळ
वर्णनाने उभे करत असत. पुढे मला ते देश प्रत्यक्ष बघायची संधी मिळाली
त्यावेळी मी (१८ वर्षानी) मुद्दाम त्यांची भेट घेऊन, त्यांना हि आठवण करुन दिली
होती. आज वाटते, कि जर त्यावेळी त्यांची लेक्चर्स रेकॉर्ड करुन ठेवली असती,
तर आजही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला असता.

एक संगणक/ सी पी यु, एक स्क्रीन, एक प्रोजेक्टर.... किती खर्च येतो? कुणी सांगु शकेल का?

कल्पना करा, कि जर एका दु-तीन चाकी वर हे लादले, अन एका ठराविक शाळेत एका ठराविक दिवशी जाऊन फिल्म्स/ व्हिडीओ दाखवले तर?

पुर्वी शाळेत असे देशभक्तीपर चित्रपट दाखवले जायचे. सगळी शाळा एका मोठ्या वर्गात गोळाकेली जाई अन पडद्यावर तो चित्रपट/माहितीपट दाखवला जात असे.

दादा, नाकाला कार्टुन लावलेले... पालक जबाबदार हेत. पण तो वेगळा विषय आहे.

अगदि बरुबर माझ्या मनात्ल बोलालस ;
१० वी १२ वी नंतर काय , रोजगाराच्या संधी / भविष्य काळातील येणार प्रोजेक्ट आणी त्या बरोबर येणार्या संधी /वेगवेगळ्या क्षेत्रात करीअर च्या संधी या बद्दल मार्गदर्शन हावे .
***************************************
जो प्र राजकीय पुढार्याच्या संस्था शिक्षण देण्याचे कार्य करणार तो प्र
हे असच चालायच राव हे असच चालायच .

चांगला लेख लिहिलाय. आवडला. हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. कर्मवीर भाउराव आण्णाचा फार मोठा पगडा आमच्या घरावर आहे.
मी बघितलय , गावातली जी भरपुर जमीन वगैरे( घरची श्रीमंती ) असलेल्या लोकांची मुल असतात त्याना शिकण्यात कमी इंटरेस्ट असतो. "मागच" एवढ आहे ,शिकुण काय दिडक्या मिळवायच्या आहेत, घराण्याची परंपरा इत्यादी नावा खाली बरेच पालक मुलांना शिकण्यापासुन मागे ओढताना दिसतात. १०० एकर जमीन , मुलगा शिकुन नोकरी करायला लागल्यावर कोण कसणार म्हणुन मुलांना शिकवायच थांबवणारे पण पालक आहेत.
याच्या विरुद्ध गरीब , रोजगारावर जाणारे पालक रोजगार बुडेल, घरी काम कोण करणार म्हणुन शिकवायच थांबवणारे आहेत.पण तरीही शिक्षणामुळ परिस्थितीत बदल घडेल म्हणुन शिकायला पाठवणार्यांच प्रमाण आहे.
शिकण्या बाबतीत आशादायक चित्र उलट खेड्यातल्या मध्यमवर्गीय समाजात जास्त दिसत. मागची श्रीमंती नाही पण पोटाची भ्रांतही नाही. पालक ही जागरुक आहेत. त्यामुळ नक्कीच ही मुल शिकतील अस वाटत.
(याला अपवाद आहेत.)
मी गावाकडे गेल्यावर महिनाभर गुळकर्‍यांच्या मुलांसाठी चालणार्‍या (सरकारने सुरु केलेल्या) शाळेत शिकवण्याच काम केलय. शिकविताना लक्षात आल कि , मुलांना खरतर शिकायची हौस आहे. पुढे कल्याण होईल या हेतुन वगैरे म्हणुन नव्हे.तर रोजच्या भकभकित जीवनापेक्षा काहीतरी वेगळ म्हणुन तरी त्याना त्याच आकर्षण आहे. सरकारच्या कल्पनाही चांगल्या आहेत. पण माणस चांगली न मिळाल्यान या क्ल्पनांचा बट्ट्याबोळ होतो. Sad
पुर्वी आता चंपक लिहितोय तशा कल्पना माझ्याही डोक्यात असायच्या. म्हणजे ठराविक कालावधीनंतर आपण या कामात झोकुन घ्यायच इत्यादी. पण आता , माहित नाही मी तस करेन का. त्यासाठी फार पॅशन्स पाहिजेत्,चिकाटी पाहिजे, ती माझ्याकडे नाही. माझ्याकडे नुस्ती तळमळ आणि उद्दात्त कल्पना आहेत. ज्या अशा कामांसाठी फारशा उपयोगाच्या नाहीत.

आणि खरचं ज्याना शिकायच आहे , त्यांच ह्या वरच्या परिस्थितीमुळ खरच फारस बिघडत नाही. ते शिकतातच. जिद्दीन शिकतात. याची असंख्य उदाहरण माझ्या घरी आहेत. Happy

मला सीमाचा मुद्दा आवडला, ज्यांना खरेच शिकायचे आहे, त्यांचे कशावाचूनच अडत नाही. मीहि अशी उदाहरणे बघितली आहेत. पण त्यांच्यात ही चेतना कुठून येते, त्याचा शोध घेऊन, इतरांसमोर ते यायला हवे.

सीमा,

रयत मध्ये शिकलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात हे असतेच. कारण तो त्या परिस्थितीतुन गेलेला असतो.
अण्णा आणि रयत नसती, तर आपल्यासारखे असंख्य लोक केवळ गुरा ढोरांमागेच फिरले असते.

*त्यासाठी फार पॅशन्स पाहिजेत्,चिकाटी पाहिजे, ती माझ्याकडे नाही. माझ्याकडे नुस्ती तळमळ आणि उद्दात्त कल्पना आहेत. ज्या अशा कामांसाठी फारशा उपयोगाच्या नाहीत.>>>>
कॉलेजला असताना नारायणगांव च्या गुरुवर्य रा. प. सबनीस वाद स्पर्धेचा विषय होता: कृतीशील संत कि आदर्श विचारवंत! (चषक आम्हीच जिंकला होता!)

*क्रियेवीन वाचाळता व्यर्थ आहे!
__________________________

आपली नकारात्मक मानसिकता ही कुठेतरी आपल्याला मागे खेचते. मी वर उल्लेखलेल्या मित्राला शाळा सुरु करायला तब्बल दोन वर्षे मानसिक तयारी करावी लागली. पण तो मित्र एक उत्कृष्ठ शिक्षक आहे, ह्यात वाद नाही.

Pages